कासारसाई येथे ८१ गराजवंताना आवश्यक वस्तूंचे वाटपहिंजवडी (टाईम न्युजलाईन नेटवर्क)
: कोरोनामुळे देशभरात मागील महिन्या भरापासून लोकडाऊन सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल सुरू आहेत. अनेकांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक परिवारातील नागरिकांना कम नसल्याने पैशांची चणचण निर्माण होत आहे. त्यामुळे रोजच्या आवश्यक वास्तुदेखील खरेदी करणे अशक्य होतं आहे. याच गरजा ओळखून कासारसाई येथील उद्योजक कैलास तुळशीराम शितोळे, गणेश बारकू शेडगे व कासारसाचे माजी सरपंच बाळासाहेब भिंताडे यांनी कासारसाई कासारसाई येथील कामानिमत्त आलेल्या व भाडेकरू म्हणून राहणाऱ्या सुमारे ८१ कुटुंबाना धान्य व रोजच्या वस्तूंचे वाटप केले. यामध्ये ५ किलो गहू, ५ किलो तांदूळ, तेल, साबण, चहा पावडर, टूथपेस्ट, डाळ अशा अनेक वस्तू आहेत. याबाबत माजी सरपंच बाळासाहेब भिंताडे म्हणले, येथील अनेक नागरिक वेळेअभावी आपल्या गावी परत जाऊ शकले नाहीत. त्यामुळे ते आता येथेच राहत आहेत. यातील अनेक जण नोकरी, मोलमजुरी तसेच सोसायट्यांमध्ये मिळेल ते काम करत आहेत. त्यांची यादी तयार करून, परिसरातील दानशूर लोकांनी त्यांना आवश्यक मदत करणे गरजेचे आहे. मागील आठवड्यात अशाच सुमारे ६५ कुटुंबाना धान्य व जीवणावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले होते. उद्योजक गणेश शेडगे व कैलास शितोळे म्हणाले, अशा गरजवंतांना मदत करणे गरजेचे आहे. अद्यापही कासारसाई येथील अनेक गरजु कुटुंबाना मदत करणे आवश्यक असून, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे अशा नागरिकांची यादी तयार करून त्यांना आवश्यक त्या वस्तू पोहोचवण्यात येतील. यावेळी माजी उपसरपंच बाळासाहेब लेणे, माऊली केमसे, कुंडलिक शिंदे, युवा नेते सागर निवृत्ती शितोळे, स्वप्नील केमसे, संजय भिंताडे, ज्ञानेश्वर जरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget