लोणावळ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा: रोकड हस्तगत


लोणावळा (टाईम न्यूजलाईन नेटवर्क) – लोणावळ्यातील  नामांकित हॉटेलात रंगलेल्या “हायप्रोफाइल’ जुगारावर लोणावळा पोलिसांनी छापा टाकून रोकड हस्तगत केली.
या कारवाईत गुजरात येथील 60 व्यापाऱ्यांसह सर्व्हिस प्रोव्हाईड करणाऱ्या 12 महिला तसेच  धिरजलाल कुमार ऐलानी,  अन्वर शेख (दोघेही राहणार मुंबई), आणि या जुगाराचे नियोजन करणारा झिशान इरफान ईलेक्ट्रिकवाला (वय 34, रा. जोगेश्वर वेस्ट मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस शिपाई विकास कदम यांनी  फिर्यादी दिली.
लोणावळा शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या  रिसॉर्टमध्ये दुसऱ्या मजल्यावरील हॉलमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्र येऊन जुगार खेळत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत यांना मिळाली. त्यानंतर रविवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास कॉंवत यांच्यासह लोणावळा शहरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी, पोलीस उपनिरीक्षक मृगदीप गायकवाड, पल्लवी वाघोले, अश्विनी लोखंडे, विकास कदम, शंकर धनगर, सागर धनवे, ईश्वर काळे, सतिष कुदळे यांच्या पथकाने छापा टाकला.
 रिसॉर्टमध्ये  दुसऱ्या मजल्यावरील हॉलमध्ये सहा टेबल लावत जुगार सुरू होती. पोलिसांनी धाड टाकत खेळात वापरलेली 3 लाख 20 हजार 830 रुपयांची रोकड, 6 हजार 343 रुपयांची दारू, खेळासाठी वापरण्यात येणारे 1000 रुपये किंमतीचे 36 लाख 60 हजार रुपयांचे टोकन व 500 रुपये किंमतीचे 4 लाख 75 हजार रुपयांचे टोकन जप्त केले आहेत.
या प्रकरणी सहाय्यक पोलीस अधिक्षक नवनीत कॉंवत यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा शहरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी हे तपास करीत आहे

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget