लॉकडाऊन’मुळे बावधनच्या 250 कुटुंबांना धान्य व अत्यावश्यक वस्तूंचे वितरण

पुणे (टाईम न्युजलाईन नेटवर्क):
           कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन परिस्थिती लागू करण्यात आली आहे. नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळण्यात काही अडचण येवू नये, यासाठी तसेच इतर सर्व तक्रारींसाठी नियंत्रण कक्ष सुरु असून  त्यासाठी  उपजिल्हाधिकारी सुनिल गाडे  यांची स्वतंत्र समन्वयक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील एकही व्यक्ती अन्न-धान्यापासून वंचित राहणार नाही, यासाठी  जिल्हा प्रशासन कटीबद्ध आहे. नागरिकांना काही अडचण असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.
                   ‘लॉकडाऊन’मुळे मावळ आणि मुळशी परिसरातील कुटुंबाला शासनाच्या धान्यवाटप योजनेचा मोठा आधार वाटत आहे. आमदार संग्राम थोपटे, उप विभागीय अधिकारी  संदेश शिर्के व मुळशीचे तहसिलदार अभय चव्हाण यांच्या उपस्थितीत बावधन ग्रामपंचायत पदाधिका-यांच्या सहकार्यातून येथील 200 कुटुंबांना पुढील पंधरा दिवसाचा
 शिधा व अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. वाटप करतांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे काटेकोर पालन करण्यात आले. वाटप करण्यात आलेले साहित्य साधारणपणे 15 दिवस इतके पुरेल. आवश्यकतेनुसार  वाटप सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.    प्रशासन नागरिकांच्या अडीअडचणीसंदर्भात संवेदनशील असल्याचे कृतीतून जाणवते आहे.
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget