पुणेलगतच्या वाघोली, मांजरी भागासाठी नवीन महानगरपालिका स्थापनेबाबत शासन सकारात्मक - उपमुख्यमंत्री अजित पवार


       मुंबई, दि. 11 : पुणे शहरालगत असलेल्या वाघोली, मांजरी बुद्रुकमांजरी खुर्द यांसह आणखी काही गावांचा समावेश करून नवीन महानगरपालिका स्थापन करण्याबाबत शासन सकारात्मक आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली.                                                                                         
           सदस्य अशोक पवार यांनी पुणे शहरालगतच्या वाघोली भागातील रस्ते वाहतूक,पाणीपुरवठा आदि समस्यांबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. पवार बोलत होते.
              पुणे शहरामध्ये काही गावे समाविष्ट करण्याची त्या त्या भागातील लोकप्रतिनिधींची आग्रही मागणी आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड सोडून बाकीचा इतर भाग पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत आला आहे .परंतु या कामाला गती देण्याची गरज आहे असेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
            पुणे महानगर क्षेत्रातील वाघोली गाव शहरालगत असल्याने वेगाने नागरीकरण होत आहे .वाढत्या नागरीकरणामुळे सध्याचा 2.5 एमएलडी क्षमतेचा पाणीपुरवठा अपुरा पडत असल्याने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत वाढीव  5 एमएलडी पाणी पुरवठा योजना हाती घेण्यात आली आहे .पुणे- शिरूर -अहमदनगर या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत चार पदरी रस्त्याचे सहापदरीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. वाघोलीतील घनकचरा व्यवस्थापनाकरीता प्राधिकरणाने वाघोली ग्रामपंचायतीला पंधरा कचरावाहू वाहने उपलब्ध करून दिली आहेत तसेच हवेली व मुळशी तालुक्यातील 8 गावांकरिता घनकचरा व्यवस्थापनासाठी पूर्वसुधारणेचा अहवाल तयार करून घेण्याची कार्यवाही प्राधिकरणाच्या स्तरावर सुरू आहे अशी माहिती नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.
            यावेळी सदस्य सर्वश्री अशोक पवार,बबनराव पाचपुतेभीमराव तापकीर व राहुल कुल यांनी चर्चेत भाग घेतला.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget