ललित कला आकादमीच्या प्रयत्नाबाबत आमदार महेश लांडगे यांचा सन्मान
पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क)
ललित कला अकादमी पिंपरी चिंचवड़ महापालिका हद्दीत सुरु करण्यासाठी भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी सिंहाचा वाटा उचलला. त्याबाबत आमदार महेश लांडगे यांचा विविध संस्था व पधाधिकाऱ्यानी सन्मान केला.
वैश्विक कला पर्यावरण पुणेचे संस्थापक भास्कर हांडे, कलाकार व कलाध्यापक दिलीप माळी, छायाचित्रकार अविनाश थोरात, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले यांनी आमदार लांडगे यांचा सन्मान केला.
ललितकला अकादमी ह्या भारत सरकारच्या कलेसंबंधित संस्थेची पश्चिम भारतातील विभागीय शाखा पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील भोसरी येथील जागेत सुरु होत आहे. ललित कला अकादमी अध्यक्ष शिल्पकार उत्तम पाचारणे यांच्या प्रयत्नांनी महाराष्ट्राला ह्या शाखेची सुविधा उपलब्ध होत आहे. त्यासाठी महानगरपालिकेच्या सकारात्मक निर्णय व हस्तांतरण प्रक्रियेत स्थानिक आमदार महेश लांडगे यांनी सिंहाचा वाटा उचलला. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आमदार लांडगे यांना ललित कला अकॅडमीसंबंधी अचूक माहिती सांगितली.
ह्या संस्थेमुळे महानगरपालिका हद्दीत एक महान व महत्वाची संस्था समाविष्ट होत आहे, असे प्रतिपादन या वेळी आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले.
भास्कर हांडे म्हणाले की, कलाशाखा, सामान्य कला शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व कलासक्त कलावंतांना सतत प्रोत्साहन व मार्गदर्शन देणारी ठरेल. ललित कला अकादमी व महाराष्ट्रातील कलावंतांच्या वतीने त्यांचे आभार मानले जाणे अतिमहत्वाचे होते.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.