गांजा विक्री करणाऱ्या तरुणास अटक

:बावधन येथील घटना

:एकूण 67 हजार 300 रुपयांचा ऐवज जप्त

पिंपरी, (टाईम न्यूजलाईन नेटवर्क) - गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. ही घटना बावधन येथे मंगळवारी (दि. 23) रात्री घडली.
कुणाल अनिल रजपूत (वय 29, रा. क्षत्रियनगर, बावधन, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस नाईक दिनकर परशुराम भुजबळ यांनी बुधवारी (दि. 24) याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रजपूत हा गांजा विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केले. त्यांच्याकडून 17 हजार रुपये किंमतीच 850 ग्रॅम गांजा, रोख 300 रुपये आणि 50 हजार रुपयांची दुचाकी असा एकूण 67 हजार 300 रुपयांचा ऐवज जप्त केला. सहायक निरीक्षक आनंद पगारे याबाबत अधिक तपास करीत आहेत.
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget