वडगाव मावळ (टाईम न्यूजलाईन नेटवर्क): महिला कोणत्याच क्षेत्रात मागे नाही.वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.त्यातीलच एक महिला
रानावनात फिरून वनांचे रक्षण करणे,वन्य जीवांची शिकार थांबविणे,वृक्षलागवडचा संदेश देणें,नागरिकांना वन्य प्राणी व वृक्ष लागवडी व संरक्षणासाठी जनजागृती करण्याचे काम मावळ मधील नियत क्षेत्र वन अधिकारी ऐश्वर्या वाघमारे करीत आहे.त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्याचा पाठिंबा मिळत असल्यामुळे त्यांनी कामात झोकून दिले आहे.
मावळ तालुक्यात वन विभागात ऐश्वर्या वाघमारे या नियत क्षेत्र वन अधिकारी बेबड ओहळ (रेंज वडगाव) य पदावर कार्यरत आहेत.मावळात असलेली वन विभागात वाघमारे या महिला असूनही निर्भीडपणे कर्तव्य बजावत आहेत.त्या स्वतः निसर्ग प्रेमी असल्यामुळे त्या आपल्या विभागाच्या कार्यात झोकून देत आहे.वन परीक्षेत्र अधिकारी सोमनाथ ताकवणे यांच्या मार्गदर्शनमुळे त्यांनी दिवड ओवळे परिसरात वन्य जीवाची शिकार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.तर पवन मावळ परिसरात झाडे लावा झाडे जगवा हा संदेश नागरिकांमध्ये रुजवला आहे.
वाघमारे या वन रक्षण करण्यासाठी गावगावात समित्या स्थापन करून वनांचे रक्षण कसे करायचे या बाबत जनजागृती करीत आहे.वृक्षारोपण करण्यासाठी त्या गावातील ग्रामस्थांना प्रोसाहित करत आहेत. तर वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्यांची चौकशी करून वरिष्ठाच्या आदेशानुसार शिकऱ्यांवर कारवाई केली .शिकाऱ्यांवर होत असलेल्या कारवाईमुळे वन्य प्राण्यांच्या शिकारी थांबल्या आहे. वनक्षेत्रातील मोठ्याप्रमाणात असणारी गुन्हेगारी जनजागृती करून थांबविली.त्यामुळे वनक्षेत्रात वन्य प्राण्याचा वावर मुक्तपणे होत असल्याचे दिसून येत आहे.
ऐश्वर्या वाघमारे या निसर्ग प्रेमी असल्यामुळे त्या काम प्रामाणिकपणे करीत आहे. ग्रामीण भागात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.