पृथ्वीराज साठे यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवपदी निवड

 

पिंपरी(टाईम न्युजलाईन नेटवर्क):, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या मान्यतेने नुकतेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस पृथ्वीराज साठे यांची नियुक्ती अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव पदी करण्यात आली आहे, हि निवड काँग्रेस चे राष्ट्रीय सरचिटणीस के.सी.वेणूगोपाल यांनी जाहीर केली आहे. 
पत्रकार परिषदेतून साठे यांनी याबाबत सविस्तर माहीती दिली. 

पृथ्वीराज साठे हे पिंपरी चिचंवड मधील रहिवासी असून ते पिंपरी चिचंवड महानगरपालिकेचे माजी महापौर स्व. प्रभाकर साठे यांचे चिरंजीव आहेत, ते उच्चशिक्षित आहेत त्यांचे लंडन येथील लीडस् युनीवर्सिटी येथून एम ए आंतरराष्ट्रीय संबंध या विषयात शिक्षण झाले आहे.

साठे यांना संघटनात्मक राजकारणाचा चांगला अनुभव असून ते गेल्या २५ वर्षां पासून काँग्रेस संघटनेमध्ये सक्रीय असून विविध पदांवर विविध राज्यांतून काम केल्याचा त्यांना अनुभव आहे. 
राहूल गांधी यांच्या संघातील ते विश्वासू सहकारी आहेत व देश पातळीवर तसेच राज्य पातळीवर विविध स्तरावर त्यांनी काम केलेले आहेत.

साठे यांनी विद्यार्थी चळवळीपासूनच एन एस यु आय संघटनेपासून राजकीय जीवनाला सुरूवात केली फर्ग्युसन महाविद्यालयात ते १९९२ साली विद्यार्थी प्रतिनिधी या पदावर निवडून आले नतंर त्यांनी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे सरचिटणीस, युवा प्रशिक्षण कार्यक्रमाचे राष्ट्रीय समन्वयक, आम आदमी का सिपाही या विशेष उपक्रमाचे राष्ट्रीय समन्वयक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे सरचिटणीस या पदांवर सक्रीय कार्य केले आहे.

साठे हयांच्या निवडीमुळे सर्वसामन्य कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. राज्य कार्यकारिणी मध्ये असताना पालघर ची पोट निवडणूक, नागपूरचे मोर्चे, राज्य कार्यकारिणीचे प्रदेश पातळीवरील प्रशासकीय काम, वरिष्ठ नेत्यांचे राज्यातील दौरे नियोजन, लोकसभा व विधानसभा विविध निवडणूकांचे केलेले नियोजन या कामांतून साठे यांनी मोलाची भूमिका बजावली. 

येणा-या काळात काँग्रेस पक्षाचे विचार हे अधिक खोलवर पसरवून कार्यकर्त्यांच्या मोठ्या नेटवर्किंग मधून पक्षाची ताकद वाढविणार असल्याचा साठे यांचा मानस आहे. शहर जिल्हा पातळीवरील तसेच राज्य पातळीवरील व केंद्रीय स्तरावरील नागरिकांचे प्रश्न सोडवून जनसामान्यांच्या आवाजाला न्याय मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे साठे यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेस पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरंदरचे आमदार संजय जगताप, माजी विरोधी पक्ष नेते कैलास कदम, काँग्रेस पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष अशोक मोरे, पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस महेश ढमढेरे, संग्राम मोहोळ, माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे, विश्वास गजरमल, अख्तारभाई चौधरी, रामचंद्र माने, बाळासाहेब साठे, युवक काँग्रेस चे शहाराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, एन एस यु आय चे शहराध्यक्ष डाॅ. वसीम ईनामदार, एन एस यु आय चे प्रदेश उपाध्यक्ष उमेश खंदारे, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष नासीर चौधरी, युवक काँग्रेस चे जिल्हा सरचिटणीस विरेंद्र गायकवाड, अनिल सोनकांबळे, पर्यावरण विभागाचे शहराध्यक्ष उमेश बनसोडे, अशोक काळभोर, विजय ओव्हाळ, संजय साठे, शंकर तांदळे, नितीन काळे आदि पदाधिकारी उपस्थित होते.
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget