चांदखेडच्या पोलीस पाटलाचे पद रद्द

 


:प्रतिज्ञापत्र खोटे ठरले असल्याचा ठेवला ठपका

: मावळ मुळशी प्रांताधिकारी संदेश शिर्के यांनी दिले आदेश

वडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क)
 

 पोलीस पाटील पदासाठी अर्ज दाखल केल्यानंतर राजकीय लेटरहेड, जिल्हा परिषद
बोधचिन्ह यांचा वापर केल्याने अर्जासोबत दिलेले प्रतिज्ञापत्र खोटे ठरले असल्याने
तसेच एक गुन्हाही दाखल असल्याचा ठपका ठेवून मावळ मुळशी प्रांताधिकारी संदेश शिर्के
यांनी चांदखेडचे पोलिस पाटील दत्तात्रय माळी यांचे पोलीस पाटील पद रद्द करण्याचा आदेश दिला आहे.
यासंदर्भात चांदखेड येथील अमोल कांबळे, पांडुरंग कदम, प्रशांत होगले, पौरस बारमुख यांनी तक्रार केली होती.
दत्तात्रय माळी यांची चांदखेड गावासाठी इतर मागास प्रवर्गातून पोलीस पाटीलपदी
१ मार्च २०१८ रोजी नियुक्ती करण्यात आली. भरती प्रक्रियेदरम्यान त्यांनी १६ जून २०१७ रोजी कोणत्याही राजकीय
पक्षाचा पदाधिकारी नसल्याचे प्रतिज्ञापत्र दिले होते. ९ ऑगस्ट २०१७ रोजी पक्षाचा
राजीनामा दिला होता.
 ९ ऑगस्ट २०१७ रोजी वनक्षेत्रपाल
मावळ यांना एका राजकीय पक्षाच्या लेटरहेडवर उपोषण करण्याबाबत इशारा
दिला होता, तसेच २७ नोव्हेंबर २०१७ रोजी पोलीस संरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी पोलीस अधीक्षक यांच्याकडे केलेल्या अर्जावर जिल्हा परिषदेच्या
बोधचिन्हाचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केला. याशिवाय, माळी यांच्यावर
शिरगाव पोलिस ठाण्यात ऑगस्ट २०१९ गुन्हा दाखल होऊन अटकेची कारवाई व जामिनावर मुक्तताही झाली होती. त्यामुळे
माळी यांनी प्रक्रियेदरम्यान सादर केलेला प्रतिज्ञापत्र खोटे ठरत असल्याने त्यांचे पोलीस पाटील पद रद्द करण्यात आल्याचा
आदेश मावळ मुळशी प्रांताधिकारी शिर्के यांनी दिला.
या संदर्भात दत्ता माळी यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget