August 2020


पुणे (टाईम न्यूजलाईन नेटवर्क) :   लाळ खुरकुत  या रोगामुळे पशुधनाचे मोठे नुकसान होते. त्याचा विचार करुन केंद्र शासनाने राज्य शासनाच्या मदतीने जिल्हयातील सर्व पशुधनास लाळ खुरकुत रोगाविरुध्द प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचे नियोजित केले आहे.
पुणे जिल्हयामध्ये एकूण 1756064 इतके पशुधन असून त्यापैकी गाय व म्हैस वर्ग पशुधन 1099344 पशुधन संख्या असून या सर्व पशुधनास दिनांक 1 सप्टेंबर 2020 ते 15.10.2020 या कालावधी दरम्यान लाळ खुरकुत रोगाविरुध्द प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येणार आहे., या लसीकरण कार्यक्रमाकरीता आवश्यक एकूण 1031000 लस मात्रा जिल्हयास प्राप्त झालेली असून सदर  लसीकरण कार्यक्रमाकरीता आवश्यक साधन सामुग्री जसे सिरींज, निडल्स व लस टोचणी यंत्रांचा पुरवठा पशुवैद्यकीय दवाखाना स्तरावर करण्यात आलेला आहे.
         पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी या रोगाचे आर्थिक महत्व लक्षात घेऊन याबाबत संपूर्ण देशामध्ये एकाच वेळी लसीकरण करुन सन 2030 पर्यंन्त लाळ खुरकुत रोगाचे पूर्ण नियंत्रण करण्याचे नियोजित केले आहे. या रोगामुळे पशूधनाच्या उत्पादन क्षमतेमध्ये घट होऊन दूध उत्पादन  मोठया प्रमाणात कमी होते. तसेच वांझपणा अशक्तपणामुळे शारीरिकदृष्टया पशुधन कमकुवत होत असते. या रोगाची लागण देशात होत असल्याकारणाने मोठया प्रमाणात मांस निर्यातीला फटका बसत आहे. हा रोग पूर्णत: नियंत्रणात आल्यास मोठया प्रमाणात मांसाची निर्यात परदेशात होऊन परदेशी चलन देशास उपलब्ध होऊ शकते.
या रोगाचे महत्व लक्षात घेऊन जिल्हयातील सर्व पशुपालकांनी -   लाळ खुरकुत  हे लसीकरण करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हयाचे पालकमंत्री अजित  पवार यांनी केले असल्याची माहिती  जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.शितलकुमार मुकणे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वे दिलेली आहे.


राजेवाडी (टाईम न्यूजलाईन नेटवर्क): राजेवाडी येथील उद्योजक  मधुकर विष्णू  राजीवडे (50) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.ह.भ.प. शांताराम महाराज राजीवडे,उद्योजक सुदाम राजीवडे यांचे ते बंधू होत.
त्याच्या मागे दोन विवाहित मुली,पत्नी,दोन भाऊ,पुतण्या,  आई असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने दिवड परिसरात शोककळा पसरली.


पुणे, (टाईम न्यूजलाईन नेटवर्क) :-उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुखकर्ता, विघ्नहर्ता श्रीगणरायांच्या चरणी वंदन केलं असून राज्यावरील कोरोनाचं संकट दूर कर, महाराष्ट्राला लवकर कोरोनामुक्त कर, असं साकडं श्री गणपती बाप्पांना घातलं आहे. बाप्पांच्या आगमनानं घराघरात आनंद, उत्साह, चैतन्याचं, भक्तीचं वातावरण निर्माण झालं आहे. भक्तीमय वातावरणात साजरा होत असलेला यंदाचा गणेशोत्सव कोरोनाप्रतिवबंधक नियमांचं पालन करुन साजरा होईल. श्रीगणरायांच्या आशिर्वादाने संपूर्ण महाराष्ट्र लवकरंच कोरोनामुक्त होईल, असा विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला श्रीगणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार श्रीगणेशोत्सवानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, कोरोना संकटामुळे गणेशभक्तांनी घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव यंदा गर्दी टाळून, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून साधेपणानं साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. सामाजिक जाणीवेतून गणेशोत्सव साधेपणानं साजरा होत असला तरी, आनंद, उत्साह, भक्तीमध्ये जोश कायम आहे. त्यात उणीव नाही. बुद्धीची देवता असलेल्या श्रीगणरायांच्या समस्त भक्तांनी श्रीगणेशोत्सवासंदर्भात घेतलेल्या कौतुकास्पद निर्णयामुळे राज्यातील कोरोनाचा संसर्ग रोखला जाईल तसंच श्री गणपती बाप्पांच्या कृपेने महाराष्ट्र लवकर कोरोनामुक्त होण्यास मदत होईल, असा मला विश्वास आहे, असं सांगून उपमुख्यमंत्र्यांनी गणेशोत्सव काळात सुरक्षिततेची काळजी घेण्याचं आवाहन सर्वांना केलं आहे.  पुणे (टाईम न्यूजलाईन नेटवर्क):-केंद्र शासनामार्फत नागरी भागातील स्वच्छताविषयक कामांचे सर्वेक्षण 2020 चा निकाल             20 ऑगस्ट रोजी जाहीर झाला असल्याची माहिती जिल्हा प्रशासन अधिकारी चंद्रकांत खोसे यांनी दिली.
   पुणे जिल्ह्यातील सासवड नगरपरिषदेचा देशात दुसरा व लोणावळा नगरपरिषदेचा देशात तिसरा क्रमांक प्राप्त झाला आहे. तसेच जेजुरी नगरपरिषदेचा सहावा तर इंदापूर नगरपरिषदेचा 14 वा क्रमांक व देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड चा 8 वा क्रमांक प्राप्त झाला आहे. 
  वरील पुरस्कार प्राप्त सासवड व लोणावळा नगरपरिषद यांना केंद्रीय नगरविकास मंत्री हरमनप्रीत कौर यांचे हस्ते मंत्रालय, मुंबई येथे व इंदापूर नगरपरिषद, जेजुरी नगरपरिषद, देहूरोड कॅन्टोंमेंट बोर्ड यांना जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे दूरचित्र संवादाच्या माध्यमातून पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, नगर विकास विभागाच्या तत्कालीन प्रधान सचिव श्रीमती मनिषा म्हैसकर हे मंत्रालय स्तरावर तर जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख,देहू कॅन्टोंन्मेंटचे उपाध्यक्ष रघुवीर शेलार, मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरुप हरीतवाल, इंदापूरच्या नगराध्यक्षा श्रीमती अंकिता शहा, मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल, जेजुरी नगराध्यक्षा श्रीमती विणा हेमंत सोनवणे, मुख्याधिकारी श्रीमती पुनम कदम, जिल्हा प्रशासन अधिकारी चंद्रकांत खोसे, न.पा. प्रशासन सहा.संचालक रामनिवास झंवर, विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित होते.
   अमृत सिटी शहरांतर्गत पुणे महानगरपालिकेचा लोकसंख्यानिहाय वर्गीकरनात देशात 15 वा तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा 24 वा क्रमांक आला आहे. मंत्रालय स्तरावर वितरीत पुरस्कारासाठी सासवड नगराध्यक्ष मुख्याधिकारी मार्तंड भोंडे, मुख्याधिकारी विनोद जळक व लोणावळा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, तत्कालीन मुख्याधिकारी सचिन पवार उपस्थित होते. कॅन्टोन्मेंट विभागात देशात देहूरोड 8वा, खडकी 12वा तर पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचा 25 वा क्रमांक प्राप्त झाला आहे.
  पुणे जिल्ह्यातील इतर न.प.चा पश्चिम विभागीय झोननिहाय निकाल जाहीर झाला असून लोकसंख्यानिहाय वर्गीकरणानुसार पश्चिम विभागात तळेगाव दाभाडे न.प. 8 वा, शिरूर 16, जुन्नर 22, चाकण 32, भोर 33, बारामती 42, आळंदी 46, दौंड 52, राजगुरूनगर 219 क्रमांक मिळाला आहे. तसेच पश्चिम विभागीय झोनमध्ये इंदापूर व जेजुरी नगरपरिषदेस विशेष पारितोषिक प्राप्त झाले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुणे जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचे  स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये केलेल्या कामगिरिबद्दल पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे, असे जिल्हा प्रशासन अधिकारी चंद्रकांत खोसे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये  कळविले आहे.    पुणे (टाईम न्यूजलाईन नेटवर्क)
:कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व वाढती रुग्णसंख्या विचारात घेता मेडीकल ऑक्सीजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी व भविष्यातील वाढती मागणी लक्षात घेता एअर लिक्वीड इंडिया होल्डींग प्रा.लिमिटेड चाकण, ता. खेड या कंपनीस मेडीकल ऑक्सीजन उत्पादन सुरु करणे आवश्यक आहे. एअर लिक्वीड इंडिया होल्डींग प्रा.लिमिटेड चाकण कंपनीला विद्युत जोडणी करण्यासाठी परिसरातील इतर कंपन्यांचा विद्युत पुरवठा ठराविक कालावधीकरीता बंद करण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आयुष प्रसाद  यांनी दिले आहेत.
  एअर लिक्वीड या कंपनीस मेडीकल ऑक्सीजन उत्पादन सुरु करण्याकरीता एअर लिक्वीड इंडिया होल्डींग प्रा. लिमिटेड चाकण या कंपनीस विद्युत जोडणी करण्यासाठी  132 के.व्ही. चिंचवड- चाकण विद्युत वाहिनी, 220 के.व्ही. व्होकसवॅगन ते 220 के.व्ही. चाकण उपकेंद्र ही वाहिनी  व 220 के.व्ही. चाकण उपकेंद्रामधून निघणारे सर्व 22 के.व्ही. व 132 के. व्ही. वाहिनीचा पुरवठा दिनांक 15 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी  9  ते  सायंकाळी 5 या कालावधीत बंद करण्यात येणार आहे.
  पुणे जिल्हयात आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये कोवीड-19 साथीच्या रोगाच्या नियंत्रणासाठी, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व वाढती  रुग्णसंख्या विचारात घेता मेडीकल ऑक्सीजनचा उत्पादन व पुरवठा सुरळीत होण्यासाठी व भविष्यातील वाढती मागणी लक्षात घेता एअर लिक्वीड इंडिया होल्डींग या कंपनीस मेडीकल ऑक्सीजन उत्पादन सुरु करणेकरीता हा आदेश पारीत करण्यात आला आहे.
  मे.आयनॉक्स एअर प्रोडक्टस प्रा. लि. चाकण व मे टायोनिपॉन सॅनसो इंडिया प्रा. लि. चाकण यांच्या मेडीकल ऑक्सीजन उत्पादनावर देखील या विद्युत पुरवठा बंद कालावधीचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मे.आयनॉक्स एअर प्रोडक्टस प्रा. लि.चाकण व मे टायोनिपॉन सॅनसो इंडिया प्रा. लि. चाकण यांनी सध्या होत असलेला मेडीकल ऑक्सीजनचा पुरवठा दिनांक 15 ऑगस्ट 2020 रोजी व तद्नंतर देखील विनाअडथळा सुरळीत राहील, याची दक्षता घेण्याच्या सूचना या आदेशान्वये देण्यात आल्या आहेत. या दिवशी ज्या रुग्णालयांना ते मेडीकल ऑक्सीजनचा पुरवठा करतात, त्यांच्याशी मागणी बाबत समन्वय ठेवून आवश्यक तो मेडीकल ऑक्सीजनचा पुरवठा करावा. कोणत्याही परिस्थीतीत रुग्णांची गैरसोय होणार नाही याबाबतची जबाबदारी संबंधित कंपन्यांची राहिल.
  एअर लिक्वीड इंडिया होल्डींग प्रा. लिमिटेड, चाकण ही कंपनी इतर राज्यात मेडीकल ऑक्सीजन चे उत्पादन करीत असल्याने त्यांनी बंद कालावधीमध्ये मेडीकल ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत सुरु राहण्यांकरीता आयनॉक्स एअर प्रोडक्टस चाकण व टायोनिपॉन चाकण यांच्याशी समन्वय साधून मेडीकल ऑक्सीजन पुरवठा करण्याची जबाबदारी एअर लिक्वीड इंडिया होल्डिंग, चाकण यांची राहील. त्यापुढे पुणे शहरातील व जिल्हयातील शासकीय रुग्णालये व इतर रुग्णालये यांना मेडीकल ऑक्सीजनचा पुरवठा नेहमीप्रमाणे सुरळीत राहील, याची जबाबदारी आयनॉक्स एअर प्रोडक्टस प्रा. लि. चाकण ता. खेड व टायोनिपॉन चाकण ता, खेड यांची राहील. एअर लिक्वीड इंडिया होल्डींग प्रा. लिमिटेड चाकण या कंपनीस विद्युत जोडणी करण्याकरीता दिलेल्या वेळेत काम पूर्ण करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीची राहील.
  या आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय साथ रोग नियंत्रण नयम 1897 तसेच भारतीय दंड विधान 1860 चे कलम 188 प्रमाणे सर्व संबंधित दंडनिय कार्यवाहीस पात्र राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.    पुणे (टाईम न्यूजलाईन नेटवर्क)
:कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व वाढती रुग्णसंख्या विचारात घेता मेडीकल ऑक्सीजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी व भविष्यातील वाढती मागणी लक्षात घेता एअर लिक्वीड इंडिया होल्डींग प्रा.लिमिटेड चाकण, ता. खेड या कंपनीस मेडीकल ऑक्सीजन उत्पादन सुरु करणे आवश्यक आहे. एअर लिक्वीड इंडिया होल्डींग प्रा.लिमिटेड चाकण कंपनीला विद्युत जोडणी करण्यासाठी परिसरातील इतर कंपन्यांचा विद्युत पुरवठा ठराविक कालावधीकरीता बंद करण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आयुष प्रसाद  यांनी दिले आहेत.
  एअर लिक्वीड या कंपनीस मेडीकल ऑक्सीजन उत्पादन सुरु करण्याकरीता एअर लिक्वीड इंडिया होल्डींग प्रा. लिमिटेड चाकण या कंपनीस विद्युत जोडणी करण्यासाठी  132 के.व्ही. चिंचवड- चाकण विद्युत वाहिनी, 220 के.व्ही. व्होकसवॅगन ते 220 के.व्ही. चाकण उपकेंद्र ही वाहिनी  व 220 के.व्ही. चाकण उपकेंद्रामधून निघणारे सर्व 22 के.व्ही. व 132 के. व्ही. वाहिनीचा पुरवठा दिनांक 15 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी  9  ते  सायंकाळी 5 या कालावधीत बंद करण्यात येणार आहे.
  पुणे जिल्हयात आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये कोवीड-19 साथीच्या रोगाच्या नियंत्रणासाठी, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व वाढती  रुग्णसंख्या विचारात घेता मेडीकल ऑक्सीजनचा उत्पादन व पुरवठा सुरळीत होण्यासाठी व भविष्यातील वाढती मागणी लक्षात घेता एअर लिक्वीड इंडिया होल्डींग या कंपनीस मेडीकल ऑक्सीजन उत्पादन सुरु करणेकरीता हा आदेश पारीत करण्यात आला आहे.
  मे.आयनॉक्स एअर प्रोडक्टस प्रा. लि. चाकण व मे टायोनिपॉन सॅनसो इंडिया प्रा. लि. चाकण यांच्या मेडीकल ऑक्सीजन उत्पादनावर देखील या विद्युत पुरवठा बंद कालावधीचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मे.आयनॉक्स एअर प्रोडक्टस प्रा. लि.चाकण व मे टायोनिपॉन सॅनसो इंडिया प्रा. लि. चाकण यांनी सध्या होत असलेला मेडीकल ऑक्सीजनचा पुरवठा दिनांक 15 ऑगस्ट 2020 रोजी व तद्नंतर देखील विनाअडथळा सुरळीत राहील, याची दक्षता घेण्याच्या सूचना या आदेशान्वये देण्यात आल्या आहेत. या दिवशी ज्या रुग्णालयांना ते मेडीकल ऑक्सीजनचा पुरवठा करतात, त्यांच्याशी मागणी बाबत समन्वय ठेवून आवश्यक तो मेडीकल ऑक्सीजनचा पुरवठा करावा. कोणत्याही परिस्थीतीत रुग्णांची गैरसोय होणार नाही याबाबतची जबाबदारी संबंधित कंपन्यांची राहिल.
  एअर लिक्वीड इंडिया होल्डींग प्रा. लिमिटेड, चाकण ही कंपनी इतर राज्यात मेडीकल ऑक्सीजन चे उत्पादन करीत असल्याने त्यांनी बंद कालावधीमध्ये मेडीकल ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत सुरु राहण्यांकरीता आयनॉक्स एअर प्रोडक्टस चाकण व टायोनिपॉन चाकण यांच्याशी समन्वय साधून मेडीकल ऑक्सीजन पुरवठा करण्याची जबाबदारी एअर लिक्वीड इंडिया होल्डिंग, चाकण यांची राहील. त्यापुढे पुणे शहरातील व जिल्हयातील शासकीय रुग्णालये व इतर रुग्णालये यांना मेडीकल ऑक्सीजनचा पुरवठा नेहमीप्रमाणे सुरळीत राहील, याची जबाबदारी आयनॉक्स एअर प्रोडक्टस प्रा. लि. चाकण ता. खेड व टायोनिपॉन चाकण ता, खेड यांची राहील. एअर लिक्वीड इंडिया होल्डींग प्रा. लिमिटेड चाकण या कंपनीस विद्युत जोडणी करण्याकरीता दिलेल्या वेळेत काम पूर्ण करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीची राहील.
  या आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय साथ रोग नियंत्रण नयम 1897 तसेच भारतीय दंड विधान 1860 चे कलम 188 प्रमाणे सर्व संबंधित दंडनिय कार्यवाहीस पात्र राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. 
पिंपरी (टाईम न्यूजलाईन नेटवर्क):
पिंपरी-चिंचवड शहरातील पाणी समस्या निकालात काढण्यासाठी अखेर यश मिळाले. शहराला सुमारे १०० ‘एमएलडी’ पाणी पुरवठा नियमित होईल, असा नवा स्त्रोत आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने निर्माण झाला असून, २०२१ च्या अखेरपर्यंत पाणी पुरवठा प्रकल्प कार्यान्वयीत होणार आहे.
 
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने चिखली येथील नियोजित जलशुद्धीकरण केंद्र ते देहू अशुद्ध जलउपसा केंद्रापर्यंत एम. एस. जलवाहिनी पुरवणे व टाकणे कामाचे भूमिपूजन मंगळवारी (दि.११) करण्यात आले.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सूचवलेल्या ‘फिजिकल डिस्टंसिंग’ च्या नियमांचे पालन करुन हा कार्यक्रम घेण्यात आला.
 
यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, आमदार महेश लांडगे, लक्ष्मण जगताप, खासदार श्रीरंग बारणे, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, अण्णा बनसोडे, सग्राम थोपटे, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके आदी उपस्थित होते. 
 Mumbai,(timenewsline network) : State Environment Minister Aaditya Thackeray has written to Union Minister for Coal and Mines Pralhad Joshi requesting his intervention in halting the Marki-Mangli-II Coal Block Auction.

He has urged the Union Minister to drop the auction of this mine as it could cause irreparable losses to the entire forest zone ecosystem and the wildlife that has been depending on it. 

The Marki-Mangli-II Coal Block auction threatens the wildlife in the region since it falls in the corridor of TATR-Tipeshwar wildlife sanctuary. The segment where the mine block is proposed, also falls under the area of approved Tiger Conservation Plan (TCP) of Tadoba. 

About 250 hectares of the proposed mining area, which account for almost 50% of this project, is on reserve forestland in the Mukutban range of Yavatmal district. News reports suggest that while in 2015, the MoEF&CC had mentioned this proposed mine to be in "inviolate areas", the 2018 communication from the MoEF&CC does not mention so, Mr Thackeray has pointed out.

Highlighting the concerns of potential destruction of precious conservation zones, Mr Thackeray said, "Our thriving tigers in the region will not only lose their natural habitat but would have to face massive level of disturbances due to the mining activity and increased presence of humans in the region."

Mr Thackeray also thanked the Union Minister for his intervention in the Bandar Coal Mine issue last month. He said that by dropping it from the auction list, an extremely sensitive eco-zone of tigers and invaluable biodiversity has been saved from destruction.पिंपरी, (टाईम न्यूजलाईन नेटवर्क): - महावितरण कंपनीने प्रत्यक्ष जागेवर जाऊन मीटर रीडिंग घेतले नाहीत.  अंदाजपंचे बिले दिली आहेत. यामुळे बिले जास्त रकमेची आली आहेत. गेल्या चार महिन्यातील मीटर रीडिंग घेऊन बिलांची आकारणी करावी. अवास्तव दिलेली वाढीव बिले रद्द करावीत, अशी मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे केली आहे.  
याबाबत उद्या निर्णय घेण्यात येणार आहे. एखाद्या नागरिकाने जास्त बिल भरले असेल. तर, ते पुढील बिलात समाविष्ट केले जाईल, असे आश्वासन उर्जामंत्र्यांनी दिल्याचे बारणे यांनी सांगितले.

खासदार बारणे यांनी आज मंत्रालयात ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची भेट घेतली. अवास्तव वीज बिले आल्याने नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे त्यांना सांगितले. वीज बिले कमी करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. त्यात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या महावितरण कंपनीच्यावतीने नागरिकांना घरगुती लाईट वापराची बिले मीटर रीडिंगव्दारे दिले जाते. कोरोना लॉकडाऊन काळात मीटर रीडिंग न घेता अंदाजे लाईट बील ग्राहकांना देण्यात आली आहेत.  बील हे अवास्तव प्रमाणात देण्यात आल्याने  नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. कोरोना काळात अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असून त्यातच लाईट बील न वापरलेल्या विजेचेही आले आहे. ही बील मीटर रिडींगप्रमाणे  मिळावे ही माफक अपेक्षा ग्राहकांची आहे.
महावितरण कंपनीने प्रत्यक्ष जागेवर जाऊन मीटर रीडिंग घेतले नाहीत. अंदाजपंचे बिले दिली आहेत. यामुळे बिले जास्त रकमेची आल्याने जनतेत नाराजी आहे. गेल्या चार महिन्यातील मीटर रीडिंग घेऊन बिलांची आकारणी करावी. वाढीव बिले कमी करावीत. काहींना एक लाख, दोन लाख रुपयांची बिले आली आहेत. नागरिक बिले भरायला तयार आहेत. पण, जेवढी वीज वापरली तेवढेच बिल भरणार अशी नागरिकांची भूमिका आहे.  मीटर रिडींग प्रमाणे वीज बील आकारून नागरिकांना देण्यात यावीत. अवास्तव बील आकारणी केली आहे. ती रद्द करून सुधारित  बीले ग्राहकांना देण्यात यावीत अशी मागणी खासदार बारणे यांनी केली आहे.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेचा लाभ घ्यावा


 पुणे(टाईम न्यूजलाईन नेटवर्क): जिल्ह्यातील मराठा आर्थिक दुर्बल घटकातील तरुण-तरुणी, युवक व उद्योजक बनू इच्छिणाऱ्या आणि तशी क्षमता असणाऱ्या व्यक्तींना सहाय्य पुरवण्याच्या दृष्टीने छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानांतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वतीने व्यावसायिक कर्जावरील व्याज परतावा योजना व कर्ज पुरवठा योजना राबविण्यात येतात. अण्णासाहेब पाटील वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत पुणे जिल्ह्यातील १ हजार ४१८ लाभार्थ्यांना विविध बँकेमार्फत ८० कोटी ६० लाख ६८ हजार २१२ रुपये कर्ज वाटप करण्यात आले आहे. तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत पुणे जिल्ह्यातील ८४१ लाभार्थ्यांना २ कोटी ५३ लाख ७१ हजार ५८५ रुपये व्याज परतावा देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा समन्वयक संकेत लोहार यांनी दिली आहे.
             
मराठा समाजातील युवक युवतींनी नोकरीपेक्षा स्वतःचा उद्योग, व्यवसाय उभारणीला प्राधान्य देण्यासाठी महामंडळाच्या योजनेचा लाभ घ्यावा. तसेच सिबिल (CIBIL) प्रणाली अंतर्गत येणाऱ्या बँकांनीही या योजने अंतर्गत असणाऱ्या प्रकल्पांना मंजुरी द्यावी, असे आवाहन महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी केले आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेऊन दुग्ध व्यवसाय, प्रवासी वाहने, किराणा दुकान, शेळीपालन, झेरॉक्स सेंटर, सायकल दुरुस्ती, चर्मोद्योग , फोटोग्राफी, गारमेंट्स, रिक्षा, घरगुती मसाले इत्यादी व्यवसाय यशस्वीरित्या सुरु केले आहेत. महामंडळाचे काम जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे कार्यालयामार्फत केले जाते. मराठा प्रवर्गातील लाभार्थ्यांनी महामंडळाच्या संधीचा लाभ घेऊन व्यवसायाला सुरुवात करावी, असे आवाहन पुणे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त अनुपमा पवार यांनी केले आहे.

  • गुन्हे शाखेने युनिट 1 ने आवळल्या मुसक्या
  • चोरट्यांकडून दहा दुचाकी हस्तगत
पिंपरी (टाईम न्यूजलाईन नेटवर्क)– मौजमजेसाठी वाहन चोरी करून त्यांची विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी भोसरीत अटक केली.
चोरीच्या दहा दुचाकी हस्तगत केल्या. गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ही कामगिरी केली.
स्वप्नील राजू काटकर (वय 19, रा. दिघीरोड, आदर्शनगर, भोसरी) आणि राहूल मोहन पवार (वय 19, रा. मधुबन सोसायटी, चक्रपाणी वसाहत, भोसरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे कर्मचारी गस्त घालत असताना पोलीस कर्मचारी गणेश सावंत व नितिन खेसे यांना माहिती मिळाली की दोघेजण भोसरी येथील पुलाखाली दुचाकीसह संशयितरित्या उभे आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा लावून दोघांना अटक केली.पिंपरी (टाईम न्यूजलाईन नेटवर्क)
कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी, गणेशोत्सवात होणारा अनावश्यक खर्च टाळून पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला सर्वोतोपरी मदतीसाठी पुढाकार घ्यावा. या संकटाच्या काळात आपण सर्वांनी एकोप्याने लढुया… असे भावनिक आवाहन भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना बाधित  रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन आणि आरोग्य विभागावर ताणाव निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या निर्देशानुसार, यावर्षी दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार नाहीत. त्यामुळे दहीहंडी उत्सव मंडळाच्या पदाधिकारी- कार्यकर्त्यांनी बॅनर अथवा कार्यक्रमाचे आयोजन करु नये.
तसेच, प्रशासनाने लॉकडाउनमध्ये शिथिलता आणली आहे. जनजीवन पूर्ववत सुरू होत आहे. नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत. परिणामी, रुग्ण संख्या आणखी वाढण्याचा धोका आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करावे, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.

***
पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करूया…
गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिका प्रशासनाने नियमावली जाहीर केली आहे. त्या नियमावलीनुसार मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मंडप उभारु नये. मोजक्या लोकांसोबत आरती घ्यावी. मंदिरातच गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करावी. त्यामुळे यावर्षी अनावश्यक खर्च होणार नाही. यातून वाचलेले पैसे सामाजिक बांधिलकी म्हणून महापालिका प्रशसानाला मदत करावी.  तसेच, पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेवूया…‘निसर्ग गणेश’ सारख्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे. शाडु मातीच्या मूर्ती, मातीच्या मूर्ती, तुरटीच्या मूर्तींना प्राधान्य द्यावे. तसेच, घरीच गणेश विसर्जन करावे, असे आवाहनही लांडगे यांनी केले आहे.
***
गणेशोत्सव वर्गणीसाठी आग्रह करु नका…
कोरोना आणि लॉकडाउनमुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. नागरिकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. व्यावसायिक , उद्योजकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वर्गणीसाठी नागरिकांना आग्रह करु नये. नवरात्रोत्सवातही कार्यकर्त्यांनी नागरिकांना वर्गणी आणि मदतीसाठी बंधकारक करु नये. त्यामुळे वर्गणीसाठी वाद-विवाद होणार नाहीत, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.
पुणे(टाईम न्यूजलाईन नेटवर्क)- लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अनेक अडचणींवर मात करत या वन कर्मचाऱ्यांनी उपलब्ध मनुष्यबळाच्या जोरावर रोपवाटिकेतील रोपांना जीवदान दिले असून लागवड करण्यात आलेल्या वृक्षांचे उन्हाळाच्या दाहकतेपासून संरक्षण करीत त्यांना पाणी देण्याची व्यवस्था केली आहे. उन्हाळ्याच्या कालावधीत अनेक ठिकाणी वणवा लागण्याच्या घटना घडत होत्या यापासून वृक्षांचे संरक्षण करण्यात त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीदरम्यान रोजगार मिळणे कठीण झाले होते, अशा परिस्थितीत रोजंदारीवर उपजिविका असणा-या अनेक व्यक्तींना रोपवाटिका, वृक्ष संवर्धनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला. या खेरीज कोविड-19 रोगापासून संरक्षणासाठी मास्क, सॅनीटायझर यांचे वाटप केले आहे. 
ऐन उन्हाळाच्या सुरुवातीस कोविड 19 रोगाच्या रुपाने संपूर्ण जगासह भारतासमोर एक मोठे आरोग्यविषयक संकट उभे ठाकले आहे. दिवसेंदिवस कोविड 19 च्या रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस आणि सफाई कर्मचारी अहोरात्र प्रयत्न आहेत.   मानवसेवेसाठी लढणाऱ्या या दूतांसारखे निसर्ग सेवेचे व्रत घेतलेले वन विभागातील अधिकारी आणि वन कर्मचारीदेखील या कठीण परिस्थितीत महाराष्ट्रभर आपली कर्तव्ये अविरतपणे पार पाडत आहेत. निसर्गाचा विशेषतः वृक्षांचा मानवी स्वास्थ्यावर होणाऱ्या अनुकूल परिणामांची सगळयांना कल्पना आहेच, याबरोबरच वृक्ष हे नैसर्गिक अडथळ्यांसारखे काम करून मानवापासून वन्यजीवांमध्ये आणि वन्यजीवांपासून मानवामध्ये प्रसार होऊ शकणा-या आजारांपासून संरक्षण करत असतात.
                          वृक्षसंवर्धनाबरोबरच वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी वनविभागाने अनेक उपक्रम राबविले आहेत. यामध्ये वन्यप्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देणे, अपघाताने मानवी वस्तीत आलेल्या बिबट, हरीण आणि यासारख्या इतर वन्यप्राण्यांना त्यांच्या मूळ अधिवासात सुरक्षितपणे सोडणे आणि वन्यजीव मानव संघर्ष कमी करणे, पाण्याच्या शोधात अनावधानाने विहिरीत पडलेल्या वन्य प्राण्यांची सुटका करणे, जखमी वन्यप्राण्यांवर उपचार करणे यासारख्या कामांचा समावेश आहे. याही परिस्थितीत काही समाजकंटक अवैध कामे जसे की, अवैध वृक्षतोड, वनजमिनींवर अतिक्रमण, वन्यप्राण्यांची शिकार, त्यांची तस्करी यासारखी कुत्ये करत आहेत. या कामावर देखील वनविभाग लक्ष ठेवत आहेत आणि संबंधित आरोपींवर कार्यवाही करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
           निसर्गसेवेबरोबरच सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत वनविभागाच्या अनेक कार्यालयांकडून दुर्गम भागात राहणारे आदिवासी बांधव, रोपवाटिकेत काम करणारे मजूर, रोजंदारी कामगार यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना कोरडा शिधा वाटप केला. लॉकडाऊनच्या कालावधीदरम्यान रोजगार मिळणे कठीण झाले होते, अशा परिस्थितीत रोजंदारीवर उपजिविका असणा-या अनेक व्यक्तींना रोपवाटिका, वृक्ष संवर्धनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला. या खेरीज कोविड-19 रोगापासून संरक्षणासाठी मास्क, सॅनीटायझर यांचे वाटप केले. त्याचबरोबर शासनाकडून निर्गमित केलेल्या सूचनांबद्दल समाज प्रबोधनाचे काम देखील केले. 
              वरील सर्व कामासाठी वने, भूकंप व पुनर्वसनमंत्री संजय राठोड, राज्यमंत्री (वने) दत्तात्रय भरणे,  अतिरिक्त मुख्य सचिव, महसूल व वन विभाग (वने) मनोज कुमार श्रीवास्तव आणि, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) नागपूरचे डॉ.एन. रामबाबू यांच्या मार्गशनाखाली हे काम सुरू  आहे.                                                      

लोणावळा (टाईम न्यूजलाईन नेटवर्क): लोणावळ्यात विनापरवाना येणारे पर्यटक पोलिसांची नजर चुकवून थेट फार्म हाऊस, रो हाऊस गाठत आहेत. त्यामुळे आता पोलिसांनी त्याठिकाणी छापे टाकत कारवाई करायला सुरुवात केली. सोमवारी रात्री अकरा वाजता गोल्ड व्हॅली येथील माउंट कॉटेज बंगल्यावर पोलिसांनी धाड टाकत सात पर्यटकांना ताब्यात घेतले. तर बंगल्याच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. 
मुंबईहून दोन रिक्षात हे सात पर्यटक लोणावळ्यात दाखल झाले होते. पोलिसांची नजर चुकवत त्यांनी गोल्ड व्हॅली गाठली आणि नंतर माउंट कॉटेज बंगल्यात प्रवेश केला. सोमवारी सायंकाळी आलेल्या या महाभागांनी नंतर पार्टी सुरू केली. दारूच्या बाटल्या ही फुटल्या. बाहेर पोलिसांचं पेट्रोलिंग सुरूच होतं, तेंव्हा बाहेरील दोन रिक्षा आढळल्या. रात्रीची वेळ असल्याने पोलिसांनी जवळ जाऊन पाहिलं असता एमएच 43 अर्थात मुंबईच्या वाशीतील रिक्षा असल्याचं निष्पन्न झाले. पार्टीत दंग असणाऱ्या महाभागांना बाहेर पोलीस आल्याचा थांगपत्ता ही नव्हता. पेट्रोलिंग कर्मचाऱ्यांना वरिष्ठांना कल्पना दिली. ते घटनास्थळी पोहचताच या पर्यटकांचं बिंग फुटलं. कोरोनामुळं पर्यटनाला बंदी असताना ही, हे सात पर्यटक विनापरवाना शहरात आल्याचे निष्पन्न झालं. तर पर्यटन बंदी असताना माउंट कॉटेज बंगला भाड्याने दिल्याने मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. तर सात पर्यटकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळी अद्याप ही बंदी आहे. तरी ही पुण्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या लोणावळ्यात पर्यटकांचा मुक्त संचार दिसून येतो. भुशी धरण, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंटसह विविध पॉइंटवर विनापरवाना पर्यटकांची गर्दी दिसून येत होती. वर विनामास्क फिरत सोशल डिस्टनसिंगचा ही फज्जा उडवू लागले. त्यामुळे अशा पर्यटकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. शिवाय पुणे-मुंबईहून विनापरवाना लोणावळ्यात येणाऱ्यांना चांगलीच तंबी दिली. त्यानंतर काही दिवस पर्यटकांनी लोणावळ्यात जाणं टाळलं. पण कालांतराने काही महाभाग पुन्हा वर तोंड करून लोणावळ्यात वावरू लागले. पर्यटन बंदीचा कायदा मोडणाऱ्या 300हुन अधिक महाभागांवर पोलिसांनी आत्तापर्यंत गुन्हे दाखल केलेत, तर विनामास्क आणि सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडवणाऱ्या 589 पर्यकटांवर ही कारवाईचा बडगा उगरण्यात आली. पैकी 270 खटल्यात मावळ न्यायालयाने 2 लाख 63 हजरांचा दंड ठोठावला आहे. बाहेर भटकल्यानंतर पोलीस कारवाई करत आहे  म्हणून  पर्यटक थेट फार्म हाऊस अथवा रो हाऊस गाठू लागले. पण या पर्यटकांना हे ही महागात पडलं. कारण पोलिसांनी आता अशा ठिकाणी ही धाडी टाकत कारवाईला सुरुवात केली आहे. सोमवारच्या रात्री माउंट कॉटेज बंगल्यावर झालेली कारवाई करत पोलिसांनी पर्यटकांना थेट इशाराच दिला.

पाऊस जोर धरू लागलाय, त्यामुळे पुणे-मुंबईतील पर्यटक पर्यटनस्थळी येण्याचे नियोजन करत आहे. त्यांनी लोणावळ्यात येण्याची चूक करू नये. कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनावर बंदी आहे. ही बंदी झुगारून तुम्ही आलात तर तुमच्यावर खटले दाखल केले जातील. त्यामुळे घरीच सुरक्षित रहा, असं आवाहन लोणावळा पोलीस निरीक्षक मनोज यादव यांनी केले.


पिंपरी (टाईम न्यूजलाईन नेटवर्क):-  प्रसिद्ध उद्योजक एस कुदळे ग्रूप व चाकणमधील यशस्वी क्रेन व्यवसायिक अमोल सोनवणे यांच्यासोबत एसके ट्रॅक्टर्स (सोनवणे कुदळे) या नावाने शेतकऱ्यांच्या सेवेत रूजू  झाले आहे. एस के ट्रॅक्टर्सचे शो रूम चाकण कुरुळी कल्याणी भारत फोर्ज समोर तर सोमाटणे फाटा येथील पवना रुग्णालयाशेजारी, कामशेत,पेण- रायगड  व राजगूरू नगर अशा पाच ठिकाणी कार्यरत झाले आहे.
स्वराज महिंद्रा ट्रॅक्टर चे सोपान रायकर हे प्रथम ग्राहकाचे मानकरी ठरले.
कुदळे हे १९३२ पासून सेवा क्षेत्रात कार्यरत आहे. मारुती सुझुकी कार या 
नामांकित कंपन्यांची डीलरशिप आहे.
आता सोनवणे यांच्या सहकार्याने महिंद्रा स्वराज ट्रॅक्टरची डिलरशिप घेवून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या सेवेत दाखल झाले आहे.

यामुळे चाकण, तळेगाव,लोणावळा, कामशेत व कोकण या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. सवराज ट्रॅक्टर हा Pजागतिक स्तरावर अग्रेसर ब्रॅन्ड असून अगदी शेतकऱ्यांना परवडेल अशा किफायतशीर दरामध्ये उपलब्ध आहे.लॉकडाऊनच्या काळात देखील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा स्वराजच्या ट्रॅक्टरला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पारंपारिक शेतीला आधुनिक ट्रॅक्टरची जोड दिल्यास शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार असल्याची माहिती संचालक नीरज कुदळे यांनी दिली. तर शेतकरी बांधव यांना संपूर्ण सेवा देऊ.असे अमोल सोनवणे म्हणाले.

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget