मुंबई :ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत आहे. काल दिवसभरात ४ हजार १५३ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आली. यापैकी मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात ३ हजार ८५८ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.
मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर, राज्यात एकूण १०,७९१ किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्तीपैकी ९,५७९ अनुज्ञप्ती सुरू आहेत. राज्य शासनाने ३ मे, २०२० पासुन लॉकडाऊन कालावधीत सीलबंद मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहे. राज्यात १५ मे २०२० पासून घरपोच मद्यविक्री योजना अंमलात आली असून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने तयार केलेल्या https://aaplesarkar.mahaonline
ऑनलाईन मद्यसेवन परवाना घेतांना येत असलेल्या सर्व तांत्रिक अडचणींची सुधारणा करण्यात आली असून आता इच्छुक व्यक्ती संगणक, लॅपटॉप, अँड्रॉइड फोन, तसेच IOS प्रणालीव्दारे ऑनलाईन परवाने घेऊ शकतात. तसेच कोणाला ऑनलाईन परवाना घ्यायाचा नसेल तर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व अधीक्षक/निरीक्षक/दुय्यम निरीक्षकांच्याकार्यालयात दररोज मद्यसेवन परवाने Offline पध्दतीने सुध्दा उपलब्ध आहेत. सदर मद्यसेवन परवाने एक वर्षाकरीता रु. १००/- किंवा आजीवन परवान्याकरीता रु.१,०००/- एवढे शुल्क अदा करुन मिळू शकतात.
दि. २४ मार्च, २०२० पासुन राज्यात लॉकडाऊन सुरु झाले. महाराष्ट्र राज्यात शेजारील राज्यांमधुन होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी सर्व विभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असुन १२ सीमा तपासणी नाक्यांवर विभागातील अधिकारी / कर्मचारी तैनात आहेत. दि. १६ सप्टेंबर २०२० रोजी राज्यात ८९ गुन्हे नोंदविण्यात आले असून ५० आरोपींना अटक करण्यात आली असून २५ लाख ३० हजार रूपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि.२४ मार्च, २०२० पासुन दि. १५ सप्टेंबर २०२० पर्यंत राज्यात एकूण १८,०७४ गुन्हे नोंदविण्यात आले असून ९,७६४ आरोपींना अटक करण्यात आली. १,६८० वाहने जप्त करण्यात आली असून ४१ कोटी ७७ लाख रुपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध मद्य निर्मिती वाहतूक, विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष २४X७ सुरू आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.