July 2020


_*-उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांचे प्रशासनाला निर्देश*_
_विकासकामांचाही घेतला आढावा_

              बारामती (टाईम न्यूजलाईन नेटवर्क)
: बारामती शहरासह ग्रामीण भागात कोरानाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळली पाहिजे, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी  ठोस उपाययोजना राबविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. 
           बारामती  येथील विद्या प्रतिष्‍ठानच्या व्हिआयटी हॉल येथे 'कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मुलन' व 'विकास कामांचा आढावा बैठक' उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी उपमुखमंत्री बोलत होते. बैठकीला  नगराध्यक्षा पोर्णिमा तावरे, पंचायत समिती सभापती नीता बारवकर, अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल पावडे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहूल काळभोर , नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव , तालुका कृषि अधिकारी श्री. पडवळ , सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विश्वास ओव्हाळ, सिल्व्हर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे आदींसह विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी  उपस्थित होते.
  उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले की, कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासनाने दक्ष राहून काम करावे. सार्वजनिक ठिकाणी तसेच अन्यत्र गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल, याकडे विशेष लक्ष द्यावे. रूग्णाचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे तसेच तपासणी संख्या वाढवावी. कोविड आणि नॉन कोविड रूग्ण या दोघांनाही वेळेत उपचार मिळणे आवश्यक असल्याने आरोग्य विभागाने याची खबरदारी घेण्याचे तसेच नागरिकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचे तसेच विनाकारण घराबाहेर पडू नये असेही, आवाहन त्यांनी यावेळी केले. कोविडशी लढण्याकरीता आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय साधन सामुग्रीसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. या आर्थिक वर्षामध्ये ज्या विकासकामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे, त्याकरीता मंजूर करण्यात आलेल्या निधीचा वेळेत पूर्णपणे वापर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  केल्या.
          यावेळी  उपमुख्यमंत्री  अजित पवार यांनी तांदूळवाङी येथील पिण्‍याच्‍या पाण्याचा तलाव व सुरु आसलेल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या रस्त्यांच्या कामांचा आढावा घेतला. बारामती तालुक्‍यामध्‍ये कोणत्‍याही प्रकारचे अवैद्य धंदे चालणार नाहीत याची खबरदारी पोलीस विभागाने घ्यावी, अवैध धंदे करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या कडक सूचना त्‍यांनी यावेळी पोलिसांना दिल्या.                     

पिंपरी

*पिंपरी चिंचवड महापालिका*
           

❇️ *करोना अपडेट* ❇️
शनिवार, दि. ४ जुलै २०२०
वेळ - सायंकाळी ६.५३ वाजता
~~~~~~~~~~~~~~~

🛐 एकूण करोना बाधित = *३९६७*

🛐 आज बाधित = *२०९*

🛐 शहराबाहेरील आज बाधित आलेल्या रूग्णांची संख्या = *१८*

🛐 करोना  मुक्त = *२,३६९*

🛐 उपचार सुरू = *१,५३२*

🛐 पुण्यातील रूग्णालयात उपचार घेत असलेले पिंपरी चिंचवड शहरातील रूग्ण = *०९*

🛐 पिंपरी चिंचवड शहरात उपचार घेणारे परंतु हद्दीबाहेरील रूग्ण = *१०२*

🛐 एकूण मयत = *८६*

🛐 शहरातील एकूण मयतांची संख्या = *५४*

🛐 शहराबाहेरील एकूण मयतांची संख्या = *३२*

🛐 आज मयत = *०४*

🛐 प्रतीक्षा अहवाल = *१,२३७*

🛐 एकूण सॅम्पल = *२५,१४१*

🛐 अहवाल प्राप्त = *२३,९०४*

🛐 आज रुग्णालयात दाखल = *३,७५१*

🛐 घरात अलगीकरण = *२८,९४३*

🛐 मनपाने सर्वेक्षण केलेल्या नागरिकांची संख्या = *६३,८७,५७८*

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
*आज करोना बाधित आलेले शहरातील १९१ रूग्ण या परिसरातील आहेत.*
🔯 नेहरुनगर
🔯 ज्योतीबानगर काळेवाडी
🔯 जुनी सांगवी
🔯 गुळवेवस्ती भोसरी
🔯 रुपीनगर तळवडे
🔯 काचघर निगडी
🔯 शाहुनगर चिंचवड
🔯 संत तुकाराम नगर पिंपरी
🔯 वैदुवस्ती पिंपळे गुरव
🔯 साईचौक पिंपरी
🔯 गुरुदेवनगर आकुर्डी
🔯 बंजरंगनगर खराळवाडी
🔯 प्राधिकरण निगडी
🔯 पवारनगर सांगवी
🔯 कासारवाडी
🔯 कामागार नगर पिंपरी
🔯 गायकवाडनगर दिघी
🔯 इंदिरानगर निगडी
🔯 पाटीलनगर चिखली
🔯 गव्हाणेवस्ती भोसरी
🔯 घरकुल चिखली
🔯 कुदळे चाळ पिंपरी
🔯 साईकॉलनी रोड रहाटणी
🔯 मोरवाडी पिंपरी
🔯 पिंपळे सौदागर
🔯 गणेशनगर भोसरी
🔯 शास्त्री कॉलनी पिं.सौदागर
🔯 गांधीनगर पिंपरी
🔯 केशवनगर कासारवाडी
🔯 एच.ए कॉलनी
🔯 आदिनाथनगर भोसरी
🔯 गांगुर्डेनगर पिं . गुरव
🔯 आदर्शनगर काळेवाडी
🔯 इंदिरानगर चिंचवड
🔯 लांडेवाडी
🔯 जयभिम नगर दापोडी
🔯 बोपखेल
🔯 खंडोबामाळ भोसरी
🔯 आळंदीरोड भोसरी
🔯 लिंकरोड पिंपरी
🔯 विद्यानगर चिंचवड
🔯 पंचतारानगर आकुर्डी
🔯 एम्पायर इस्टेट चिंचवड
🔯 लक्ष्मीनगर पिं.गुरव
🔯 अष्टविनायक चौक आकुर्डी
🔯 चऱ्होली
🔯 पवनानगर काळेवाडी
🔯 देहु - आळंदी रोड चिखली
🔯 क्षितीज नगर चिंचवड
🔯 साईबाबानगर चिंचवड
🔯 शिवधन रेसिडन्सी आकुर्डी
🔯 ताम्हाणेवस्ती चिखली
🔯 सुदर्शनगर पिं . गुरव
🔯 शिवानंद पिंपरी
🔯 काळभोरचाळ निगडी
🔯 पवनेश्वर मंदिर पिंपरी
🔯 मिलींदनगर पिंपरी
🔯 शिवनेरी बिल्डींग पिं . गुरव
🔯 बौध्दनगर पिंपरी
🔯 राजवाडेनगर काळेवाडी
🔯 रमाबाईनगर पिंपरी
🔯 भाटनगर
🔯 संभाजीनगर
🔯 चक्रपाणी वसाहत भोसरी
🔯 विठ्ठलनगर नेहरुनगर
🔯 चक्रपाणी वसाहत भोसरी
🔯 दत्तनगर चिंचवड
🔯 विठ्ठलवाडी आकुर्डी
🔯 आंबेडकरनगर पिंपरी
🔯 शरदनगर पिंपरी
🔯 शिवाजीवाडी भोसरी
🔯 विजयनगर पिंपरी
🔯 नढेनगर काळेवाडी
🔯 गजानननगर पिं.गुरव
🔯 म्हलारी बिल्डींग भोसरी , धावडेवस्ती भोसरी🔯 यमुनानगर निगडी
🔯 दत्तनगर चिंचवड
🔯 इंद्रायणीनगर भोसरी
🔯 यशवंतनगर पिंपरी
🔯 उदयनगर पिंपरी
🔯 फुलेनगर भोसरी
🔯 पदमावती नगरी चिखली
🔯 लांडगेआळी भोसरी
🔯 बनगरवस्ती मोशी
🔯 मोहननगर चिंचवड
🔯 जाधववाडी भोसरी
🔯 गणेश साम्राज्य मोशी
🔯 ढोरेनगर सांगवी
🔯 काळभोर नगर चिंचवड
🔯 शिवरत्न कॉलनी काळेवाडी
🔯 म्हाळसाकांत चौक आकुर्डी
🔯 विकासनगर किवळे
🔯 कोकणेनगर काळेवाडी
🔯 एकता सोसायटी मोशी
🔯 विन्डसर पार्क वाकड
🔯 तुळजाई वस्ती आकुर्डी
🔯 प्रियदर्शनीनगर जुनी सांगवी
🔯 श्रीनगर काळेवाडी

~~~~~~~~~~~~~~~
आज मयत झालेल्या व्यक्ती (पुरूष वय ४८) *सानेवस्ती, चिखली*

(पुरूष वय ६१) *वाल्हेकरवाडी, चिंचवड*

(स्त्री वय ७८) *एम्पायर इस्टेट, चिंचवड*

(स्त्री वय ६२) *निगडी* येथील रहिवासी आहेत.
~~~~~~~~~~~~~~~

*आज करोना बाधित आलेले शहराबाहेरील १८ रूग्ण हे येथील रहिवासी आहेत.*

✅ चिंचोली देहुरोड
✅ येरवडा
✅ औंध
✅ आळंदी
✅ मारुंजी
✅ चाकण
✅ सिंहगड रोड
✅ हडपसर
✅ देहुगाव
✅ खेड
✅ बाणेर


पिंपरी (टाईम न्यूजलाईन नेटवर्क)
पिंपरी चिंचवड महापालिका
             

❇️ *करोना अपडेट* ❇️
शुक्रवार, दि. ३ जुलै २०२०
वेळ - रात्री ८.२५ वाजता
~~~~~~~~~~~~~~~

🛐 एकूण करोना बाधित = *३,७७६*

🛐 आज बाधित = *२७६*

🛐 शहराबाहेरील आज बाधित आलेल्या रूग्णांची संख्या = *४४*

🛐 करोना  मुक्त = *२,२३३*

🛐 उपचार सुरू = *१,४८२*

🛐 पुण्यातील रूग्णालयात उपचार घेत असलेले पिंपरी चिंचवड शहरातील रूग्ण = *०८*

🛐 पिंपरी चिंचवड शहरात उपचार घेणारे परंतु हद्दीबाहेरील रूग्ण = *९३*

🛐 एकूण मयत = *८५*

🛐 शहरातील एकूण मयतांची संख्या = *५३*

🛐 शहराबाहेरील एकूण मयतांची संख्या = *३२*

🛐 आज मयत = *०७*

🛐 प्रतीक्षा अहवाल = *२,१५९*

🛐 एकूण सॅम्पल = *२१,३९०*

🛐 अहवाल प्राप्त = *१९,२३१*

🛐 आज रुग्णालयात दाखल = *९८१*

🛐 घरात अलगीकरण = *२८,४८५*

🛐 मनपाने सर्वेक्षण केलेल्या नागरिकांची संख्या = *६३,०३,५६५*

~~~~~~~~~~~~~~~
आज मयत झालेल्या *सात* व्यक्ती (पुरूष वय ६५) *चिंचवडेनगर, चिंचवड*  
(पुरूष वय ६७) *रिव्हररोड, चिंचवड*  
(स्त्री वय ६२) *मोहननगर, चिंचवड*
(स्त्री वय ६०) *भीमनगर, पिंपरी*
(पुरूष वय ६६) *साईनगर, मामुर्डी*
(पुरूष वय ८०) *निगडी*
(पुरूष वय ५८) *शितळानगर, देहूरोड*
 येथील रहिवासी आहेत.
~~~~~~~~~~~~~~~


पुणे,(टाईम न्यूजलाईन नेटवर्क) : पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात कोराना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, ही चिंतेची बाब आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे जिल्ह्यासाठी टेस्टींग इन्चार्ज म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील एका अधिकाऱ्याची नेमूणक करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. तसेच प्रतिबंधित क्षेत्रात शासनाच्या निर्देशानुसार कडक निर्बंध राबवा त्यानुसार मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
            विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मुलन आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. त्यावेळी ते  बोलत होते.
             बैठकीला मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीपकुमार व्यास, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी, विभागीय आयुक्त  डॉ. दीपक म्हैसेकर,जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड चे मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, साखर आयुक्त सौरभ राव, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे  संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शांतनु गोयल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, शासनाचे वैद्यकीय सल्लागार, संचालक डॉ. अर्चना पाटील, ससून चे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
          उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोविड रुग्णांवर उपचार करतांना नॉन कोविड रुग्णाकडे दुर्लक्ष होता कामा नये, काही रुग्णालयामध्ये डॉक्टर कोविड कक्षामध्ये जात नसल्याच्या तक्रारी येत आहे. अशा  डॉक्टरांवर कारवाई करा, लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यांनतर शहरी भागातील नागरिक ग्रामीण भागात ये-जा करत असल्यामुळे या भागात कोरोनाचा प्रसार होतांना दिसून येत आहे.  ग्रामीण भागात विविध समित्या कार्यरत आहेत. त्यांच्या मदतीने कोरोना विषाणूच्या संसर्गावर कसे नियंत्रण मिळवता येईल, यासाठी योजना तयार करा.  शहरातून ग्रामीण भागात तसेच ग्रामीण भागातून शहरी भागात ये-जा करणाऱ्या नागरिकांची तपासणी पोलिसांनी करावी. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये शासनाच्या निर्देशानुसार अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या.
सोलापूर, सांगली  व सातारा जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढतांना दिसून येत आहे. यासाठी विभागीय आयुक्त यांनी परिस्थिती आटोक्यात आणण्याच्या करीता आवश्यक ती कार्यवाही करावी.
लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर उद्योगधंदे सुरु करण्यात आले आहेत.त्यामुळे कारखान्यातील कामगारांची गैरसोय होवू नये यासाठी कारखान्याच्या मालकानी कामगाराची राहण्याची करावी. तसेच काम करीत असतांना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार कामगारांना मास्क वापरण्यास, हात वारंवार धुण्यास आणि शारिरीक अंतर पाळण्यास प्रवृत्त करावे, असे आवाहनही  उपमुख्यमंत्री पवार यांनी केले.
          मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता म्हणाले,  पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे जिल्ह्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची नेमूणक करतांना परिस्थितीनिहाय कामकाजाचे सूक्ष्म वाटप करा. ग्रामीण भागात कोरोना परिस्थिती आटोक्यात आण्यासासाठी कम्युनिटी लिडर्सची मदत घ्या. शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांच्या मनातील कोरोनाविषयक भीती घालविण्यासाठी जनजागृतीवर भर द्या, या गोष्टी करतांना प्रतिबंधित क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करा, कोरोना बाधित रुग्ण तात्काळ शोधण्यासाठी आरोग्य पहाण्यांचे  चाचण्यांचे प्रमाण  वाढवा, त्यांचे तपासणी अहवाल लवकरात लवकर प्राप्त करा, जेणेकरुन सामूहिक संसर्ग पसरणार नाही. एखादा कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांची तात्काळ तपासणी करा, कोरोना बाधित रुग्णावर तात्काळ वर्गवारीनुसार उपचार सुरु करा, आरोग्य सेतू ॲप मधील माहितीचा प्रभावीपणे वापर करा, यासाठी राष्ट्रीय माहिती केंद्राची मदत घ्या. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊन कालावधीत शासनाच्या निर्देशाची कडक अमंलबजावणी करा, अशा स्वरुपाचा सर्वंकष कृती आराखडा तयार करा, अशा महत्त्वपूर्ण सूचना  मेहता यांनी केल्या.
      कोरोना विषाणूविषयक नमुना चाचण्या वेळेत होत आहे किंवा कसे ? याकरीता एका अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची सूचनाही  मेहता यांनी केली.
          बैठकीच्या प्रारंभी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी राज्याच्या तुलनेत पुणे जिल्ह्याची कोरोना बाबतची सद्यस्थिती सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यामध्ये बाधित रुग्ण, बरे झालेले रुग्ण, मृत्यू दर, चाचण्या वाढविण्यासाठी प्रशासनाचे नियोजन, आरोग्य सर्व्हेक्षण, मास्क, पीपीई कीट, आयसीयू, ऑक्सीजनयुक्त खाटा आणि श्वसनयंत्रे ( व्हेटिंलेटर) इत्यादी विषयी माहिती दिली.
     विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पुणे विभागात आतापर्यंतचे बाधित रुग्ण, बरे झालेले रुग्ण, मृत्यू दर, नमुना चाचण्या वाढविण्यासाठी प्रशासनाचे नियोजन, रुग्णांना देण्यात येणाऱ्या सेवा-सुविधा या बाबतची माहिती दिली.  कोरोना बाधित रुग्णांचे निदान करण्यासाठी अँटीजेन टेस्ट कीटचा वापर करण्यास सुरुवात झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.
             

                 
-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातलं विठ्ठलाच्या चरणी साकडं
-माझ्या बळीराजाला सुख, समाधान आणि भरभराट येऊ दे
-पंढरपूर, (टाईम न्यूजलाईन नेटवर्क):-   महाराष्ट्रासह अवघ्या देशाला कोरोनामुक्त कर आणि माझ्या बळीराजाला सुख, समाधान आणि भरभराट येऊ दे, असे साकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी श्री  विठ्ठलाच्या चरणी आज घातले.
      मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची बुधवारी पहाटे आषाढी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, श्री. तेजस ठाकरे उपस्थित होते.
    श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा पहाटे दोन वाजता सुरू झाली. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा मानाचे वारकरी अहमदनगर जिल्ह्यातील वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बढे आणि सौ. अनुसया बढे (मु.चिंचपूर-पांगुळ, ता. पाथर्डी) या दाम्पत्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी केली.
     मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनामुळे जग, देश तसेच महाराष्ट्रावर मोठे संकट आले आहे. कोरोनाचे हे संकट लवकरात-लवकर दूर करून महाराष्ट्र  आणि अवघा देश कोरोनामुक्त होऊ दे. राज्यातील शेतकरी, वारकरी आणि अवघ्या विठ्ठल भक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी आषाढी एकादशीला  माऊलींच्या दर्शनाला आलो. बळीराजाला सुखी करण्याचे आणि राज्यातील सर्व नागरिकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपणास बळ द्यावे, अशी मागणी श्री विठ्ठलाकडे केल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी  सांगितले. पंढरपूरच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार आहे. त्यासाठी विकास प्रकल्पांना मंजुरी दिली जाईल. त्याबाबतचे प्रस्ताव सादर करावे, असे त्यांनी सांगितले.
     कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी आणि जनतेने आरोग्याच्या दृष्टीने पंढरपुरात येऊ नये. घरातूनच श्री विठ्ठलाचे नामस्मरण व पूजा करावी, असे आवाहन  श्री. ठाकरे यांनी भाविकांना केले. वारकरी सांप्रदायाने शासनाच्या वतीने वेळोवळी करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सहकार्य केल्याबद्दल त्यांनी आभार मानले. यावेळी पंढरपूर नगरपरिषदेस शासनाच्यावतीने पाच कोटी रुपयांचा अनुदानाचा धनादेश नगराध्यक्षा साधना भोसले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
               यावेळी नगराध्यक्ष साधना भोसले, समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संभाजी शिंदे, शिवाजीराव मोरे, माधवी निगडे, अतुलशास्त्री भगरे, शकुंतला नडगिरे,  विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र भोसले, पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी आदी उपस्थित होते.

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget