अपहरण करून खून करणारा आरोपी गजाआड



पिंपरी (टाईम न्यूजलाईन नेटवर्क) – उसने पैसे माघारी देत नसल्याने व छेड काढल्याच्या कारणावरून एक तरूणाचे अपहरण केले.कासारसाई येथे घेऊन जाऊन जेसीबीच्या मदतीने खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जमिनीत पुरला. एक आरोपीस पोलिसांनी अटक केली.
संतोष शेषराव अंगरख (वय ४२, रा. पोलीस कॉलनी, रहाटणी) असे खून झालेल्याचे नाव आहे.या प्रकरणी शेषराव रंगनाथ अंगरख (वय ६३) यांनी बुधवारी (दि. २) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
 त्यानुसार पोलिसांनी गणेश सुभेदार पवार आणि त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. यातील गणेश पवार याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा संतोष यांनी आरोपी गणेश याच्याकडून व्यवसायासाठी उसने पैसे घेतले होते. त्या पैशाच्या कारणावरून त्यांच्यात वाद सुरु होता. दरम्यान, गणेश आणि त्याच्या दोन साथीदारांनी १६ ऑगस्ट २०२० रोजी संतोष याचे रहाटणी येथून अपहरण केले. त्यानंतर त्याचा खून करून मृतदेह कासारसाई येथे पुरला. या प्रकरणाचा तपास करीत असताना एपीआय हरीचंद्र माने यांना आरोपींबाबत माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी आरोपी गणेश याला ताब्यात घेत चौकशी केली.मात्र त्याचे जबाब वेळोवेळी बदलत होते.पोलिसांनी खाक्या दाखविताच  त्याने खूनाची कबुली दिली.
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget