पुण्यात एकाच कुटूंबातील चाैघांनी गळफास घेऊन जीवन संपविले


पुणे(टाईम न्यूजलाईन नेटवर्क): पुण्यात सुखसागरनगर परिसरात एकाच कुटूंबातील चाैघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये दोन चिमूरड्यांचा देखील समावेश आहे. अतुल दत्ता शिंदे (वय 33 ),जया अतुल शिंदे (वय 32),ऋग्वेद अतुल शिंदे (वय 6) अंतरा अतुल शिंदे (वय 3, राहणार सर्वजन सुखसागर नगर गल्ली नं 1 अहिरन्त सर्वे नं 15/1) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. ही घटना गुरूवारी रात्री अकराच्या सुमारास   उघडकीस आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, एक दिवस घराचा दरवाजा न उघडल्यामुळे शेजाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीने घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, हा धक्कादायक प्रकार समोर आला. फॅनच्या अॅंगलला नायलाॅनच्या दोरीने चाैघांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. अतुल शिंदे हे शाळेतील मुलांचे आयडेंटीकार्ड तयार करण्याचा व्यवसाय करत होते.
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget