November 2020

 Pune(timenewsline network): Prime Minister Narendra Modi today visited the Serum Institute of India to learn about the development, production, distribution, storage and management of the Covid-19 virus vaccine. The Chief Executive Officer of Serum Institute of India, Dr. Cyrus Punawala, Chief Executive Officer Adar Punawala, Executive Director Natasha Punawala, scientists as well as senior officers of the concerned department were present.

Initially, Adar Punawala informed about the organization. After that
Prime Minister Shri. Modi inspected the ongoing work of Serum Institute of India in connection with the production of Covid-19 preventive vaccine. At this time, the scientists informed about the preparation, challenges and planning of the efforts to vaccinate them.
 पुणे,(टाईम न्युजलाईन नेटवर्क):- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज  सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट देऊन कोविड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक लस विकास, उत्पादन, वितरण, साठवण आणि व्यवस्थापन प्रक्रियेची माहिती घेतली. यावेळी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. सायरस पुनावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला, कार्यकारी संचालक नताशा पुनावाला, शास्त्रज्ञ तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रारंभी अदर पुनावाला यांनी संस्थेची माहिती दिली. त्यानंतर

प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेतील कोविड -१९ प्रतिबंधात्मक लस निर्मितीच्या अनुषंगाने सुरु असलेल्या कामाची   पाहणी केली. यावेळी त्यांना लस देण्याच्या प्रयत्नांची पूर्वतयारी, आव्हाने आणि नियोजन यांची माहिती शास्त्रज्ञांनी दिली.

 

पिंपरी, (टाईम न्युजलाईन नेटवर्क


) प्रचलित कायद्यांचीच अंमलबजावणी करावी. तसेच सुधारित कामगार कायदे मागे घ्यावेत अन्यथा केंद्र सरकारच्या विरोधात संघटीत, असंघटीत सर्व क्षेत्रातील कामगारांचे देशभरात सुरू असलेले आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा  पुणे जिल्हा कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी दिला.


      गुरुवारी (दि.२६ नोव्हेंबर २०२०) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात पुणे व पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील सर्व संघटीत, असंघटीत कामगार संघटनाच्यावतीने केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी हजारो कामागारांनी केंद्र सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देत फलक फडकवले.


      याचप्रमाणे गुरुवारी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, रांजणगाव यश इन चौकात, चौफुला (पुणे सोलापूर महामार्ग), बारामती (एमआयडीसी मुख्य चौक), पुणे अलका टॉकिज चौक पासून लक्ष्मी रोड सिटी पोस्ट चौकापर्यंत, घर कामगार व असंघटित कामगारांच्या वतीने हडपसर ओव्हरब्रीजखाली, कोथरूड कर्वे पुतळा,  सिंहगड रोड पु.ल. देशपांडे उद्यान, येरवडा मच्छी मार्केट, कात्रज कोंढवा मार्ग आदी ठिकाणी आंदोलन करण्यात आले.


या आंदोलनात ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव, अजित अभ्यंकर, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस रघुनाथ कुचिक, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपमहापौर केशव घोळवे तसेच शिवाजी खटकाळे, व्ही. व्ही. कदम, वसंत पवार, मनोहर गडेकर, नितीन पवार, अनिल औटी, उदय भट, किरण मोघे, सुमन टिळेकर, चंद्रकांत तिवारी, दिलीप पवार, दत्ता येळवंडे, किशोर ढोकले, अनिल रोहम, यशवंत सुपेकर, शांताराम कदम, शैलेश टिळेकर, रघुनाथ ससाणे, शुभा शमीम, विश्वास जाधव, सुनिल देसाई, सचिन कदम, गिरीश मेंगे, शशिकांत धुमाळ या कामगार नेत्यांनी तसेच माजी नगरसेवक मारुती भापकर, मानव कांबळे आदींनी सहभाग घेतला.


केंद्र सरकारने मागील आधिवेशनात प्रचलित २९ कामगार कायदे रद्द करून सुधारित चार जुलमी कायदे आणले. या कायद्यामुळे देशातील ९५ कोटींहून जास्त संघटीत, असंघटीत कामगार, शेतमजूर व शेतकरी यांची आर्थिक व सामाजिक सुरक्षा संपुष्टात येणार आहे.


      सुलभीकरणाच्या नावाखाली कामगारांचे न्याय्य हक्क डावलून मूठभर भांडवलदारांचे खीसे भरण्यासाठी हे कायदे करण्यात आले आहे. या नवीन कायद्यामुळे कामगारांना यापूर्वी मिळणारे  सामाजिक व आर्थिक सेवेविषयी मिळणारे सर्व लाभ संपुष्टात येणार आहेत. भांडवलदार कामगारांना गुलामाप्रमाणे वागणूक देतील. कंत्राटीकरण वाढून बेरोजगारीत वाढ होईल. देशाची सर्व आर्थिक सत्ता मूठभर भांडवलदारांच्या हातात जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने यापूर्वीच सार्वजनिक बँकाचे व संरक्षण खात्याचे खाजगीकरण करून सार्वजनिक उद्योग भांडवलदारांना विकून देशाला कर्जाच्या खाईत लोटले आहे. येथून पुढे “कायम कामगार” ही संकल्पना रद्द होऊन बेठबिगारीस चालना मिळेल.


      देशाचा जीडीपी हा शेती, उत्पादन, सेवा यावर अवलंबून असतो यामध्ये सर्व क्षेत्रातील संघटीत, असंघटीत कामगार, शेतमजूर व शेतकरी यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. याकडे सरकार दुर्लक्ष करून कामगार व शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे. जोपर्यंत केंद्र सरकार हे कायदे मागे घेत नाही, तोपर्यंत देशातील कामगार व शेतमजूर यांचा न्याय हक्काने सुरू असणार लढा आणखी तीव्र करतील असाही इशारा या आंदोलनातून विविध कामगार नेत्यांनी दिला.


गुरुवारी इंटक, आयटक, सिटू, एचएमएस, टीयुसीसी, एआययुटीयुसी, एआयसीसीटीयु, सेवा, युटीयुसी, भारतीय कामगार सेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस कामगार सेल, हिंद कामगार संघटना, श्रमिक एकता महासंघ, महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघ, राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ तसेच विमा, बँक, संरक्षण, वीज महामंडळ, बीएसएनएल, केंद्र व राज्य सरकारी कामगार कर्मचारी, महानगरपालिका / नगरपालिका कामगार कर्मचारी,  नर्सेस व अन्य आरोग्य कामगार कर्मचारी, बांधकाम कामगार, घर कामगार, अंगणवाडी, आशा, इत्यादि योजना कर्मचारी, अंग मेहनत कष्टकरी, रिक्षा, पथारी-फेरीवाले, हमाल, बाजार समिती या क्षेत्रामधील केंद्रीय महासंघाशी संलग्न सर्व संघटनांनी देशभर केंद्र सरकारचा निषेध करत आंदोलन केले. 


.....................           पंढरपूर, (टाईम न्युजलाईन नेटवर्क) :- कोरोना विषाणूवरील लस लवकर येऊ दे आणि अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे, असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  आज श्री  विठ्ठलाच्या चरणी घातले. 
  उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सौ. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने श्री. पवार आणि सौ.पवार यांचा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी श्री. पवार बोलत होते.  यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, सौ सारिका भरणे, मानाचे वारकरी श्री. कवडुजी भोयर, सौ कुसुमबाई भोयर, नगराध्यक्षा सौ. साधना भोसले,  पार्थ पवार, जय पवार आदी उपस्थित होते.
              श्री. पवार म्हणाले, 'अवघ्या जगासमोर कोरोनाचे आव्हान आहे. आपण या आव्हानाला सक्षमपणे तोंड देत आहोत. पण गेला काही काळ कोरोना आटोक्यात आला, असे चित्र होते. मात्र गेल्या काही दिवसांत कोरोनाचे रुग्ण परत वाढत आहेत. त्यामुळे आपणा सर्वांनाच काही बंधने पाळणे गरजेचे आहे.  याबाबतीत समस्त वारकरी बांधवांचे आभार मानतो, कारण त्यांनी शासनाच्या आवाहनाला आषाढी यात्रेप्रमाणे कार्तिक यात्रेतही प्रतिसाद  दिला. राज्यातील समस्त नागरिकांच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिीणी मातेची पूजा करण्याचे मला भाग्य मिळाले. पुढील वर्षी आषाढी आणि कार्तिक यात्रा प्रथा परंपरेनुसार होतील, असा विश्वास आहे.
राज्यातील शेतकरी यंदाच्या वर्षी अतिवृष्टिने संकटात आला आहे. या शेतकऱ्यांच्या जीवनातील दुख: हलक करण्याची ताकद शासनाला दे अशी मागणी  श्री विठ्ठलाकडे केली असल्याची सांगून श्री.पवार म्हणाले,  श्री विठ्ठल कोरोनाचे संकट दूर करेलच अशी समस्त भाविकांप्रमाणेच माझीही श्रध्दा आहे. पण सर्व काही पांडुरंगावर सोडून चालणार नाही. आपणा सर्वांना कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी मास्क वापरणे. गर्दी टाळणे, वारंवार हात धुणेआदी गोष्टी काटेकोरपणे अंमलात आणाव्या लागतील.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करुन त्यांनी दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना वंदन केले. या शहिद वीरांचा त्याग महाराष्ट्र नेहमी लक्षात ठेवेल, युवकांना देशासाठी लढण्याची प्रेरणा देईल असा मला विश्वास आहे, असे ते म्हणाले.याचबरोबर त्यांनी आज असणाऱ्या संविधान दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.
             श्री.पवार यांच्या हस्ते मानाचे वारकरी श्री. कवडुजी नारायण भोयर आणि सौ. कुसुमबाई कवडुजी  भोयर (मु.डौलापूर, पो.मोझरी, ता. हिंगणघाट जि.वर्धा)  यांना राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने  देण्यात येणार प्रवास सवलत पास सुपूर्त करण्यात आला.  विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीच्या 'दैनंदिनी 2021 ' चे प्रकाशन करण्यात आले. 
यावेळी समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संभाजी शिंदे, अतुलशास्त्री भगरे, शकुंतला नडगिरे, पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी,पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, प्रांताधिकारी सचिन ढोले, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, तहसिलदार  वैशाली वाघमारे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर,व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, एसटी महामंडळाचे दत्तात्रय चिकोर्डे, सुधीर सुतार आदी उपस्थित होते. 
                                                         

 

Pimpri,(time Newsline network): Pimpri-Chinchwad Municipal Administration and Corona Warriors worked tirelessly to bring Corona under control in the city. While it seems to be succeeding, the number of corona patients in the city is on the rise again. Medical experts say corona symptoms have also changed. Corona infection is re-emerging due to non-wearing of mask, non-observance of safe distance criteria and untimely check-ups. Therefore, Pimpri-Chinchwadkars should now understand that there is a risk if they go out of the house. MLA Laxman Jagtap has appealed to Pimpri-Chinchwadkar to reduce this risk and the citizens should show continuous support to the administration.

 

पिंपरी,  (टाईम न्युजलाईन नेटवर्क) – पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन आणि कोरोना योद्ध्यांनी अथक प्रयत्न करून शहरातील कोरोना नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले. त्यात यश आल्याचे दिसत असतानाच शहरात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. कोरोनाच्या लक्षणांमध्येही बदल झाल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत. मास्क न लावता फिरणे, सुरक्षित अंतरांचे निकष न पाळणे तसेच वेळीच तपासण्या न करणे अशा प्रकारांमुळे कोरोनाचा संसर्ग पुन्हा उचल खात आहे. त्यामुळे घराबाहेर पडल्यास रिस्क आहे हे आता पिंपरी-चिंचवडकरांनी समजून घ्यावे. हे रिस्क कमी करणे आपल्याच हातात असून, नागरिकांनी प्रशासनाला सातत्याने सहकार्याची भूमिका दाखवायला हवी, असे आवाहन आमदार लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी-चिंचवडकरांना केले आहे.

यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, “पिंपरी-चिंचवडमध्ये जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्यात कोरोना संसर्गाचा फैलाव झाला. तो नियंत्रणात आणण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागणार होते. महापालिका प्रशासनाने प्रयत्नांची शिकस्त करून कोरोनाचे वाढणारे प्रमाण ऑक्टोबर महिन्यात नियंत्रित केले. कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या जोडीला स्थानिक डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांनीही मोलाची कामगिरी बजावली. मात्र मास्क न लावता फिरणे, सुरक्षित अंतरांचे निकष न पाळणे तसेच तपासण्या न करणे अशा प्रकारांमुळे शहरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा उचल खाऊ शकतो, अशी भीती वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. ती आता खरी ठरताना दिसत आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. कोरोना रुग्णसंख्येचे वाढणारे प्रमाण मोठे नसले तरीही शहरात ते कायम नियंत्रणात राहणे गरजेचे आहे. अनेक जणांना कोरोना संसर्ग संपल्यासारखे वाटते. त्यामुळे मास्क न घालता फिरण्याचे प्रमाणही वाढले आहे. घराबाहेर जाऊन खरेदी तसेच गर्दी केल्यामुळे कोरोना संसर्ग वाढल्याचे दिसत आहे. शहरातील डॉक्टरांकडे ताप, सर्दी, तीव्र डोकेदुखी तसेच अंगदुखी ही लक्षणे घेऊन आलेल्या रुग्णांचे प्रमाण हळूहळू वाढते आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांनी सतर्क होण्याची गरज आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाने स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची पूर्वीइतकीच काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

कोरोनाविरोधात लढाईसाठी महापालिकेची वैद्यकीय आणि आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. परंतु, नागरिक म्हणून सर्व पिंपरी-चिंचवडकरांचीही त्यांना साथ मिळणे ही तेवढीच महत्त्वाची बाब आहे. दिवाळीचा उत्सव साजरा करून नागरिक फिरायला, नातेवाईकांना भेटायला मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत. हे अत्यंत धोकादायक ठरू शकते. आपल्या सर्वांसाठी आगामी महिना-दीड महिन्याचा कालावधी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांनो विनाकारण घराबाहेर पडणे टाळा, बाजारात, दुकानात, मॉलमध्ये गर्दी करणे टाळा, घराबाहेर पडताना मास्कशिवाय बाहेर पडू नका, घरात लहान मुले असतील तर विशेष काळजी घ्या, असे आवाहन आमदार जगताप यांनी केले आहे.”

 

 


राजगुरुनगर (टाइम न्यूज़लाइन नेटवर्क): खेड़ तालुका अखिल भारतीय ग्रहाक पंचायत की ओर से, गुरुवार (19 दिसंबर) को राजगुरुनगर में प्रांतीय कार्यालय के सामने एक श्रृंखला आंदोलन का आयोजन किया गया है। खेड तालुका में कई स्थानों पर अवैध खनन चल रहा है। कुछ जगहों के पंचनामा के बाद भी दंडात्मक कार्रवाई नहीं की गई है। खेड़ घाट बाईपास पर कार्य प्रगति पर है। राजस्व विभाग की कार्रवाई संदिग्ध है। इसलिए, अखिल भारतीय उपभोक्ता पंचायत की ओर से एक आंदोलन शुरू किया गया है। बीएचए। उपभोक्ता पंचायत तालुका के अध्यक्ष देवानंद बवले ने कहा।चाकन राजस्व बोर्ड में लंबित 7/12 पंजीकरण और परिवर्तन। आरटीआई पत्र और अन्य बयानों के लिए समय पर जवाब देने में विफलता। महा-ई-सेवा केंद्रों में सुविधा प्रमुखों द्वारा वित्तीय निकासी। 7/12 संशोधन 155 धारा 155 आदेश तुरंत न तो निर्देशन द्वारा कार्रवाई करना। कोविद 19 अवधि के दौरान राशन दुकानदारों को केंद्र सरकार के नियमों के अनुसार खाद्यान्न वितरित करने के निर्देश नहीं दे रहे हैं। बयान में राजगुरुनगर नगर परिषद के कामकाज की गहन जांच की मांग का उल्लेख किया गया है।आंदोलन के दौरान, उप-विभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण ने प्रदर्शनकारियों के साथ इन मुद्दों पर चर्चा की। हालांकि, प्रदर्शनकारियों ने आंदोलन जारी रखने का फैसला किया है क्योंकि उन्हें कोई ठोस आश्वासन नहीं मिला है।मेयर शिवाजी मांदळे, मराठा मोर्चा के  मनोहर वाडेकर, पार्षद  शंकर राक्षे, खेड बार असोसिएशन के पूर्व माजी अध्यक्ष ऍड. अनिल राक्षे, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, पूर्व पंचायत समिती सदस्य रोहिदास गडदे, भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट के अध्यक्ष सुरेश कौदरे, हुतात्मा राजगुरु सोशल फौंडेशन के अध्यक्ष ऍड. सुनील वाळुंज, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य रेवणनाथ थिगळे
समर्थ फाउंडेशन के संस्थापक एड। विजय सिंह शिंदे पाटिल द्वारा दौरा किया गया।

इसके अलावा, इस आंदोलन को राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मराठी स्वराज्य संघ, भ्रष्टाचार अपराध मुक्त न्याय पार्टी का समर्थन प्राप्त था।

 विश्व हिंदू परिषद, अत्याचार विरोधी भ्रष्टाचार समिति,

आयोजक अमित कुमार टाकलकर ने कहा कि राजगुरुनगर के लायंस क्लब ने अपना समर्थन दिया है।

जिला उपाध्यक्ष अशोक भोर, जिला महिला संघ वैशाली अडसरे, कोषाध्यक्ष अवधूत प्रसादे, सह-आयोजक विठ्ठल दौंडकर, बबन गावड़े, धनंजय देवरकर, अक्षता कान्हुरकर, उज्ज्वला शेटे, सविता मयदेव, कल्पेश जैन, शंकर ताम्बे और अन्य ने सक्रिय रूप से भाग लिया।
 पंचनामे होऊन देखील दंडात्मक कारवाई होत नाही


राजगुरूनगर (टाईम न्युजलाईन नेटवर्क): खेड तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने गुरुवारपासून (दि.१९) राजगुरुनगर येथील प्रांत कार्यलयासमोर विविध प्रश्नांबाबत धरणे साखळी आंदोलन करण्यात आले आहे. खेड तालुक्यात अनेक ठिकाणी बेकायदेशीर गौणखनिज उत्खनन सुरू आहे. त्यातील काही ठिकाणचे पंचनामे होऊन देखील दंडात्मक कारवाई होत नाही. खेड घाट बाह्यवळण येथे संगनमताने कामे सुरू  आहेत. त्यात महसुल विभागाची कारवाई संशयास्पद आहे. त्यामुळे अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने आंदोलन छेडले आहे, असे अ. भा. ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष देवानंद बवले यांनी सांगितले.

 

चाकण महसूल मंडळात ७/१२ नोंदनी व फेरफार प्रलंबित असणे. माहिती अधिकार पत्र व इतर निवेदनांना वेळेत लेखी उत्तर न देणे. महा-ई-सेवा केंद्रातील सुविधा प्रमुखांकडून आर्थिक पिळवणूक होणे. ७/१२ दुरूस्ती तील ‌१५५ कलम आदेश तत्काळ ‌ निर्देशीत करून कारवाई न करणे. कोविड १९ काळात रेशनिंग दुकानदारांना केंद्र सरकारच्या नियमावली प्रमाणे ‌धान्य वाटप निर्देश न देणे. राजगुरूनगर नागरपरिषदेच्या कामकाजाची सखोल चौकशी करणे आदी मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.


आंदोलनादरम्यान उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी या मुद्द्यांवर आंदोलकांशी चर्चा केली. मात्र काही ठोस आश्वासन न मिळाल्याने आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे.


उपोषणस्थळी नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, मराठा क्रांती मोर्चा प्रदेश समन्वयक मनोहर वाडेकर, नगरसेवक शंकर राक्षे, खेड बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ऍड. अनिल राक्षे, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, माजी पंचायत समिती सदस्य रोहिदास गडदे, भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश कौदरे, हुतात्मा राजगुरु सोशल फौंडेशनचे अध्यक्ष ऍड. सुनील वाळुंज, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य रेवणनाथ थिगळे, समर्थ फौंडेशनचे संस्थापक ऍड. विजयसिंह शिंदे पाटील यांनी भेट दिली. 


तसेच आंदोलनाला राष्ट्रीय छावा संघटना, मराठी स्वराज्य संघ, भ्रष्टाचार अपराध मुक्त न्याय दल,

 विश्व हिंदू परिषद, अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती,

लायन्स क्लब ऑफ राजगुरूनगर या संघटनांनी पाठिंबा दिला आहे असे संघटक अमितकुमार टाकळकर यांनी सांगितले.आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोर, जिल्हा महिला संघटिका वैशाली अडसरे, कोषाध्यक्ष अवधूत प्रसादे, सहसंघटक विठ्ठल दौंडकर, बबन गावडे, धनंजय देव्हरकर, अक्षता कान्हूरकर, उज्वला शेटे, सविता मायदेव, कल्पेश जैन, शंकर तांबे आदींनी सक्रिय सहभाग घेतला.

 .


Pimpri (November 12, 2020): - The invisible corona virus has spread all over the world. Although the number of corona patients seems to be declining today, the number of patients may increase after Diwali. Therefore, the citizens of Pimpri Chinchwad should enjoy Diwali with restraint. By following the guidelines suggested by Uddhav Saheb in the 'My Family, My Responsibility' campaign, citizens should stay away from the corona and prevent pollution by setting off less firecrackers. Labor leader Irfanbhai Syed said that the people of the city should light the lamps as much as possible to end the dark monster of Corona and make the city as bright as light.

On behalf of Saad Social Foundation, a social program "Diwali Faral Distribution" was organized for the families of blind brothers in Pimpri Chinchwad on Thursday (Dec. 12) at Khandoba Sanskritik Bhavan in Akurdi. The event was organized in compliance with social security in conjunction with Corona. Irfan Syed was speaking at the time. At this time, Diwali Farala was distributed to about 100 blind brothers and their families. The event was organized to shed light on the Diwali of the blind brothers and increase their enthusiasm.

Nilesh Mutke said that Saad Social Foundation has been organizing Diwali Faral distribution for the blind for the last few years. Even in Corona's time, they have continued to help the blind. There seems to be a small effort to support the blind brothers and their families in the community. Through this, the self-confidence of the Divyang brothers is building in the society. Saad Social Foundation has always done its 'one hand helping' to the society. Whether it is Pandhari Wari or the valuable help of the Corona period, their humanity is nowhere to be seen diminishing. The organization has set a new standard for the society.

Anil Katale said that Chhatrapati created Swarajya by taking the pylon of Swarajya for the creation of Hindavi Swarajya. Rayat was happy. Irfanbhai took his fat and formed activists. The organization grew. He took up the fat of social work like a lamp in a storm. Irfanbhai and his colleagues are working to help the blind. The scope of their work should continue to grow.Shiv Sena Khed-Bhosari Assembly liaison chief Irfanbhai Syed, Surya Electronics' Ramesh Chaudhary, journalist Bhushan Nandurkar, Amol Kakade, MPC News editor Anil Katale, PCMC News' Ashok Lokhande, Shabnam News' Shabnam Syed, youth leaders Kisan Bawkar, Shiv Sena's Nilesh Mutke, Saad Social Foundation's Vice President Dr. Mahesh Shete, General Secretary Pravin Jadhav, Working President Paresh More, Organizer Rahul Kolhatkar, Ujwala Garje, Pandurang Kadam, Sarjerao Kachare, Nagesh Vhanvate, Entrepreneur Bhimsen Agarwal, Dastagir Maniar, Javed Arkate, Bhalerao, Vishwas Temgire, Dr. Pratap Somvanshi, Pramod Mama Shelar, Rajesh Pangal, Haji Lalubhai, Nilesh More, Sandeep Madhure, Ravi Ghodekar, Shyam Sulke, Kailas More, Roshan More, Chetan Chinchwade, Anil Dalvi, Prabhakar Gurav, Atish Barne, Pimpri Chinchwad. Niranjan Agarwal, Pritesh Shinde, Arun Jogdand, Chandan Waghmare, Samarth Nayakwade, Baban Kale, Aba Mandhare, Shrikant Sutar, Anil Khapke, Sameer Gadekar, Prashant Vitkel were present.  


 

पिंपरी,

 ( टाईम न्युजलाईन नेटवर्क) पिंपरी चिंचवड शहरातील दिग्गजांची

दिलखुलास गप्पांची मैफल शुक्रवारी रंगली. निमित्त होते, दिशा सोशल फाउंडेशनच्या दिवाळी फराळ कार्यक्रमाचे. 

ताथवडे येथील रागा हॉटेल येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.

 यावेळी सर्वांनी खेळीमेळीच्या वातावरणात एकमेकांशी मुक्त संवाद साधत, दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला. 

  शहराच्या जडणघडणीत महत्वपूर्ण योगदान असणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना एका व्यासपिठावर आणून त्यांच्यात मनमोकळा संवाद घडावा, या हेतूने या उपक्रमाचे आयोजन दिशा फाउंडेशन करते. यंदाचे या उपक्रमाचे चौथे वर्ष होते. दिवाळी फराळाबरोबरच विचारांची देवाणघेवाण करत  दिलखुलास गप्पा झाल्या. दिशाचा हा उपक्रम अखंडितपणे सुरूच रहावा, अशी अपेक्षा  उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. 

    या कार्यक्रमास खासदार डॉ.अमोल कोल्हे, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार गजानन बाबर, आमदार लक्ष्मण जगताप, भाजपा शहराध्यक्ष  आमदार महेश लांडगे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापू भेगडे, संचालक बाळासाहेब विनोदे, नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, दिशा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष गोरख भालेकर,  पिंपरी चिंचवड प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी उपमहापौर तुषार हिंगे,  काँग्रेसचे  शहराध्यक्ष सचिन साठे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन चिंचवडे, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष जगदीश शेट्टी, अपक्ष गटनेते कैलास बारणे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, संतोष कांबळे, अनिल लोंढे, संतोष बारणे आदींसह दिशाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. 

 यावेळी मान्यवरांना डॉ.अमोल कोल्हे यांचे नुकतेच प्रकाशित झालेले 'शिवगंध' हे पुस्तक भेट देण्यात आले.  प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष गोरख भालेकर, सूत्रसंचालन नाना शिवले तर आभार  बाजीराव लोखंडे यांनी मानले. 

  • पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क) : एका सहा वर्षीय चिमुरडीचा हट्ट पुरविण्यासाठी मेड इन इंडिया विंटेज कारची निर्मिती करण्यात आली आहे. आजोबा आणि वडिलांनी लॉकडाऊनच्या चार महिन्यात ही किमया साधली आहे. आजोबा आणि वडील जुन्या गाड्या मॉडीफाय करून देतात. त्यामुळे मुलीचा हट्ट मेड इन चायना कारऐवजी मेड इन इंडिया कारची निर्मिती करून पूर्ण केला.


    पिंपरीतील सहा वर्षीय मुलगी तंजीलाने मेड इन चायना कारचा हट्ट धरला.अशातच कोरोनाने भारतात शिरकाव केला, देश लॉकडाऊन झाला. दुसरीकडे सीमेवर चीनने कुरघोडी सुरू केली, त्यामुळे चीनबद्दल भारतात संतापाची लाट उसळली. मग मुलीचा हट्ट पुरविण्यासाठी बाप आणि आजोबाने मेड इन चायनाला फाटा दिला आणि मेड इन इंडिया विंटेज कारची निर्मिती केली.

  • हसन आणि जावेद शेख या बाप-लेकाने या विंटेज कारची निर्मिती केली आहे. सहा वर्षीय मुलगी तंजीलाने मेड इन चायना कारचा हट्ट धरला. तितक्यात चीनमधून उसळलेल्या कोरोनाने भारतात शिरकाव केला. दुसरीकडे सीमेवर ही चिन्यांनी कुरघोड्या केला. यामुळे संतापलेल्या बाप आणि आजोबाने मुलीचा हट्ट पूर्ण करण्यासाठी मेड इन चायना कारला लाथाडले आणि मेड इन इंडिया विंटेज कारची निर्मिती केली. घरात धूळ खात पडलेल्या स्कूटीचे इंजिन या कारसाठी वापरण्यात आलं. गाड्या मॉडीफाय करण्याचा अनुभव गाठीशी असल्याने, बाप-लेकाने जुगाड केला आणि बघता-बघता लॉकडाऊनमध्येच भारतीय बनावटीची कार तयार झाली. तंजीलाने ज्या मेड इन चायना कारसाठी हट्ट धरला होता. त्याहून सरस ती ही मेड इन इंडिया कार तिला मिळाली. त्यामुळं हे कुटुंबीय भलतंच आनंदात आहे.

 

Appeals to wish through social media only

            Mumbai,(timenewsline network) : CM Uddhav Thackeray has appealed to the public to celebrate Diwali by taking proper health measures. He also cleared that he will accept Diwali wishes through social media and email only without meeting people personally. He said that he would celebrate this Diwali very safely and simply.

            CM appeals, corona does not understand festival days like Diwali. Keeping ourselves safe until the vaccine is available and making sure that no one around us is exposed to the virus should be our priority. We celebrated all festivities of all religions cautiously and followed all rules. And we should not forget that we have successfully controlled this pandemic as a result of our patience only.

            Situations in Europe are worsening due to the second and third waves of corona. The number of Covid-19 cases is increasing there. More medical resources, hospital staff, and doctors are needed there. If we fail to take proper care, we will also have to face an increase in Covid cases, which could be a tough challenge for us. CM furthermore said that we will engage ourselves in Diwali celebrations but we must remember that thousands of doctors, nurses, medical staff, police are fighting with corona, may it be a festival or a regular day. They are fighting to protect our lives. Please do not forget that. They have to spend their Diwali working in hospitals and following their duty. Someone's parents, siblings, relatives, or friends might be one of them. Let us not burden them more and give preference to celebrate Diwali safely by staying home.

            Though this is a big festivity for us, someone in our area or acquaintances might have lost life due to corona. Their close ones would not be able to celebrate Diwali happily. We should be considerate of their pain while being enthusiastic about Diwali celebrations, said CM.

            Schools, colleges will be reopened after Diwali. We will try to live a normal life again. So follow the three-step mantra- mask, hand wash, and social distancing in the Diwali period too. Take measures for respiratory diseases likely to occur in winters. We should be considerate that there are parents, seniors in the family. Let us celebrate this Diwali with our family together rather than going out, meeting with people, and lighting firecrackers. This is a festival of lights, so one can make rangoli, light show; build earthen forts in the house yard if possible. Utilize holidays to maximum by reading, playing music, or pursuing hobbies. Open your doors for sacred peace, wealth, and prosperity and not for the illness like corona, said CM.- महापालिका प्रशासन- सोसायटी प्रतिनिधींच्या वादावर यशस्वी तोडगा

- चिखली-मोशी-चऱ्होली हाउसिंग सोसायटी फेडरेशनचा पुढाकार

पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):

सोसायटीधारक, बांधकाम व्यावसायिक आणि महापालिका प्रशासनातील जबाबदार अधिकारी यांच्यात असलेल्या सक्षम समन्वयाअभावी सोसायटीधारक रहिवाशांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. मात्र, आमदार महेश लांडगे यांनी या समस्यांचा तात्काळ पाठपुरावा करीत सोसायटीधारकांचे महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावले. याबाबत सोसायटीधारक प्रतिनिधींनी लांडगे यांचे आभार मानले आहेत. 

