प्रभाग एकच्या महिलाध्यक्ष पदी मीना बावकर


पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क)- प्रभाग क्रमांक एकमध्ये भाजपा महिला अध्यक्षपदी मीना किसन बावकर यांची नियुक्ती करण्यात आली. भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे आणि भाजपा महिला मोर्चाच्या महिला अध्यक्षा उज्वला गावडे यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. बावकर यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. 
प्रभाग महिलाध्यक्षपदी मीना बावकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यासाठी प्रभाग एक मधील पदाधिकारी आणि भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या. त्यामध्ये भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा उज्वला गावडे, पिंपरी-चिंचवड शहर भाजपा उपाध्यक्ष किसन बावकर, नगरसेवक कुंदन गायकवाड, स्विकृत नगरसदस्य संतोष मोरे, युवा नेते विनायक आबा मोरे, गोरख मोरे, शामभाऊ सुळके, अशोक मोरे यांच्यासह भाजपा महिला मोर्चाच्या सरचिटणीस सोनम मोरे, चिटणीस सरिता नेवाळे, उपाध्यक्ष सोनम जांभुळकर, उपाध्यक्ष राजश्री मोरे, चिटणीस निकिता गोसावी, उपाध्यक्ष रंजना चिंचवडे आदी पदाधिकारी  उपस्थित होते.  



महिला सबलीकरनावर लक्ष देणार-मीना बावकर
यावेळी मीना बावकर म्हणाल्या, भाजपा शहराध्यक्ष महेश लांडगे आणि महिला अध्यक्षा उज्वला गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग एक मध्ये चांगले कार्य करण्याचा प्रय़त्न कऱणार आहे. महिला सबलीकरण, नागरिकांच्या समस्या तसेच पक्षविस्तारासाठी प्रामाणिक कार्य करणार आहे.  महापालिकेच्या वतीने महिलांसाठी ज्या योजना राबविल्या जातात, त्या तळागाळातील महिलापर्यंत पोहचवणे आणि त्यांना लाभ मिळवुन देण्यासाठी प्रय़त्न कऱणार आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget