:दापोडीतील घटना
:प्रॉपटी व पैशाच्या कारणावरून भांडण होत होते
:भोसरी पोलिसांनी केली मुलाला अटक
पिंपरी (टाईम न्यूजलाईन नेटवर्क):- दापोडी येथे प्रॉपटी व पैशाच्या कारणावरून जन्मदात्या वडिलांना दोरीने बांधून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केला. ही घटना मंगळवारी (दि.16) घडली.
सुनील मुतय्या पोलकम (वय 68, रा. भाटीया चाळ, दापोडी) असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा राजेश सुनील पोलकम (वय 38, रा. इंद्रायणीनगर, दापोडी) असे पोलिसांनी अटक केलेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजेश आणि त्याचे वडिल सुनील यांच्यात नेहमी प्रॉपटी व पैशाच्या कारणावरून भांडण होत असे. मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारासही त्यांच्यात भांडण झाल्याने आरोपी राजेश याने आपल्या वडिलांना दोरीने बांधले. त्यानंतर आरोपीने त्यांच्यावर कोणत्यातरी धारदार शस्त्राने वार केला. हा प्रकार सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत सुरू होता. दरम्यान जखमी झालेल्या सुनील यांचा मृत्यू झाला. सहायक निरीक्षक गजानन बनसोडे याबाबत अधिक तपास करीत आहेत.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.