:या प्रकरणात हलगर्जीपणा समोर आल्याने कारवाई
पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):- २००२ मध्ये पिंपळे-निलख येथील औंदूंबर सोसायटीत फ्लॅट घेतला होता. तो फ्लॅट त्याने बनावट कागदपत्रे तयार करून अनेकांना विकला. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फसवणूक प्रकरणी ताब्यात घेतलेल्या सोलापूर महापालिकेच्या उपमहापौराला सोडून देण्यात आले. या प्रकरणी पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी सांगवी पोलिस ठाण्याच्या दोन अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांना नियंत्रण कक्षाशी संलग्न केले असून, उपनिरीक्षक रविंद्र पन्हाळे यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
राजेश दिलीप काळे (४२, रा. सोलापूर) असे समजपत्र देऊन सोडलेल्या सोलापूरच्या उपमहापौराचे नाव आहे. आरोपी काळे यांनी २००२ मध्ये पिंपळे-निलख येथील औंदूंबर सोसायटीत फ्लॅट घेतला होता. तो फ्लॅट त्याने बनावट कागदपत्रे तयार करून अनेकांना विकला. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सांगवी पोलिस ठाण्यातील पथकाने २९ मे रोजी काळेला सोलापूर येथून ताब्यात घेतले होते. मात्र, शनिवारी (ता. ३०) अचानक काळे यांना शिंका येऊ लागल्या. सध्या करोनाची साथ असल्याने काळे यांना उपचार करण्यासाठी समजपत्र देऊन त्यांना सोडण्यात आल्याचे सांगवी पोलिसांनी सांगितले. मात्र, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले.
दरम्यान, या प्रकरणात हलगर्जीपणा समोर आल्याने सांगवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांना नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले. तर उपनिरीक्षक रविंद्र पन्हाळे यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिली.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.