पुणे,(टाईम न्यूजलाईन नेटवर्क): पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनाचे योग्यताप्रमाण नुतनीकरण तपासणीचे कामकाज चालू आहे. माहे मार्च ,एप्रिल, व जून या महिन्यात ऑनलाईन नियोजित तारीख घेतलेल्या वाहनांची तपासणी लॉकडाऊनमुळे झालेली नाही अशा वाहनांसाठी पुढील नियोजित तारीख कार्यालयामार्फत देण्यात आलेली आहे. दिनांक 3 ऑगस्ट 2020 रोजी रक्षाबंधन असल्याने विभागीय आयुक्त कार्यालय पुणे यांनी स्थानिक सुटटी जाहिर केलेली आहे. यामुळे नियोजित तारीख घेतलेल्या सर्व वाहनांच्या चालक/मालक यांची गैरसोय होऊ नये यासाठी 3 ऑगस्ट 2020 रोजी योग्यताप्रमाण नूतनीकरणाचे कामकाज चालू ठेवण्यात आले आहे. तरी सर्व वाहन चालक/मालक यांनी वाहन तपासणीसाठी कार्यालयात आणावे, असे आवाहन पिंपरी चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.