चिखली-मोशी- चऱ्होली हाउसिंग सोसायटीच्या माध्यमातून सोसायटीधारक नागरिकांसाठी हक्काचे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. पार्किंग, वीज पुरवठा यांसह पायाभूत सोयी-सुविधांबाबत बांधकाम व्यावसायिकांकडून होणारी अडवणूक, सोसायटीधारकांना महापालिका अधिकाऱ्यांकडून मिळणारी दुय्यम वागणूक अशा विविध  मुद्यांवर आमदार लांडगे यांनी संबंधित अधिकारी, सोसायटीधारक प्रतिनिधी यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली होती. या बैठकीत मांडलेल्या विविध तक्रारींमधील बहुतेक प्रश्न मार्गी लावण्यात आले आहेत.


दादा, आपने तो जादू कर दिया…

गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत आमदार लांडगे यांच्यासमोर सोसायटीधारकांनी अनेक तक्रारी आणि समस्या मांडल्या होत्या. त्यापैकी काही समस्यांचे तात्काळ निराकरण करण्यात आले. तसेच, इतर समस्या सोडवण्याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला आदेश दिले आहेत. याबाबत कृतज्ञता म्हणून सोसायटीधारकांच्या प्रतिनिधींनी आमदार लांडगे यांची भेट घेतली. यावेळी एका सोसायटीचे पदाधिकारी म्हणाले की, ‘दादा, आपने तो जादू कर दिया। हमारे सोसायटी का कठीण और महत्त्वपूर्ण मसला सुलजाया, आपने जादू किया।’ अशा शब्दांत सोसायटीधारकांच्या भावना व्यक्त केल्या.

नेवाळे वस्ती- कुदळवाडी येथील अक्षा इलिगन्स या सोसायटीला गेल्या १० वर्षांपासून रस्त्याची समस्या होती.या सोसायटीमध्ये १७० सदनिकाधारक आहेत. त्यांना ये-जा करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. याबाबत संबंधित सोसायटीचे चेअरमन शफीउद्दीन हाश्मी यांनी आमदार महेश लांडगे यांच्याकडे रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत साकडे घातले होते. यावर तात्काळ कार्यवाही करीत आमदार लांडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले आणि रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला. 

 


:प्रतिज्ञापत्र खोटे ठरले असल्याचा ठेवला ठपका

: मावळ मुळशी प्रांताधिकारी संदेश शिर्के यांनी दिले आदेश

वडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क)
 

 पोलीस पाटील पदासाठी अर्ज दाखल केल्यानंतर राजकीय लेटरहेड, जिल्हा परिषद
बोधचिन्ह यांचा वापर केल्याने अर्जासोबत दिलेले प्रतिज्ञापत्र खोटे ठरले असल्याने
तसेच एक गुन्हाही दाखल असल्याचा ठपका ठेवून मावळ मुळशी प्रांताधिकारी संदेश शिर्के
यांनी चांदखेडचे पोलिस पाटील दत्तात्रय माळी यांचे पोलीस पाटील पद रद्द करण्याचा आदेश दिला आहे.
यासंदर्भात चांदखेड येथील अमोल कांबळे, पांडुरंग कदम, प्रशांत होगले, पौरस बारमुख यांनी तक्रार केली होती.
दत्तात्रय माळी यांची चांदखेड गावासाठी इतर मागास प्रवर्गातून पोलीस पाटीलपदी
१ मार्च २०१८ रोजी नियुक्ती करण्यात आली. भरती प्रक्रियेदरम्यान त्यांनी १६ जून २०१७ रोजी कोणत्याही राजकीय
पक्षाचा पदाधिकारी नसल्याचे प्रतिज्ञापत्र दिले होते. ९ ऑगस्ट २०१७ रोजी पक्षाचा
राजीनामा दिला होता.
 ९ ऑगस्ट २०१७ रोजी वनक्षेत्रपाल
मावळ यांना एका राजकीय पक्षाच्या लेटरहेडवर उपोषण करण्याबाबत इशारा
दिला होता, तसेच २७ नोव्हेंबर २०१७ रोजी पोलीस संरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी पोलीस अधीक्षक यांच्याकडे केलेल्या अर्जावर जिल्हा परिषदेच्या
बोधचिन्हाचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केला. याशिवाय, माळी यांच्यावर
शिरगाव पोलिस ठाण्यात ऑगस्ट २०१९ गुन्हा दाखल होऊन अटकेची कारवाई व जामिनावर मुक्तताही झाली होती. त्यामुळे
माळी यांनी प्रक्रियेदरम्यान सादर केलेला प्रतिज्ञापत्र खोटे ठरत असल्याने त्यांचे पोलीस पाटील पद रद्द करण्यात आल्याचा
आदेश मावळ मुळशी प्रांताधिकारी शिर्के यांनी दिला.
या संदर्भात दत्ता माळी यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाहीपुणे,(टाईम न्युजलाईन नेटवर्क) :- सार्वजनिक सुरक्षेच्यादृष्टीने शोभेच्या दारू आणि फटाके व साठा केलेल्या दुकानापासून 100 मीटर परिसरात कोणीही धुम्रपान करु नये तसेच शोभेच्या दारु आणि फटाके व साठा केलेल्या दुकानापासून 100 मीटर परिसरात कोणत्याही प्रकारचे दारू काम करु नये, फटाके उडवू नयेत तसेच शोभेच्या दारुचे रॉकेट परिक्षणासाठी उडवू नयेत, असे आदेश संतोषकुमार देशमुख, उपविभागीय दंडाधिकारी, पुणे यांनी जारी केले आहेत.

