:दोघांना रुग्णालयात केले दाखल
: गवताच्या गंजीला लागली होती आग
जुन्नर(टाईम न्युजलाईन नेटवर्क):ओतूर (ता. जुन्नर) येथील अमिरघाट परिसरात गवताच्या गंजीला लागलेल्या आगीत खेळणारी चार मुले होरपळली. आगीत दोघाबहीण भावाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. जखमी बालकांना पुढील उपचारासाठी औंध येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली.
शिवा कैलास ठाकूर (वय २) आणि भाग्यश्री कैलास ठाकूर (वय ४) या दोघांचा मृ्त्यू झाला, असे ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एम. सरोकते यांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवा आणि भाग्यश्रीचे वडील कैलास ठाकूर ओतूरच्या गाडगे महाराज मिशन संस्थेत शेती; तसेच जनावरांच्या गोठ्याची निगा पाहण्याचे काम करतात. बुधवारी रात्री गवताच्या गंजीला लागलेल्या आगीत कैलास यांचे दोन भाचे नम्रता शुभम दमई (वय ४) आणि ग्यानेंद्र शुभम दमई (वय ८) हे जखमी झाले. दुर्घटनेची माहिती कळताच ओतूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. या घटनेची ओतूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.