' करोना ' हा विषाणू जीवघेणा नाही; परंतु, नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे - नगरसेवक सचिन चिखलेमनसे नगरसेवक सचिन चिखले यांनी प्रभागात मास्क व सॅनिटायझरचे केले वाटप...

पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क

) :-  पिंपरी चिंचवड शहरात करोना या संसर्गजन्य विषाणूने थैमान घातले आहे. त्यावर अद्याप कोणतीही लस विकसित झाली नाही. त्यामुळे शहरातील नागरिक चिंतातूर आहेत. या विषाणूपासून स्वतःचा बचाव कसा करावा या संभ्रमावस्थेत आहेत. मात्र, तज्ञांनी या विषाणूला घाबरण्याची आवश्यकता नसून, हातांची स्वच्छता व तोंडाला मास्क लावून या विषाणूपासून स्वतःचा बचाव करता येतो, असे सांगितले आहे. मात्र, शहरात मास्क व सॅनिटायझरचा तुटवडा आहे. त्यामुळे शहरातील बरेचसे नागरिक या सुविधांपासून वंचित आहेत. अशाने हा जंतूसंसर्ग आणखी पसरण्याचा धोका आहे. हा संभाव्य धोका ओळखून पिंपरी चिंचवड शहर मनसेचे शहराध्यक्ष व नगरसेवक तथा गटनेता सचिन चिखले यांनी पुढाकार घेऊन आज बुधवारी (दि. १८) रोजी शरातील प्रभाग क्रमांक १३, निगडी गावठाण परिसरात मोफत सॅनिटायझर व मास्कचे वाटप केले. तसेच करोना या विषाणूबाबत घ्यावयाच्या खबरदारीची माहितीही नागरिकांना यावेळी दिली.

यावेळी परिसरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब गायकवाड, हौसराव शिंदे, विजय साळवे, अमित भालेराव, शैलेश पाटील, रोहित काळभोर, अन्वर अंसारी, जय सकट, प्रदीप घोडके, महेश माने (अक्कलकोट), संतोष होटकर, रोहित चव्हाण, नियाज खान, जाकीर शेख, श्रावण गोयल, विनायक लिंबाळकर, प्रबुद्ध कांबळे, गणेश उज्जैनकर, नगरसेवक सचिनभाऊ चिखले मित्र मंडळ, निगडी गावठाण मित्र मंडळ, वॉर्डातील सर्व पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व समस्त निगडी गावठाणमधील नागरिक उपस्थित होते.

नगरसेवक सचिन चिखले उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, मागील काही दिवसांत पिंपरी चिंचवड शहरात करोनाचे रुग्ण आढळले असून शहरवासियांमध्ये काळजीचे वातावरण आहे. करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी महापालिका विविध पातळीवर प्रयत्न करीत आहे. वेगवेगळ्या स्तरावर शहरात जनजागृतीचे काम सुरु आहे. नागरिकांनी या आजाराची भीती बाळगू नये. आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच महापालिकेने वारंवार केलेल्या सूचनांनुसार स्वच्छता राखणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे तसेच हस्तांदोलन टाळणे अशा प्राथमिक गोष्टी नागरिकांनी कराव्यात. आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि देशांतर्गत करोना या विषाणूचे संसर्ग बाधीत रुग्ण आढळत आहेत. ज्या नागरिकांना होम क्वॉरंटाईन सांगितले आहे, त्यांनी स्वत:हूनच घरी राहून स्वत:बरोबरच इतरांचीही काळजी घ्यावी

कोरोना व्हायरस हा हवेद्वारे, शिंकण्यातून, खोकल्यातून जे थेंब बाहेर पडतात त्यातून पसरतो. त्यामुळे आपले हात बाहेरून आल्यावर सातत्याने धुणे, शिंकताना, खोकताना नाका तोंडावर रूमाल धरणे, आपल्या बोटांनी डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श न करणे, अर्धवट शिजलेले कच्च मांस खाणे टाळावे, प्राण्यांपासून दूर राहणे, श्वसनसंस्थेचे विकार असणाऱ्या व्यक्तीपासून दूर राहणे टाळणे आवश्यक आहे, असेही चिखले म्हणाले.

तसेच उद्या गुरुवारी (दि. १९) रोजी सायंकाळी ५.०० वा. निगडीतील सेक्टर २२, सरकारी दवाखाना, आझाद चौक येथेही मोफत मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात येणार असल्याची माहिती चिखले यांनी यावेळी दिली.
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget