एसटी कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार आणि अग्रीम देणार - परिवहन मंत्री ॲड. अनिल परब

 

          मुंबई,(टाईम न्युुुजलाईन नेटवर्क) : एसटी कर्मचाऱ्यांच्या मागील ३ महिन्यांच्या थकीत असलेल्या वेतनापैकी ऑगस्ट महिन्याचे वेतन व दिवाळी सणानिमित्त देण्यात येणारा अग्रीम कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होईल अशी माहिती परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत दिली.

           श्री. परब म्हणालेहे तात्पुरते संकट आहे. लवकरच ते दूर होईल. आपल्या कुटुंबावर संकट येऊ देऊ नका. काळ जरी कठीण असला तरीकर्मचाऱ्यांनी  आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे भावनिक अवाहनही परिवहन मंत्री  श्री. परब यांनी केले  .

          श्री. परब म्हणालेकर्मचाऱ्यांच्या राहिलेल्या  उर्वरित २ महिन्याच्या वेतनापैकीसुद्धा एक महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी देण्यात येणार असूनबाकी  एक महिन्याचे वेतनही कर्मचाऱ्यांना लवकर मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.  टाळेबंदीमुळे अत्यावश्यक सेवा वगळता पाच महिने एसटीची प्रवासी वाहतुक बंद होती. याकाळात एसटीला प्रवासी वाहतुकीतून मिळणाऱ्या सुमारे ३ हजार कोटी रुपये महसुली उत्पन्नाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे इतर खर्चवेतनगाड्यांची देखभालबसस्थानकांची पुनर्बांधणी यापोटी थकीत रक्कम वाढत गेली. आणि कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत राहिले आहे. हळूहळू प्रवासी संख्या दिवसागणिक वाढत आहे त्यामुळे लवकरच एसटीचे अर्थकारण पूर्वपदावर येईल.  कर्मचाऱ्यांचे वेतन व अनुषंगिक खर्चासंदर्भात मदतीसाठी शासनाकडे विनंती करण्यात आली असल्याचेही श्री. परब यांनी सांगितले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget