जुन्नर (टाईम न्युजलाईन नेटवर्क):
पुण्यात द्राक्ष बागेतच द्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. जुन्नर तालुक्यातील या महोत्सवात थेट द्राक्ष बागेत बसूनच द्राक्षांचा आस्वाद नागरिक घेत आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि शेतकऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने सलग दुसऱ्या वर्षी याचं आयोजन करण्यात आलं. दोन दिवसीय महोत्सवात रसायन मुक्त द्राक्षांची लागवड, पॅकिंग आणि त्यापासून कशी वाईन बनवले जाते याचे प्रात्यक्षिक पाहता येणार आहे. परदेशात निर्यात होणाऱ्या या गोड चवीच्या रसाळ द्राक्षांचा आस्वाद आणि माहिती घेण्याला पसंती मिळू लागली.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.