पुण्यात कोविड १९ बाधित पत्रकारांसाठी हॉस्पिटल मध्ये राखीव बेड ची सुविधा मिळावी
 जिल्हाधिकारी यांना पुणे जिल्हा पत्रकार संघाचे दिले निवेदन

पुणे  ( टाईम न्यूजलाईन नेटवर्क )
सध्या सर्वञ कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीपासून  पञकार प्रशासनास सहकार्य करीत आहेत.कोरोनाबाधित पत्रकारांची वाढती संख्या  आणि विद्यमान व्यवस्थेत त्यांची होणारी हेळसांड टाऴण्यासाठी प्रत्येक शासकीय आणि धर्मदाय आयुक्तांच्या अखत्यारित येणार्‍या खासगी रूग्णालायात बाधित पत्रकारांसाठी राखीव बेडची व्यवस्था करावी अशा मागणीचे जिल्हाधिकारी डाँ. राजेश  देशमुख यांना पुणे जिल्हा पञकार संघाने निवेदन देवून सविस्तर चर्चा केली.यावेळी त्यांच्यासमवेत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डाँ.जयश्री कटारे यांनाही हे निवेदन देण्यात आले.
        कोविड-19 ने बाधित होणार्‍या पत्रकारांची वाढती संख्या आणि रूग्णालयांमध्ये उपचारासाठी गेलेल्या पत्रकारांची होणारी हेळसांड लक्षात घेऊन रूग्णालायांत पत्रकारांसाठी राखीव बेडची व्यवस्था व्हावी अशा मागणीचे निवेदन राज्यातील सर्व जिल्हा पञकार संघानी द्यावे असे आवाहन मराठी पञकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी केले होते.त्यानुसार मराठी पञकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे व पुणे विभागीय सचिव बापूसाहेब गोरे यांच्या सूचनेनुसाय पुणे जिल्हा
पञकार संघाने हे निवेदन तातडीने दिले.
    पुणे येधील जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन व चर्चेप्रसंगी पुणे जिल्हा पञकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर ,परिषद प्रतिनिधी एम.जी.शेलार,जिल्हा समन्वयक सुनीलनाना जगताप ,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सुनील वाळुंज,कार्यकारीणी सदस्य  दादाराव आढाव,अमित टाकळकर,हवेली पञकार संघाचे सचिव अमोल भोसले,संघटक सुनील सुरळकर (धिवर) ,प्रमोद गव्हाणे उपस्थित होते.
       पुणे जिल्हा पञकार संघाने यावेळी जिल्हाधिकारी डाँ.राजेश देशमुख  यांच्याशी चर्चा करीत असताना  राज्यात कोरोनामुळे मृत पावलेल्या पञकारांच्या कुंटुंबियांना राज्यशासनाने केलेल्या घोषणेप्रमाणे ५० लक्ष रुपयांची मदत तातडीने देण्यात यावी तसेच पुणे येथे कोरोनामुळे मृत्यू पावलेले तरुण पञकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू त्यांना वेळेवर उपचार न मिळाल्याने झाला आहे.रायकरांचे निधन हा अनास्थेचा बळी असल्याची संतप्त भावना राज्यातील माध्यम जगतात उमटली.रायकर यांना अ‍ॅम्बुलन्स मिळाली असती आणि त्यांना ऑक्सीजन मिळाला असता तर एक तरूण,उमदा पत्रकार आपणास सोडून गेला नसता.याला दोषी असणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणीही केली.
    जिल्हाधिकारी डाँ.राजेश  देशमुख  यांनी  पुणे जिल्हा  पञकार संघाच्या शिष्टमंडळाला  सर्व मागण्यांचा प्राधान्याने विचार करुन वरिष्ठांना तातडीने कळून पञकारांना न्याय देण्याची भूमिका घेवू असे आश्वासन दिले.


Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget