April 2020हिंजवडी (टाईम न्युजलाईन नेटवर्क)
: कोरोनामुळे देशभरात मागील महिन्या भरापासून लोकडाऊन सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल सुरू आहेत. अनेकांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक परिवारातील नागरिकांना कम नसल्याने पैशांची चणचण निर्माण होत आहे. त्यामुळे रोजच्या आवश्यक वास्तुदेखील खरेदी करणे अशक्य होतं आहे. याच गरजा ओळखून कासारसाई येथील उद्योजक कैलास तुळशीराम शितोळे, गणेश बारकू शेडगे व कासारसाचे माजी सरपंच बाळासाहेब भिंताडे यांनी कासारसाई कासारसाई येथील कामानिमत्त आलेल्या व भाडेकरू म्हणून राहणाऱ्या सुमारे ८१ कुटुंबाना धान्य व रोजच्या वस्तूंचे वाटप केले. यामध्ये ५ किलो गहू, ५ किलो तांदूळ, तेल, साबण, चहा पावडर, टूथपेस्ट, डाळ अशा अनेक वस्तू आहेत. याबाबत माजी सरपंच बाळासाहेब भिंताडे म्हणले, येथील अनेक नागरिक वेळेअभावी आपल्या गावी परत जाऊ शकले नाहीत. त्यामुळे ते आता येथेच राहत आहेत. यातील अनेक जण नोकरी, मोलमजुरी तसेच सोसायट्यांमध्ये मिळेल ते काम करत आहेत. त्यांची यादी तयार करून, परिसरातील दानशूर लोकांनी त्यांना आवश्यक मदत करणे गरजेचे आहे. मागील आठवड्यात अशाच सुमारे ६५ कुटुंबाना धान्य व जीवणावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले होते. उद्योजक गणेश शेडगे व कैलास शितोळे म्हणाले, अशा गरजवंतांना मदत करणे गरजेचे आहे. अद्यापही कासारसाई येथील अनेक गरजु कुटुंबाना मदत करणे आवश्यक असून, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे अशा नागरिकांची यादी तयार करून त्यांना आवश्यक त्या वस्तू पोहोचवण्यात येतील. यावेळी माजी उपसरपंच बाळासाहेब लेणे, माऊली केमसे, कुंडलिक शिंदे, युवा नेते सागर निवृत्ती शितोळे, स्वप्नील केमसे, संजय भिंताडे, ज्ञानेश्वर जरे आदी मान्यवर उपस्थित होते.


 
  पुणे(टाईम न्युजलाईन नेटवर्क): पुणे विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1085 झाली असून विभागात 181    कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 831 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 73     रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच  38 रुग्ण  गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

  विभागात  1085  बाधित रुग्ण असून 73   रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात   985 बाधीत रुग्ण असून 67  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 21  बाधीत रुग्ण असून  2  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात  41 बाधीत रुग्ण असून 3  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात   28 बाधीत रुग्ण असून 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर  जिल्हयात   10 बाधीत रुग्ण आहेत.
  आजपर्यंत विभागामध्ये एकूण 12 हजार 755 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी    12 हजार 86 चा अहवाल प्राप्त आहे.  669 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 10  हजार  939   नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून  1 हजार 85 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
  आजपर्यंत विभागामधील 49 लाख  58 हजार 977  घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्या अंतर्गत  1 कोटी 91 लाख 16 हजार 464  व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 989  व्यक्तींना  अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.
                                 


पुणे,(टाईम न्युजलाईन नेटवर्क):
-  कारखान्यामधील किंवा औद्योगिक आस्थापनांमधील कर्मचारी किंवा कामगाराला कोरोना विषाणूची लागण झाल्यास संबंधित मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा शासनाने कुठलाही निर्णय घेतला नसल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कळविले आहे.
          कामगाराला विषाणू लागण झाल्यास मालकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात येणार असल्याचे  मेसेज
सोशल माध्यमे किंवा व्हॉटस्ॲपवरुन फॉरवर्ड केले जात आहेत. असे फॉरवर्ड केले जाणारे मेसेजेस चुकीचे आहेत. हे मेसेज कोणीही फॉरवर्ड करू नये तसेच या मेसेजवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.
  कोरोना विषाणूची कोणालाही लागण झाल्यास शासनाच्या आरोग्य विभागामार्फत योग्य ती काळजी घेण्यात येईल. चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही. ज्या भागात कारखाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे तेथील कारखाना आस्थापनांनी कोरोना रोखण्यासाठी जारी करण्यात आलेल्या सोशल डिस्टन्सिंग आणि इतर सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.


   
 *विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर*


  *विभागात 135 कोरोना बाधित रुग्ण बरे*

  *विभागामधील 45 लाख 86 हजार 612 घरांचे सर्वेक्षण पूर्ण तर*
*1 कोटी 76 लाख 36 हजार 673 व्यक्तींची तपासणी*
 
पुणे
  (टाईम न्युजलाईन नेटवर्क) पुणे विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 896 झाली असून विभागात 135 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 700 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 61 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 12 रुग्ण  गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
  विभागात 896 बाधित रुग्ण असून 61 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 813 बाधीत रुग्ण असून 55 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 16 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 30 बाधीत रुग्ण असून 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 27 बाधीत रुग्ण असून  एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर  जिल्हयात 10 बाधीत रुग्ण आहेत.
  आजपर्यत विभागामध्ये एकुण  10  हजार 717  नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 10 हजार 210  नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे तर 507 नमून्यांचा अहवाल  प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 9 हजार 264 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 896 चा अहवाल  पॉझिटिव्ह आहे.
  आजपर्यंत विभागामधील 45 लाख 86 हजार 612 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 1 कोटी 76 लाख 36 हजार 673 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 865 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.
                   


*पहिल्या टप्प्यात 42 हजार मास्कचे वितरण*
                
*जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची माहिती*


            पुणे (टाईम न्युजलाईन नेटवर्क):- कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने तीन लाख ट्रिपल लेअर सर्जिकल अल्ट्रासोनिक मास्क खरेदी करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी  नवल किशोर राम यांनी दिली आहे.

    पुणे पोलीस आयुक्त कार्यालयासाठी दहा हजार मास्क, तर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयासाठी सात हजार मास्क तसेच पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण कार्यालयाला दहा हजार मास्क वितरीत करण्यात येणार आहेत. याबरोबरच सर्व तहसिलदार कार्यालयांना प्रत्येकी एक हजार प्रमाणे पंधरा हजार मास्क वितरीत करण्यात येणार आहेत.

 पहिल्या टप्यात एकुण 42 हजार मास्क वितरीत करण्यात येत आहेत.  उर्वरित मास्क टप्याटप्याने सर्व संबंधित यंत्रणांना वितरीत करण्यात येतील, असेही जिल्हाधिकारी श्री. राम यांनी सांगितले.- बरे झालेल्या कोरोनाबाधीत रुग्णांनी व्यक्त केल्या भावना*
*• तीन वर्षाच्या मुलापासून ते ९२ वर्षाची कोरोनाबाधित महिला बरी होऊन घरी गेली.*
*• सिंम्बायोसिस हॉस्पिटलमधून आज १५ रुग्णांना सुटी देण्यात आली.*
पुणे (टाईम न्युजलाईन नेटवर्क):
          कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आम्ही भयभीत झालो होतो. जेव्हा आमची चाचणी करण्यात आली, तेव्हा अख्खे कुटुंब पॉझिटिव्ह असल्याचे अहवाल प्राप्त झाले. आमचं कसं होणार, आयुष्याचं काही खरं नाही, अशी चिंता लागली होती, परंतु डॉक्टरांच्या अथक प्रयत्नामुळे आम्ही बरे झालो, अशी भावना पुणे स्टेशन परिसरातील एका कुटुंबाने व्यक्त केली.
या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य कृतज्ञतापूर्व भावना व्यक्त करताना म्हणतात, सुरुवातीला आमच्या वडिलांना न्यूमोनिया झाला. नंतर आम्ही त्यांना उपचारासाठी खाजगी दवाखान्यात नेले,  पण कोणी दाखल करुन घेतले नाही. अखेर पुणे महानगरपालिकेच्या नायडू इस्पितळात नेले, मात्र त्यांनी ससून रुग्णालयात पाठविले, त्यांना कोरोनाची लागण झाल्याने स्वतंत्र वार्डात ठेवण्यात आले. व्हेंटीलेटरवर ठेवून उपचार करण्यात आले. परंतु न्युमोनिया आजार असल्याने त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला.
पुन्हा आमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. आमचे कुटुंब व नातेवाईक मिळून जवळपास २० जणांना कोरोनाची बाधा झाली. सर्व जण घाबरलो,  २० पैकी ८ जण आम्ही एकाच कुटुबांतील होतो. आम्हाला लवळे येथील सिम्बॉयोसिस रुग्णालयात उपचारार्थ आयसोलेशनसाठी ठेवण्यात आले होते. खरं तर फार चिंतेत होतो, अख्खं कुटुंब कोरोनाबाधित झालं. पण सुदैवाने आम्ही बरे झालो. या १५ दिवसात तणाव होता, परंतु डॉक्टर्स, नर्स आणि रुग्णालयातील सर्व सदस्य एवढ्या आपुलकीने वागत होते की, जणू काही आम्ही त्यांच्याच कुटुंबातील सदस्य आहोत.  खूप आपुलकीची भावना निर्माण झाली या निमित्ताने नागरिकांना आम्ही असे आवाहन करतो की, घाबरु नका, पण काळजी घ्या. शासन आपल्यासाठी खूप काही करीत आहे.  सर्दी, ताप, खोकला झाल्यास बिनधास्त दवाखान्यात जा, उपचार करुन घ्या. कोरोनाची लागण झाली तरी हिमतीने सामोरे जा... आपल्यासाठी सर्व यंत्रणा राबते आहे. आपल्याला फक्त हिंमत द्यायची असते.
सिंम्बायोसिस रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय नटराजन म्हणाले, आमच्या लवळे येथील सिंम्बायोसिस रुग्णालयात १५५ रुग्ण दाखल आहेत. आज बरे होऊन घरी गेलेले १५ रुग्ण ८ एप्रिल २०२० रोजी रुग्णालयात दाखल झाले होते. १४ दिवस उपचारार्थ ठेवण्यात आल्यानंतर जेव्हा त्यांचे सॅम्पल निगेटिव्ह आले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसून येत होता. ९२ वर्षाच्या आजीबरोबर त्यांच्याच कुटुंबातील ३ वर्षांची मुलगी व एक पोलिओग्रस्त रुग्ण होता.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने सिंम्बायोसिस रुग्णालय व भारती रुग्णालयाबरोबर करार केला असल्याची माहिती मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. भविष्यात रुग्ण वाढले तर तयारी असावी या हेतूने आमचे प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

           पुणे (टाईम न्युजलाईन नेटवर्क) : -  सध्या वाढत जाणा-या कोरोना बाधित रुग्णांची सॅम्पल तपासणी जलदगतीने होण्यासाठी डायना फिल्टर्स या कंपनीने कोविड सॅम्पल कलेक्शन बूथ हे उपकरण विकसीत केले असून ससून हॉस्पीटलमध्ये कार्यान्वीत करण्यात येणार आहे. या नाविण्यपूर्ण उपकरणाची विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी पाहणी केली.
या उपकरणामुळे पीपीई किटसचा वापर न करताही सॅम्पल कलेक्शन करता येऊ शकेल. त्यामुळे कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त सॅम्पल टेस्टींग घेता येतील. अशी माहिती या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अभिजीत येमुल यांनी दिली.
यावेळी पाहणी करताना विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर यांनी यामध्ये काही सुधारणा सुचविल्या. हे उपकरण निश्चितच उपयोगी राहील, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. यावेळी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, मुख्य अभियंता सदाशिव साळुंखे उपस्थित होते.पुणे (टाईम न्युजलाईन नेटवर्क) : -  लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये कोरोना साथीचा संसर्ग रोखण्याकरीता विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तथापि, या कालावधीमध्ये नागरिकांची गैरसोय होऊ नये, त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरीता  प्रशासनाकडून  विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावी नियोजन करण्यात आले आहे. याचाच भाग म्हणजे आतापर्यंत विभागामध्ये जीवनावश्यक वस्तू म्हणजेच अन्नधान्य, भाजीपाला, दूध व फळांचा पुरेसा साठा उपलब्ध होत आहे.
या जीवनावश्यक वस्तूंच्या साठयाबाबत व दररोज किती प्रमाणात आवक होत आहे याबाबतचा आढावा दररोज घेण्यात येतो. यामध्ये पुणे येथील मार्केटमध्ये विभागात 48 हजार 604  क्विंटल अन्नधान्याची सरासरी आवक असून भाजीपाल्याची सरासरी आवक 9 हजार 953 क्विंटल, फळांची 1 हजार 97 क्विंटल  तसेच कांदा / बटाट्याची 12 हजार 534 क्विंटल इतकी सरासरी आवक आहे. विभागात सरासरी 99.258 लाख लिटर दुधाचे संकलन होत असून सरासरी 22.906 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण होते. उर्वरित दूध सुट्ट्या स्वरुपात वितरित करण्यात येते.
             स्थलांतरीत मजुरांच्या निवास व भोजन पुरवठयाबाबत शासनाने स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार विभागामध्ये निवारा केंद्रे (रिलीफ कॅम्प) सुरु करण्यात आले आहेत. आवश्यकतेनुसार यामध्ये वाढ देखील करण्यात येत आहे. विभागामध्ये जिल्हा प्रशासनामार्फत 142 व साखर कारखान्यामार्फत 1112 असे एकूण 1254 निवास केंद्रे स्थलांतरीत मजुरांसाठी उभारण्यात आले आहेत. यामध्ये एकूण 1 लाख 27 हजार 304 स्थलांतरीत मजूर असून एकूण 1 लाख 99 हजार 836 मजुरांना भोजन देण्यात येत आहे.
विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुण्यात पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर संभाव्य धोका ओळखला  आणि त्यादृष्टिने टप्प्याटप्प्याने पावले उचलण्यास सुरुवात केली. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहिला तर इतर समस्यांवर मात करणे अवघड नाही, हे लक्षात घेऊन नियोजन केले. व्यापारी महासंघ, दुध उत्पादक, दुध वितरक, अन्नधान्य व्यापारी, शेतकरी गट यांच्याबरोबर चर्चा करुन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. उपस्थित करण्यात आलेल्या शंकाचे समाधान करण्यात आले. पुणे शहरातील निवासी सोसायटयांमध्येही पॅकेजिंग स्वरुपात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होण्याबाबत सूचना देण्यात आल्या. प्रशासनाच्या नियोजनबध्द प्रयत्नांमुळे व निर्णयांमुळे  नागरिकांची गैरसोय मोठया प्रमाणात टळण्यास मदत झाली. हाच पुणे पॅटर्न इतर जिल्हयात अंमलात आणण्यात आल्यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीतही जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहिला.टाळेबंदी राहणारच, परंतु टप्प्याटप्याने अर्थव्यवस्थेला गती देणार

मुंबई, (टाईम न्युजलाईन नेटवर्क):-  कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी टाळेबंदीची मुदत तीन मेपर्यंत वाढवली असून रेल्वे, मेट्रो, सार्वजनिक वाहतूक, सण, उत्सव, जाहीर कार्यक्रमासारखे बहुतांश व्यवहार यापुढेही बंद राहणार आहेत. राज्यात टाळेबंदीचे काटेकोर पालन यापुढेही सुरु राहील, त्याचबरोबर नागरिकांच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण व्हाव्यात, जनतेला आरोग्य सुविधा मिळाव्यात, शेतीची, मशागतीची कामे वेळेवर सुरु व्हावीत, अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी कोरोनासंदर्भातील मार्गदर्शक    नियमावली व आदेशांचे काटेकोर पालन करण्याच्या अटींवरच काही बाबींना मर्यादित स्वरुपात परवानगी देण्यात आली आहे. सोमवारी, 20 एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  आज दिली.
देशात जाहीर टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने काल मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. नागरिकांनी त्याचं काटेकोर पालन करावं, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केल आहे. मार्गदर्शक नियमावलीनुसार ग्रामीण भागातील उद्योग, निवडक व्यवसाय, व्यापारी आस्थापनांना कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या अटींवर परवानगी देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. राज्यात टाळेबंदीची मुदत वाढवण्यात आली असली तरी नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा यापुढेही नियमित सुरु राहील, त्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे. नागरिकांना, कोरोना प्रसार रोखण्यासाठी घरातच थांबावं, घराबाहेर पडू नये, सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असं आवाहनही केलं आहे. 
उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, टाळेबंदीसंदर्भात केंद्राच्या सूचनांचे राज्यात काटेकोर पालन करण्यात येत आहे. टाळेबंदी लागू असली तरी जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला परवानगी आहे. दवाखाने, हॉस्पिटल, औषधांची दुकाने, पॅथोलॉजी सेंटर, ॲम्बुलन्स सेवा सुरु आहेत. शेतीच्या मशागतीच्या कामांवरही कोणतही बंधन नाही. शेती आणि शेती उद्योगाशी संबंधीत सर्व कामे, दुकाने, व्यवहार सुरक्षिततेची काळजी घेऊन सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तूर, कापूस, हरभरा खरेदी योजना देखील सुरु राहणार आहे. दूधव्यवसाय, पशुपालन, मत्स्योद्योगविषयक कामांनाही परवानगी आहे. रोजगार हमी योजनेची कामे सुरु राहणार आहेत. अनाथालये, वृद्धाश्रम आदी सामाजिक संस्थांचं कामकाजही सुरु राहील. अंगणवाड्या बंद असल्या तरी बालकांना पोषणआहार घरपोच दिला जाणार आहे. शाळा, कॉलेज बंद असली तरी ऑनलाईन शिक्षणाला प्रोत्साहन देण्यास सांगण्यात आले आहे. बँका, वित्तीय संस्थांचे व्यवहार सुरु राहणार असले तरी नागरिकांनी तिथे गर्दी करु नये, असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. राज्यातील कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी टाळेंबंदीला सर्वांनी सहकार्य करावं, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन व्यक्तींमध्ये अंतर राखावं, घरातूनच काम करा, घरातंच रहा, सुरक्षित रहा, टाळेबंदीचं पालन करा, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.                                        पुणे,(टाईम न्युजलाईन नेटवर्क) : राज्यात कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य आजारामुळे जिल्ह्यात आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निमार्ण झालेली आहे. कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून येत्या काळात रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदाची उपाय म्हणून नागरिकांच्या सार्वजनिक हिताच्या दृष्टीने हवेली तालुक्यातील काही ग्रामपंचायतीचा परिसर आज मध्यरात्री 12.00 वाजलेपासून पुढील आदेश येईपर्यंत सील करण्यात येत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा इंन्सिडंट कमांडर सचिन बारवकर यांनी आदेशान्वये दिली आहे.
साथरोग प्रतिबंध अधिनियम 1897 मधील तरतुदी व तहसिलदार हवेली यांच्या अहवालानुसार हवेली तालुक्यातील वाघोली, आव्हाळवाडी, बावडी, केसनंद, नांदेड, खडकवासला, किरकटवाडी, सोनापूर, मालखेड, वरदाडे, जाभुंळवाडी आणि कोळेवाडी या ग्रामपंचायतीचा परिसर कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून आज मध्यरात्री 12.00 वाजलेपासून सील करण्यात येणार आहे. या परिसरातील संबंधित पोलीस स्टेशन प्रमुखांनी परिसर सील करण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
सील करण्यात आलेल्या भागात नागरिकांना प्रवेशबंदी व त्याभागातून बाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक कामाकरीता घराबाहेर पडतांना प्रत्येकांनी  तोंडाला मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. तथापि सील करण्यात आलेल्या भागात लावण्यात आलेल्या निर्बंधातून कृषी उत्पन्न बाजारसमितीमधील व्यवहार व तेथील मालाची आवक-जावक, जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे व्यक्ती, कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या अनुषंगाने काम करणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहनांना या आदेशातून वगळण्यात आले आहे. तसेच येत्या काळात रुग्णांची संख्या लक्षात घेता इतर भागात देखील या प्रकारचे निर्बंध लागू करण्यात येईल.  त्यामुळे नागारिकांनी किमान सात दिवस पुरेल इतक्या जीवनाश्यक वस्तूंची गर्दी न करता खरेदी करावी, अशी माहिती उपविभागीय अधिकारी तथा इंन्सिडंट कमांडर सचिन बारवकर यांनी दिली आहे.        विभागातील  68 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

         
        पुणे (टाईम न्युजलाईन नेटवर्क) :- विभागातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 472 झाली आहे. तथापी ॲक्टीव रुग्ण 362 आहेत. विभागात कालच्या अहवालानंतर 15 एप्रिल 2020 रोजी 3 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे तीनही रुग्ण पुणे महानगरपालिका क्षेत्रातील आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

            15 एप्रिल रोजी ससून हॉस्पीटल येथे पुण्यातील 73 वर्षीय कोरोना बाधीत रुग्णाचा मृत्यू झाला             आहे. या रुग्णास  निमोनिआ  व  किडनी  विकार होता. 15 एप्रिल 2020 रोजी  ससून हॉस्पीटल येथे पुण्यातील 34 वर्षीय कोरोना बाधीत  रुग्णाचा  मृत्यू झाला आहे.  तसेच ससून हॉस्पीटल येथे पुण्यातील 63 वर्षीय कोरोना बाधीत  रुग्णाचा  मृत्यू झाला असून या रुग्णास निमोनिआसह मायोकार्डीटीस विकार होता.

            विभागात 472 बाधित रुग्ण असून 42 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 427 बाधीत रुग्ण असून 39 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 11 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 2 बाधीत रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 26 बाधीत रुग्ण असून कोल्हापूर जिल्हयात 6 बाधीत रुग्ण आहेत.

            आजपर्यत  विभागामध्ये एकुण  6 हजार 236 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 5 हजार 943 चा अहवाल प्राप्त आहे. तर 293 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 5 हजार 427 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 472 नमुन्यांचा अहवाल  पॉजिटिव्ह आहे.

            आजपर्यंत विभागामधील 33 लाख 93 हजार 921 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 1 कोटी 30 लाख 29 हजार 12 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 787 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.पुणे,(टाईम न्युजलाईन नेटवर्क)
:- जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कोरोना विषाणू साथ संसर्ग उपाययोजनेच्या अनुषंगाने पारीत करण्यात आलेले सर्व आदेश हे या कार्यालयाच्या पुढील आदेशापर्यंत लागू राहतील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी कळविले आहे.

    आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये व् कोरोना विषाणू (कोव्हीड-19) प्रादूर्भाव रोखण्यासाठी साथ रोग प्रतिबंधक कायद्यानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांच्यामार्फत कोरोना विषाणू साथ संसर्ग अनुषंगाने विविध आदेश पारीत करण्यात आले होते. तथापि, लॉकडाऊन बाबत राज्यात सुधारित घोषणा झाल्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोरा राम यांनी प्राप्त अधिकारानुसार पुणे जिल्ह्यामध्ये यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कोरोना विषाणू साथ संसर्ग उपाययोजनेच्या अनुषंगाने पारीत करण्यात आलेले सर्व आदेश हे या कार्यालयाचे पुढील आदेशापर्यंत लागू राहतील, असे स्पष्ट केले आहे.  या आदेशाचे व्यक्तींनी/ नागरिकांनी उल्लंघन केल्यास त्यांच्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राम यांनी कळविले आहे.


मुंबई,(टाईम न्युजलाईन नेटवर्क) :  स्थलांतरीत रेशन कार्ड धारकांना धान्य मिळत नाहीअशा स्वरूपाच्या तक्रारी, सूचना काही ठिकाणाहून प्राप्त होत  आहेत. अडचणीच्या काळात या स्थलांतरीत कुटुंबाना त्यांचे देय रेशन उपलब्ध करून देण्यासाठी महसूल यंत्रणा काम करत असल्याची माहिती  महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था (प्राधान्य कुटुंब व केशरी कार्डधारक) यांना शासनाने निश्चित केलेल्या प्रमाणात व शासनाने निश्चित केलेल्या दराप्रमाणे स्थलांतरित ठिकाणी (रेशनकार्ड पोर्टेबिलिटी) धान्य उपलब्ध करून देण्याच्या सूचना अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिल्या आहेत.  लॉकडाऊनच्या काळात जी किराणा दुकाने अथवा अत्यावश्यक सेवा केंद्रे उघडी ठेवली जात आहेततेथेही सर्वसामान्यांना वाढीव दराने माल विकला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त आहेत. यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करावी. महाराष्ट्रातील लॉकडाउन आता 30 एप्रिल 2020 पर्यंत वाढविण्यात आला आहे,त्यामुळे आवश्यकता भासल्यास स्वतंत्र हेल्पलाईन निर्माण करावी, अशा सूचना मंत्री श्री. थोरात यांनी विभागाला दिल्या  आहेत.
महसूल मंत्र्यांकडून अधिकारी- कर्मचाऱ्यांचे कौतुक
24 मार्च 2020 पासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महसूल व अन्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी अतिशय प्रभावीपणेप्रामाणिकपणे रात्रंदिवस काम करीत आहेतयाचा सार्थ अभिमान आहे. अतिशय बिकट परिस्थिती आणि उपलब्ध संसाधनाच्या साहाय्याने आपण सर्वजण जे काम करीत आहातते निश्चितच अभिनंदनीय असल्याचे महसूल मंत्री श्री. थोरात यांनी सांगितले.


पुणे (टाईम न्युजलाईन नेटवर्क) : - कोरोना विषाणू संसर्गजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी देशामध्ये वेगवेगळया प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहे. त्यानुसार बारामती येथील प्रशासनाकडून करण्यात येणा-या उपाययोजना या  इतर भागाकरीता अनुकरणीय असल्याने हा "बारामती  पॅटर्न" राज्यभर मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी व्यक्त केला.
   कोरोना विषाणूमुळे बारामती येथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे प्रशासनाला आवश्यक त्या   उपाययोजना  करण्याच्या सूचना केल्या. त्यानुषंगाने आज बारामती येथील शासकीय विश्रामगृहात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक जयंत मिना, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, बारामती नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी योगेश कडूसकर, पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगावकर, सिल्व्हर ज्युबिली शासकीय ग्रामीण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.सदानंद काळे, रुई ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिल दराडे तसेच इतर संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
  जिल्हाधिकारी राम यांनी बारामती येथे प्रशासकीय यंत्रणांकडून करण्यात येत असलेल्या उपाय योजनांची माहिती घेतली. यावेळी बारामती शहरामध्ये एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्यामुळे त्या व्यक्तीच्या आणि त्याच्या नातेवाईकांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेवून त्या व्यक्तींना विलगीकरण करण्यात यावेत, त्यांच्या वैद्यकीय तपासणीबाबत वेळोवेळी आढावा घेण्यात यावा, ज्या व्यक्ती होम  कोरंटाईन आहेत त्यांच्या हातावर शिक्के मारल्याची खात्री करावी.  तसेच वेळोवेळी त्यांचा अहवाल सादर करण्याच्या सूचना  दिल्या. त्याबरोबरच  बारामतीमधील शासकीय रुग्णालये व खाजगी रुग्णालयांमध्ये  तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्ष व बेड तसेच व्हेंटिलेटर व इतर अत्यावश्यक सामुग्रीच्या  उपलब्धतेचा आढावा घेतला.
 
                       यावेळी  जिल्हाधिकारी राम यांनी स्थलांतरीत मजुरांच्या निवारा केंद्राबाबत माहिती घेतली आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या मजुरांना भोजनाची कमतरता भासणार  नाही, याची काळजी घेण्याविषयी तसेच आवश्यकतेनुसार निवारा केंद्राची वाढ करण्यात यावी,  असे सांगितले.  शिवभोजन केंद्रामार्फत देण्यात येणा-या भोजनाचा आढावा घेतला. केंद्र व राज्य शासनाच्या अन्न व धान्य योजनांमधून पुरेसे धान्य त्या-त्या महिन्यात नागरिकांना वितरीत   करण्याच्या आणि जीवनावश्यक वस्तूंच्या  तसेच दूध, पाणीपुरवठयाबाबत वितरण व्यवस्थितपणे करण्यात यावे अशा सूचना दिल्या. त्याचबरोबर प्रशासनाने आवश्यक ते निर्णय स्वत:च्या पातळीवर घेण्याचेही त्यांनी सांगितले. जीवनावश्यक वस्तू जादा भावाने विकल्यास त्या दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
   बारामतीमधील सर्वच प्रशासकीय यंत्रणांनी आपापसात योग्य तो समन्वय ठेवावा, दिलेल्या सूचनांप्रमाणे कार्यवाही करावी, आतापर्यंत सर्वच तयारीबाबत प्रशासनाने निश्चित चांगले काम केले आहे. या परिस्थिातीला आत्मविश्वासाने सामोरे जावे, याबाबतीत पूर्णपणे निष्कर्ष निघेपर्यंत  सतर्क रहावे, काही अडचण आल्यास तात्काळ कळविण्यात यावे, जेणेकरुन त्यावर उपाययोजना करता येणे शक्य होईल, असे सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद तसेच पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.  बैठकीनंतर सिल्व्हर ज्युबिली शासकीय ग्रामीण रुग्णालयातील विलगीकरण कक्ष तसेच बेड्सची व इतर आवश्यक साधनसामग्रीची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी अधिष्ठाता डॉ. सदानंद काळे यांनी तयारीविषयी माहिती दिली. यावेळी रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचा-यांशी जिल्हाधिकारी राम यांनी संवाद साधला व त्यांच्या अडचणींविषयी चर्चा केली.

असा आहे कोरोना प्रतिबंधाकरीता बारामती पॅटर्न
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारामती शहरामध्ये  प्रशासन आणि पोलीस यंत्रणेमार्फत एकूण 44 झोन केले असून त्यामध्ये प्रत्येक झोनसाठी मदत सहायता अधिकारी, त्यांना सहाय्य करण्यासाठी 10 स्वयंसेवक व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 1 वॉर्ड मार्शल नेमण्यात आला आहे. यांच्या मदतीने आरोग्य सेवा, रेशन, अन्नधान्य पुरवठा, दूध व भाजीपाला, फळे, गॅस सिलेंडर घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे सोशल डिस्टंसिंगची योग्य प्रकारे अंमलबजावणी होणार आहे. या टीममार्फत कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी व त्याची साखळी तुटण्यासाठी ज्या रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, त्यांचे हायरिस्क कॉन्टॅक्ट व लो रिस्क कॉन्टॅक्ट शोधून वेळीच त्यांना अलग करण्यात येईल व गरज भासल्यास त्यांची कोविड तपासणी करण्यात येईल.  आरोग्य विभागाकडून अशा रुग्णांची तपासणी करुन ज्यांना रक्तदाब (बीपी), मधुमेह (शुगर) व इतर गंभीर आजार असल्यास शोधून त्यांची तपासणी करता येईल. तसेच या दरम्यान सोशल डिस्टंसींगची अंमलबजावणी होते की नाही यावर देखील नजर ठेवता येणे शक्य होईल.


विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली माहिती
                   
        पुणे,(टाईम न्युजलाईन नेटवर्क)
: राज्यात कोरोना विषाणु बाधित रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुणे विभागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाचा दोन दिवसीय दौरा पार पडला. दरम्यान विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय पथकाची बैठक पार पडली. यावेळी केंद्रीय आरोग्य विभागाचे अतिरिक्त महासंचालक तथा केंद्रीय पथकाचे अध्यक्ष डॉ.पी.के.सेन, राम मनोहर लोहीया (आर.एम.एल.) रुग्णालयाचे वैद्यकीय तज्ञ तथा पथकाचे सदस्य डॉ.रोहित बन्सल, सफदरजंग रुग्णालयाचे भुल तज्ज्ञ तथा सदस्य डॉ.सौरभ मित्र मुस्तफी, आरोग्य उपसंचालक डॉ.संजय देशमुख,सार्वजनिक आरोग्य विभागाचे राज्य सर्व्हेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप औटी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर,आदी उपस्थित होते.

            पुणे विभागात जिल्हानिहाय अद्यापपर्यंतचे कोरोना संशयित रुग्ण, बाधित रुग्णांची पार्श्वभूमी डॉ. म्हैसेकर यांनी विशद केली. तसेच कोरोना प्रतिबंधासाठी लॉकडाऊन कालावधीत प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोनाच्या अनुषंगाने करण्यात आलेली तयारीबाबत माहिती देवून आवश्यक असणारे पीपीई किट, औषध साठा आदी विषयांबाबत चर्चा केली.

            प्रशासन व आरोग्य विभागाच्या वतीने सुरु असणाऱ्या उपाययोजनांबाबत केंद्रीय पथकाने समाधान व्यक्त केले. दरम्यान या समितीने बी.जे.वैद्यकीय महाविद्यालय(ससून रुग्णालय), नायडू रुग्णालय, जिल्हा रुग्णालय औंध, यशवंतराव चव्हाण रुग्णालय व टेस्टींग लॅब या ठिकाणी भेटी देवून पहाणी केली. तसेच आरोग्य विभाग पुणे व पिंपरी चिंचवडचे महानगरपालिका आयुक्त, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी चर्चा करुन जिल्हयाची कोरोना विषयक सद्यस्थिती जाणून घेतली.                                                     
        पुणे (टाईम न्युजलाईन नेटवर्क): कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊनच्या कालावधीत अन्नधान्य, भाजीपाला पुरवठा सुरळीत सुरु राहण्यासाठी येत असलेल्या अडीअडचणींच्या अनुषंगाने कृषि उत्पन्न बाजार समिती, पुना मर्चंट चेंबर,आडते, हमाल, तोलणार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर  विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी चर्चा केली.

            यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, पणन संचालक सुनिल पवार, पुरवठा विभागाचे उपायुक्त  जयंत पिंपळगांवकर, जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड, अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बाळासाहेब देशमुख, पुना मर्चंट चेंबरचे सचिव विजय मुथा, अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, तोलणार संघटनेचे  अध्यक्ष राजेंद्र चोरघे, कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष नांगरे तसेच हमाल संघटना आदी उपस्थित होते.

            विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर म्हणाले, अन्नधान्य, भाजीपाला, किराणामाल याबरोबरच इतरही जीवनावश्यक वस्तु सुरळीत सुरु राहाण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या वस्तूंची वाहतुक  रस्त्यात पोलिसांनी अडवू नये, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पासेस देण्यात येतील. तसेच आतापर्यंत  पोलीस प्रशासनमार्फतही  अत्यावश्यक सेवेतील काही ट्रक, टेम्पोचालक यांना पासेस वितरण करण्यात आले आहेत. त्यांना मालवाहतूकीस ये-जा  करण्यास कुठल्याही प्रकारची अडचण भासणार नाही, याची जिल्हा प्रशासन पुरेपुर खबरदारी घेईल. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांनाही पास देण्यात येतील. परंतु त्या पासचा कुठल्याही प्रकारे गैरवापर होणार नाही, याची संबंधितांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. कामगारांचा विमा उतरवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने  प्रयत्न केले जातील. दररोज ग्रामीण भागातून ये-जा करणाऱ्या कामगारांसाठी बसेसची व्यवस्था करण्यात येईल. त्याचबरोबर ये-जा करणे शक्य नसणाऱ्या कामगारांसाठी राहाण्याची, जेवणाची व्यवस्था प्रशासनाकडून केली जाईल, असेही ते म्हणाले.

            यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती आणि विविध संघटनांना येणाऱ्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या बाबत योग्य ते मार्गदर्शनही डॉ.म्हैसेकर यांनी  केले. 


पुणे (टाईम न्युजलाईन नेटवर्क) : -  कोरोना संसर्गजन्य विषाणू प्रतिबंधाकरीता पुणे जिल्हयात लॉकडाऊन करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही नागरीक जीवनावश्यक सामग्रीपासून वंचित राहू नये,  याकरीता प्रशासनामार्फत विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले आहे.
      या उपाययोजनांचा भाग म्हणून पिंपरी चिंचवड परिसराध्ये प्रशासनामार्फत तसेच काही स्वयंसेवी संस्थामार्फत गरजू नागरिकांकरीता खाण्याचे फूड पॉकेट उपलब्ध करुन देण्याची सोय करण्यात आली आहे. यामध्ये सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यत तसेच संध्याकाळी 6 पासून रात्री 8 वाजेपर्यत खाण्याच्या फूड पॉकेटचे वितरण करण्यात येत आहे. महानगरपालिका कार्यालयाचे निवारा केंद्र   १) अ क्षेत्रीय कार्यालय ,स्थळ- आकुर्डी उर्दू प्रा./ मा. विद्यालय ,खंडोबामाळ मो.क्र-८८८८४४२१०, ९९२२५०१७७५ २) ब क्षेत्रीय कार्यालय ,स्थळ- केशवनगर प्रा./ मा. विद्यालय, चिंचवडगाव               मो क्र-८९२८३२३९१६, ९९२२५०१७०१ ३) ड क्षेत्रीय कार्यालय ,स्थळ- अण्णासाहेब मगर प्रा./ मा. विद्यालय, पिंपळे सौदागर मो.क्र-९९२३९८९७७४, ९९२२५०१७९१ ४) इ क्षेत्रीय कार्यालय , स्थळ- छत्रपती प्रा./ मा. विद्यालय, भोसरी संकुल           मो-क्र-७७९६१६२२४३, ९९२२५०१७३७ ५) ह क्षेत्रीय कार्यालय , स्थळ हुतात्मा भगतसिंग प्रा./ मा. विद्यालय,दापोडी         मो-क्र-७७२२०६०९२६ , ९९२२५०१७१९   ६) रात्र निवारा केंद्र भाजी मंडई, पिंपरी , मो-क्र-९९२२५०१२५५ या ठिकाणी संपर्क केल्यास खाण्याचे फूड पाकेट उपलब्ध होतील.
    त्याचप्रमाणे सामाजिक संस्थांपैकी  १) लक्ष्य फाउंडेशन, स्थळ-मोशी, मोबाईल क्र-९४२२०१४०७८                 २) राकेश वार्कोडे फाउंडेशन, स्थळ- काळेवाडी, मोबाईल क्र- ९६५७७०९०९०  ३) समाप्रीय फाउंडेशन,                    स्थळ-वाल्हेकरवाडी, मोबाईल क्र-९५९५९१००६६ 4) पीसीसीएफ,स्थळ- एम्पायर स्वेमोअर, मोबाईल क्र-९७६७१०८६८६       ५) पोलीस मित्र नागरिक संघटना, स्थळ- साने चौक, मोबाईल क्र-९५०३३३२०९५ ६) अग्रेसन संघटना, स्थळ-उर्दू माध्यमिक शाळा, आकुर्डी ,मोबाईल क्र-९०११०१९४१९ 7) संस्कार सोशल फाउंडेशन,स्थळ-वाल्हेकरवाडी,                         मोबाईल क्र-८४८४९९८६८९ ८) धर्म विकास संस्था ,रावेत, मोबाईल क्र-९९२३८००१८१ ९) काळभैरवनाथ उत्ससव समिती व जन कल्याण समिती,स्थळ-संपूर्ण पिंपरी चिंचवड मोबाईल क्र-९३७२९३७५९८ १०) विद्या सेवा ग्रुप आकुर्डी,            स्थळ-चिंचवड स्टेशन, मोबाईल क्र-९४२३५६९८१५ या संस्थामार्फत  त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क केल्यास आपल्याला खाण्याचे (फूड पॉकेट) उपलब्ध होतील. असे अपर तहसिलदार, पिपरी चिंचवड आपत्ती व्यवस्थापन कक्ष (COVID-19) ), संपर्क क्र- ०२०-२७६४२२३३ )   गीता गायकवाड यांनी कळविले आहे.
                                   


पुणे,(टाईम न्युजलाईन नेटवर्क): पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा धोका टाळण्यासाठी पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील मुख्य बाजार सह खडकी, मोशी,उत्तमनगर आदी उपबाजार आजपासून बंद राहणार आहेत. या सर्व मार्केट मधील फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा बाजार आजपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

       कोरोना चा धोका टाळण्यासाठी पुण्यातील या सर्व मार्केट मधील विविध विभाग बंद राहणार आहेत. फळे, भाजीपाला विभागासह कांदा-बटाटा बाजार पूर्णपणे बंद राहतील.  या सर्व बाजारातील भुसार आणि कडधान्य विभाग मात्र सुरु राहणार आहेत. सर्व शेतकरी आडते, व्यापारी, कामगार व टेम्पो चालक या सर्व बाजार घटकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन डॉ.म्हैसेकर यांनी केले आहे.वेल्हे (टाईम न्युजलाईन नेटवर्क): वेल्हे तालुक्यातील गरजू लोकांना 
श्री मळाई देववस्थान,वांगणी यांच्या माध्यमातून  अन्न धान्याचे वाटप करण्यात आले.व एक लाख रुपयांच्या रकमेचे हे वाटप करण्यात आली.
 त्याप्रसंगी वेल्हे तालुक्याचे तहसीलदार श्री शिवाजी शिंदे, तलाठी ,देवस्थानचे .विश्वस्त दिगंबर चोरघे, बाळासाहेब चोरघे, विश्वनाथ चोरघे,विजय चोरघे,संभाजी निढालकर,तानाजी चोरघे,रामदास चोरघे,भरत चोरघे उपस्थित होते. बुधवार दि 8 एप्रिल 2020 रोजी मळाई मंदिरामध्ये तहसीलदारांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले

:विभागात 88 ‍ठिकाणी क्वॉरंटाईन‍ सुविधा

:विभागात 12 हजार 850 बेड्स उपलब्ध

:52 ‍ठिकाणी आयसोलेशन सुविधा

:16 लाख 33 हजार 970 घरांचे सर्वेक्षण  तर 75 लाख 75 हजार 490 व्यक्तींची तपासणी

:
शासकीय धान्य गोदामात 23 हजार 411.708 मे.टन धान्यसाठा उपलब्ध

        पुणे, (टाईम न्युजलाईन नेटवर्क): -  पुणे विभागातील कोरोना सांसर्गिक एकुण रुग्ण संख्या 104 झाली असून पुणे जिल्ह्यात- 74, सातारा- 3 सांगली- 25 आणि कोल्हापूर जिल्हयात 2  रुग्ण आहेत. तपासणीसाठी पाठविलेले एकुण नमुने 2 हजार 265 होते. त्यापैकी 2 हजार 58 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून 207 नमुन्यांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. प्राप्त अहवालांपैकी 1 हजार 915 नमुने निगेटीव्ह आहेत व 104 नमुने पॉझिटीव्ह आहेत. आतापर्यंत 19 रुग्णांना बरे झाल्यामूळे रुग्णालयामधून सोडण्यात आलेले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

          पुणे विभागामधील 8 हजार 615 प्रवाशांपैकी 3 हजार 977 प्रवाशांबाबत पाठपुरावा सुरू असून 4 हजार 638 प्रवाशांबाबत पाठपुरावा पूर्ण झाला आहे. आजपर्यंत 16 लाख 33 हजार 970 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 75 लाख 75 हजार 490 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 542  व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

        विभागामध्ये सद्यस्थितीत एकुण 88 ‍ठिकाणी कॉरंटाईन‍ सुविधा निर्माण करण्यात आली असून या ठिकाणी एकुण 12 हजार 850 बेड्स उपलब्ध आहेत. तसेच 52 ‍ठिकाणी आयसोलेशन सुविधा निर्माण करण्यात आली असून या ठिकाणी एकुण 2 हजार 167 बेड्स उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे विभागामध्ये शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रुग्णालयांकडे सद्यस्थितीत एकुण N95 मास्क -53 हजार 640, ट्रीपल लेअर मास्क -2 लाख 64 हजार 429 उपलब्ध आहेत. तसेच 3 हजार 581-पीपीई कीट, 13 हजार 106- हॅण्ड सॅनिटायझर (500 मिली.), 4 हजार 539- व्हीटीएम कीट व शासकीय रुग्णालयात 137 व्हेंटीलेटरर्स तर खाजगी रुग्णालयात 1 हजार 328 व्हेंटीलेटरर्स उपलब्ध आहेत.

विभागात अन्नधान्य, भाजीपाला, दूध व फळांचा पुरेसा साठा

        पुणे विभागातील शासकीय धान्य गोदामात 23 हजार 411.708 मेट्रिक टन धान्यसाठा उपलब्ध आहे. पुणे विभागात अंत्योदय (AAY)व प्राधान्य कुटुंब लाभार्थी (PHH) योजना अंतर्गत 27 लाख 8 हजार 711 शिधापत्रिकाधारक  कुटुंबापैकी आतापर्यंत  9 लाख 4 हजार 604 कुटुंबांना गहू, साखर, तूरडाळ, चणाडाळ व तांदळाचे 2 लाख 18 हजार 621.45 क्विंटल धान्य वितरण करण्यात आले आहे.

मार्केट मध्ये विभागात अंदाजे एकूण 28 हजार 936 क्विंटल अन्नधान्याची आवक झाली असून भाजीपाल्याची आवक 9 हजार 901 क्विंटल, फळांची  आवक 4 हजार 431 क्विंटल तसेच कांदा/ बटाट्याची 9 हजार 168 क्विंटल इतकी आवक झाली आहे. विभागात  दि.3 एप्रिल 2020 रोजी 101.84 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 25.70 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्ट्या स्वरुपात वितरित करण्यात आले आहे.

विभागात स्थलांतरीत मजूरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 109 व साखर कारखान्यांमार्फत 562 असे एकुण 671 रीलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. यामध्ये एकुण 62 हजार 736 स्थलांतरीत मजूर असून एकुण 1 लाख 17 हजार 16 मजूरांना भोजन देण्यात येत आहे, अशीही माहिती डॉ.म्हैसेकर यांनी दिली आहे. कोरोना’ संसर्गानं हॉस्पिटल क्वारंटाईन्’ होण्यापेक्षा
स्वेच्छेनं होम क्वारंटाईन्’ व्हास्वत:लाकुटंबाला वाचवा

उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई,(टाईम न्युजलाईन नेटवर्क):- ‘कोरोनापासून बचावासाठी होम क्वारंटाईन्‌’ किंवा हॉस्पिटल क्वारंटाईन्‌’ हे दोनंच पर्याय आज उपलब्ध आहेत. कोरोना’ संसर्गानंहॉस्पिटल क्वारंटाईन्‌’ होण्यापेक्षा नागरिकांनी स्वेच्छेनंहोम क्वारंटाईन्‌’ व्हावंस्वत:चं आणि कुटुंबाचं संरक्षण करावंअसं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. जे आज घरात थांबणार नाहीत ते काही दिवसांनी हॉस्पिटलमध्ये दिसतीलअसा इशारा  त्यांनी दिला आहे.
कोरोनाबाबत काहींच्या बेजबाबदारपणामुळे रुग्णसंख्या वाढतेयभाजीबाजारातल्या गर्दीमुळेकोरोना’ तुमच्या घरात पोहचण्याचा धोका निर्माण झाला आहे. गावगुंडांकडून पोलिसांवर हल्ले होत आहेत. या समाजविघातक घटनांची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. कोरोनासंदर्भातील नियम मोडणाऱ्यांना तुरुंगाची हवा खावी लागेलत्याची सुरुवात काल झाली आहेअसेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
राज्य शासनाने आवाहन केल्यानंतर अनेक खाजगी डॉक्टरांनी त्यांचे दवाखानेहॉस्पिटल सुरु केले आहेतपरंतु ज्यांनी त्यांचे दवाखाने अजूनही सुरु केलेले नाहीत त्यांची नोंद राज्य शासनाने आणि स्थानिक नागरिकांनी घेतली आहे. या डॉक्टरांवर निश्चित कारवाई केली जाईलअसेही उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितले. 
राज्यात अन्नधान्याचाखाद्यतेलाचादुध,भाजीपाल्याचाऔषधांचाइंधनाचा मुबलक साठा आहे. या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कधीही बंद पडणार नाही. त्यामुळे खरेदीसाठी गर्दी करु नये. दिल्लीतील मरकज’ घटनेपासून धडा घेऊन यापुढे कुठलाही सामुदायिक मेळावा आयोजित करु नये,त्याला परवानगी दिली जाणार नाहीअसेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आज राज्यात रामनवमी भक्तीभावानंसाधेपणाने साजरी केल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी  जनतेचे आभार मानले आहेत. यापुढेही  सर्व सणउत्सव साधेपणानं साजरे व्हावेत,असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

पुणे (टाईम न्युजलाईन नेटवर्क):
           कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन परिस्थिती लागू करण्यात आली आहे. नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळण्यात काही अडचण येवू नये, यासाठी तसेच इतर सर्व तक्रारींसाठी नियंत्रण कक्ष सुरु असून  त्यासाठी  उपजिल्हाधिकारी सुनिल गाडे  यांची स्वतंत्र समन्वयक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील एकही व्यक्ती अन्न-धान्यापासून वंचित राहणार नाही, यासाठी  जिल्हा प्रशासन कटीबद्ध आहे. नागरिकांना काही अडचण असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.
                   ‘लॉकडाऊन’मुळे मावळ आणि मुळशी परिसरातील कुटुंबाला शासनाच्या धान्यवाटप योजनेचा मोठा आधार वाटत आहे. आमदार संग्राम थोपटे, उप विभागीय अधिकारी  संदेश शिर्के व मुळशीचे तहसिलदार अभय चव्हाण यांच्या उपस्थितीत बावधन ग्रामपंचायत पदाधिका-यांच्या सहकार्यातून येथील 200 कुटुंबांना पुढील पंधरा दिवसाचा
 शिधा व अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. वाटप करतांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे काटेकोर पालन करण्यात आले. वाटप करण्यात आलेले साहित्य साधारणपणे 15 दिवस इतके पुरेल. आवश्यकतेनुसार  वाटप सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.    प्रशासन नागरिकांच्या अडीअडचणीसंदर्भात संवेदनशील असल्याचे कृतीतून जाणवते आहे.

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget