पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क)
राज्य सरकारच्या वन महसूल आपत्ती व्यवस्थापन पुनर्वसन विभागातर्फे व मुख्य सचिव यांच्या आदेशान्वये 19 मे 2020 रोजी रिवाईज गाईडलाईन देऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील उद्योगांना रेडझोन मधून बाहेर काढले असून नियम शिथिल केले आहेत. त्यामुळे उद्योगांचे 33% टक्के मॅनपावरचा नियमही निघून जाईल. उद्योगनगरी येथील उद्योगांना गती देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी पुढाकार घेऊन पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील उद्योगांना रेडझोन मधून बाहेर काढल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी आभार मानले आहे.
लॉकडाऊनमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वच उद्योग गेल्या दोन महिन्यांपासून बंद होते. उद्योगनगरीत सर्व उद्योग पूर्ववत सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वारंवार मागणी केली जात होती. त्यानंतर राज्य सरकारने ३३ टक्के उद्योगांना काही अटी व शर्तींवर कंपन्या सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानंतरही यामध्ये सुधारणा करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे करण्यात आली होती. यावरती आज वन महसूल आपत्ती व्यवस्थापन पुनर्वसन विभागातर्फे व मुख्य सचिव यांच्या आदेशान्वये 19 मे 2020 रोजी रिवाईज गाईडलाईन देऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील उद्योगांना रेडझोन मधून बाहेर काढले असून नियम शिथिल केले आहेत. त्यामुळे उद्योगांचे 33% टक्के मॅनपावरचा नियमही निघून जाईल. आणि उद्योगनगरीचे उद्योगांची थांबलेली धडधड पुन्हा पूर्ववत होईल अशी आशा वाघेरे यांनी बोलताना व्यक्त केली.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.