हे आदेश शिरुर तालुक्याच्या ग्रामीण भागास (पोलीस आयुक्त पुणे शहर यांचे कार्यक्षेत्राव्यतिरिक्त) दिनांक 18 नोव्हेंबर 2020 पर्यंत लागू राहतील. वरील आदेश मुंबई पोलीस कायदा 1951 च्या नियम 33 (1) (ओ)(यु) अन्वये निर्गमित करण्यात आले असून आदेशाचा भंग करणारी व्यक्ती मुंबई पोलीस कायदा 1951 च्या कलम 131 नुसार शिक्षेस पात्र राहील.


 

          मुंबई, (टाईम न्युुुजलाईन नेटवर्क):

विविध जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नुकसान भरपाईच्या पहिल्या हप्त्यापोटी 2 हजार 297 कोटी 6 लाख 37 हजार रुपयांचा निधी वितरीत करण्याचा आदेश काढण्यात आला आहे.

          मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करून 10 हजार कोटींची नुकसानभरपाई देण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील मदत लगेच वितरीत करण्यात येईल.

          जून ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे किमान 33 टक्के नुकसान झाले आहे. अशा बाधित शेतकऱ्यांना शेतीपिकांच्या (जिरायत व आश्वासित सिंचनाखालील पिके) नुकसानीसाठी रु.10 हजार प्रती हेक्टर व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 25 हजार प्रती हेक्टर या दराने 2 हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्याचे निर्देश आहेत.

 

 

            मुंबई, (टाईम न्युजलाईन नेटवर्क) : बालविवाह (प्रतिबंध) नियम 2008 मध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा ॲड. निर्मला सामंत  प्रभावळकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. त्यासंदर्भातील निर्देश महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सोमवारी आयोजित बैठकीत दिले.

            बालविवाह (प्रतिबंध) नियमामध्ये सुधारणा करण्याबाबत आयोजित बैठकीस महिला व बालविकास विभागाच्या सचिव श्रीमती आय. ए. कुंदनमहिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. ऋषिकेश यशोदउपायुक्त रवी पाटीलउपायुक्त तथा बालसंरक्षण कार्यक्रम व्यवस्थापक श्रीमती मनिषा बिरासीसयुनिसेफच्या बालसंरक्षण तज्ज्ञ अल्पा वोरा आदी उपस्थित होते.

             मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्याबालविवाह रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य बालविवाह प्रतिबंध नियम 2008 ची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. मात्रत्यासाठी नियमातील तरतुदींचा नव्याने आढावा घेत त्यातील त्रुटी काढण्यासह सुधारणा कराव्या लागतील. यासाठी ही समिती नेमण्यात नेमण्यात येत आहे. समितीने नियमामध्ये आवश्यक त्या बदलांच्या अनुषंगाने अभ्यास करुन सुधारित नियमाचा मसुदा तातडीने शासनास सादर करावाअसे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

            राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा  श्रीमती ॲड. निर्मला सामंत-प्रभावळकर यांच्या अध्यक्षतेखाली ही 10 सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. या समितीमध्ये श्रीमती रमा सरोदडॉ.आशा बाजपेयीडॉ.जया सागडे, 'मासूम'च्या संस्था संचालक डॉ.मनिषा गुप्तेविधायक भारतीचे संतोष शिंदेसोशल बिहेवियर चेंज कम्युनिकेशनचे निशिध कुमारयुनिसेफच्या अल्पा वोराउपायुक्त (बालविकास) रवी पाटीलजिल्हा बालसंरक्षण अधिकारी (बुलढाणा) दिवेश मराठे हे सदस्य आहेत.

 

          मुंबई,(टाईम न्युुुजलाईन नेटवर्क) : एसटी कर्मचाऱ्यांच्या मागील ३ महिन्यांच्या थकीत असलेल्या वेतनापैकी ऑगस्ट महिन्याचे वेतन व दिवाळी सणानिमित्त देण्यात येणारा अग्रीम कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होईल अशी माहिती परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत दिली.

           श्री. परब म्हणालेहे तात्पुरते संकट आहे. लवकरच ते दूर होईल. आपल्या कुटुंबावर संकट येऊ देऊ नका. काळ जरी कठीण असला तरीकर्मचाऱ्यांनी  आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे भावनिक अवाहनही परिवहन मंत्री  श्री. परब यांनी केले  .

          श्री. परब म्हणालेकर्मचाऱ्यांच्या राहिलेल्या  उर्वरित २ महिन्याच्या वेतनापैकीसुद्धा एक महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी देण्यात येणार असूनबाकी  एक महिन्याचे वेतनही कर्मचाऱ्यांना लवकर मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.  टाळेबंदीमुळे अत्यावश्यक सेवा वगळता पाच महिने एसटीची प्रवासी वाहतुक बंद होती. याकाळात एसटीला प्रवासी वाहतुकीतून मिळणाऱ्या सुमारे ३ हजार कोटी रुपये महसुली उत्पन्नाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे इतर खर्चवेतनगाड्यांची देखभालबसस्थानकांची पुनर्बांधणी यापोटी थकीत रक्कम वाढत गेली. आणि कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत राहिले आहे. हळूहळू प्रवासी संख्या दिवसागणिक वाढत आहे त्यामुळे लवकरच एसटीचे अर्थकारण पूर्वपदावर येईल.  कर्मचाऱ्यांचे वेतन व अनुषंगिक खर्चासंदर्भात मदतीसाठी शासनाकडे विनंती करण्यात आली असल्याचेही श्री. परब यांनी सांगितले.

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget