पिंपरी, (टाईम न्यूजलाईन नेटवर्क) – कोरोना रुग्णांसाठी बेड उपलब्ध असूनही एखादा रुग्ण आल्यानंतर बेड शिल्लक नसल्याचे सांगणाऱ्या पिंपरी-चिंचवडमधील खासगी रुग्णालयांना आमदार लक्ष्मण जगताप यांनी चांगलाच दणका दिला आहे. शहरातील सर्व खासगी रुग्णालयांमधील किती बेड कोरोना रुग्णांना देण्यात आले आहेत आणि किती बेड शिल्लक याची माहिती दररोज जाहीर करण्याचे आदेश आमदार जगताप यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले आहेत. तसेच ही माहिती महापालिकेच्या वॉररुममधील डॅशबोर्डवर दररोज अपडेट करण्याची सक्त ताकीदही त्यांनी प्रशासनाला दिली आहे. त्यानुसार महापालिकेने खासगी रुग्णालयांमधील उपलब्ध बेड आणि उपचार सुरू असलेल्या बेडची संख्या आजपासून (शनिवार १८ जुलै) अपडेट करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे आता शहरातील कोणत्या खासगी रुग्णालयात किती बेड शिल्लक आहेत हे नागरिकांना घरबसल्या आपल्या मोबाईलवर ऑनलाइन पाहता येणार आहे. शहरातील जागरूक नागिरकांनी ही माहिती गरजवंतांपर्यंत पोहोचवावी. जेणेकरून कोणताही कोरोना रुग्ण उपचारांपासून वंचित राहू शकणार नाही, असे आवाहन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. शनिवारी १८ जुलै रोजी शहरातील एकूण कोरोना रुग्णसंख्येने १० हजारांचा आकडा पार केला आहे. त्यातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्या साडेतीन हजारांपेक्षा जास्त आहे. कोरोना होणाऱ्या प्रत्येक रुग्णाला महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार करणे शक्य नाही. त्यामुळे सरकारने आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी खासगी रुग्णालये ताब्यात घेण्याची मुभा त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांना दिली आहे. तसेच खासगी रुग्णालयांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या एकूण बेडपैकी ८० टक्के बेड कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी ठेवणे कायद्याने बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कोरोना आजार तसेच अन्य आजारांवर किती उपचार खर्च आकारायचे याचे दरही सरकारने निश्चित करून दिले आहेत.
हा कायदा असूनही शहरातील खासगी रुग्णालये कोरोना रुग्ण आणि अन्य आजार झालेल्या रुग्णांना अक्षरशः लुबाडत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. त्यातच आता एखादा कोरोना रुग्ण उपचारासाठी गेला की बेड उपलब्ध नसल्याचे सांगून खासगी रुग्णालये संबंधित रुग्णाला माघारी पाठवत असल्याची प्रकरणेही समोर आली आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयांबाबत नागरिकांमध्ये सध्या संतापाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत आमदार लक्ष्मण जगताप यांनी शहरातील खासगी रुग्णालयांना दणका दिला आहे. आमदार जगताप यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी चर्चा करून शहरातील सर्व खासगी रुग्णालयांमध्ये किती कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत आणि किती बेड शिल्लक आहेत याची
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.