तेजस रामदास राजीवडे
आज जगात अनेक महिला नावाजलेल्या आहेत त्यातून महिलांना उच्च स्थान दिले जाते. पुरूष वर्ग हा जरी महत्वाचे असला तरी स्त्री हिला तितकेच महत्वाचे स्थान आहे.आज कोणत्याच क्षेत्रात महिला मागे नाही.महिलांनी उंच भरारी घेत नवनवीन क्षेत्रात यश प्राप्त केले आहे.ग्रामीण भागातील महिलांनी राष्ट्रपती पदकालाही गवसणी घातली.
आपण विचार केला तर राजकारणात, शेतकरी कुटुंबात, लेखिका स्त्री या महत्वाचे मानल्या जातात.
सिंधुताई सपकाळ या सारख्या स्त्रीचा सभांळ जरी नव्याने छळ केला तरी तिने आपला संसार अनाथ मुलांना आपले आयुष्य घातले. ज्या विद्यार्थ्यांना खाणे-पिणे,ज्यांचे आई-वडील नाहीत अशाच मुलांचा साभांळ करते आणि एवढेच नव्हे तर मंदिरा समोर भीक मागणारे अशा मुलांना एकत्रित करून साभांळ करते आणि त्यांची 'माय' होते. माईना सावित्रीबाई फुले विद्यापीठाने " जीवनसाधना गौरव पुरस्कार " ,2010 साली मी सिंधुताई सपकाळ हा चित्रपट आला त्यांना 'अनाथाची माई' म्हणून संबोधले जायचे.
राहीबाई सोनेरी ही स्त्री ग्रामीण भागातील महिला आहे. ही कोल्हापूर सारख्या खेड्यात लहानशी मोठी झाली. स्वतःच्या पायावर उभे राहून आपल्या घरात शेतकरी करून "सुधारित बी-बियाणे " बॅंक स्थापन केली या बॅकेत चाई, माठ, मठा, चदंनबटवा, भाताची पेज इत्यादी वस्तू बॅंकेत मिळत.गावातील महिलांना एकत्र करून बचत गटाची स्थापना केली.अशा राहीबाईना निसर्गाशी प्रचंड प्रेम असत.त्यांना निसर्गाने जगण्याची शाळा काढली एवढ्या मोठ्या शेतात नागली, वरई , भात, उडीद, भूईमूग इत्यादी पिके घेतली जात. त्यातून खत तयार केली जात.शेतीच्या माध्यमातून आपला ससांर उभा केला.कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन समिती स्थापन केली. 16 जातीचे वाण जमा केले.तसेच प्रचार प्रसाराचे कार्य सुरु केले राहीबाईना 'बायफ' या संस्थेची साथ मिळाली. भारत सरकारने महिला बालकल्याण विभाग पुरस्कार 2018 साली राष्ट्रपती कोविद यांच्या हस्ते झाला. 25 जानेवारी 2020 रोजी "पद्मश्री " पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.