पीसीएनटीडीए ’, ‘पीएमआरडीए’ मधील सदनिकांवरील मुद्रांक शुल्कात कपात करा!




- उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी 

- भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांचे निवेदन

पिंपरी (टाईम न्यूजलाईन नेटवर्क)
कोरोना विषाणु आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, पुणे महानगर विकास प्राधिकरण
औद्योगिक विकास महामंडळ आदी क्षेत्रातील सदनिका, मिळकतींवरील मुद्रांक शुल्कात कपात करावी, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या जवळपास २५ लाखांच्या घरात आहे. शहरात कामगार व मध्यमवर्गीय लोकसंख्या जास्त आहे. कोरोना महामारीमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले असून दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत आहे.
दरम्यान, राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी मुद्रांक शुल्कांत सवलत देवून सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता हातभार लावला आहे. सदरची मुद्रांक शुल्क सवलत प्राधिकरण, एमआयडीसी, सिडको, हडको इत्यादीमार्फत बांधलेल्या सदनिका खरेदी करण्याकरिता लागू केल्यास त्याचा फायदा बहुसंख्यांना होईल, अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली आहे.

Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget