पिंपरी (टाईम न्यूजलाईन नेटवर्क):- प्रसिद्ध उद्योजक एस कुदळे ग्रूप व चाकणमधील यशस्वी क्रेन व्यवसायिक अमोल सोनवणे यांच्यासोबत एसके ट्रॅक्टर्स (सोनवणे कुदळे) या नावाने शेतकऱ्यांच्या सेवेत रूजू झाले आहे. एस के ट्रॅक्टर्सचे शो रूम चाकण कुरुळी कल्याणी भारत फोर्ज समोर तर सोमाटणे फाटा येथील पवना रुग्णालयाशेजारी, कामशेत,पेण- रायगड व राजगूरू नगर अशा पाच ठिकाणी कार्यरत झाले आहे.
स्वराज महिंद्रा ट्रॅक्टर चे सोपान रायकर हे प्रथम ग्राहकाचे मानकरी ठरले.
कुदळे हे १९३२ पासून सेवा क्षेत्रात कार्यरत आहे. मारुती सुझुकी कार या
नामांकित कंपन्यांची डीलरशिप आहे.
आता सोनवणे यांच्या सहकार्याने महिंद्रा स्वराज ट्रॅक्टरची डिलरशिप घेवून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या सेवेत दाखल झाले आहे.
यामुळे चाकण, तळेगाव,लोणावळा, कामशेत व कोकण या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. सवराज ट्रॅक्टर हा Pजागतिक स्तरावर अग्रेसर ब्रॅन्ड असून अगदी शेतकऱ्यांना परवडेल अशा किफायतशीर दरामध्ये उपलब्ध आहे.लॉकडाऊनच्या काळात देखील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा स्वराजच्या ट्रॅक्टरला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पारंपारिक शेतीला आधुनिक ट्रॅक्टरची जोड दिल्यास शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार असल्याची माहिती संचालक नीरज कुदळे यांनी दिली. तर शेतकरी बांधव यांना संपूर्ण सेवा देऊ.असे अमोल सोनवणे म्हणाले.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.