- गुन्हे शाखेने युनिट 1 ने आवळल्या मुसक्या
- चोरट्यांकडून दहा दुचाकी हस्तगत
पिंपरी (टाईम न्यूजलाईन नेटवर्क)– मौजमजेसाठी वाहन चोरी करून त्यांची विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी भोसरीत अटक केली.
चोरीच्या दहा दुचाकी हस्तगत केल्या. गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ही कामगिरी केली.
स्वप्नील राजू काटकर (वय 19, रा. दिघीरोड, आदर्शनगर, भोसरी) आणि राहूल मोहन पवार (वय 19, रा. मधुबन सोसायटी, चक्रपाणी वसाहत, भोसरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे कर्मचारी गस्त घालत असताना पोलीस कर्मचारी गणेश सावंत व नितिन खेसे यांना माहिती मिळाली की दोघेजण भोसरी येथील पुलाखाली दुचाकीसह संशयितरित्या उभे आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा लावून दोघांना अटक केली.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.