राष्ट्रवादी कार्यालय व विरोधी पक्षनेता कार्यालयात येथे तक्रार करण्याचे आवाहन
पिंपरी (टाईम न्यूजलाईन नेटवर्क):
पिंपरी चिंचवड शहरामध्ये सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे. कोरोना संसर्गावर नियत्रंण आणण्यासाठी मनपा प्रशासन प्रयत्न करीत आहे. शहरातील सरकारी तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर वैद्यकीय उपचार चालू आहेत. त्याच प्रमाणे राज्य शासनाकडूनही आवश्यक ती मदत मिळत आहे तसेच जंम्बो हास्पिटल नेहरुनगर व अँटो क्लस्टर येथे उभारण्यात आले आहे. एकुण शहरातील सरकारी व खाजगी वैद्यकीय यंत्रणा यासाठी काम करीत आहे.
परंतु मनपाच्या काही रुग्णांलयांमध्ये कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करताना आवश्यक असणारी औषधे तसेच इंजेक्शन हे बाहेरुन आणावे लागत असल्याबाबतच्या तक्रारी रुग्णांच्या नातेवाईकांकडून प्राप्त होत आहे. कोरोना सारख्या महामारीमध्ये शहरातील सर्व सामान्य अगोदरच धास्तावलेला आहे. अशावेळी त्यांच्याकडून महागडी औषधे व इंजेक्शन बाहेर मागल्यास त्यांची आर्थिक पिळवणूक योग्य नाही.
या पार्श्वभूमीवर मी पिंपरी चिंचवड शहरातील नागरीकांना विनंती करतो की, मनपाच्या कोणत्याही रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांस बाहेरून औषधे किंवा इंजेक्शन आणण्यास सांगितल्यास त्याबाबत माझ्या कार्यालयात, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या पार्टी कार्यालयात किंवा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या कुठल्याही नगरसदस्याकडे व शहरातील कोणत्याही राष्ट्रवादी पदाधिका-यांकडे लेखी स्वरुपात तक्रारी देण्यात याव्यात म्हणजे त्यांची योग्य दखल घेण्यात येऊन औषधांचा व इंजेक्शनचा काळाबाजार करणा-या कोणत्याही दर्जांच्या हॉस्पिटल, मेडीकल व डॉक्टर यांची गय केली जाणार नाही. याची या पत्रकाव्दारे पिंपरी चिंचवड शहरातील तमाम नागरीकांना आवाहन करीत आहे.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.