March 2020पुणे, (टाईम न्युजलाईन नेटवर्क): कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात बाहेर पडलेल्या कामगारांसह बेघर नागरिकांसाठी विभागात 214 निवारागृहे (शेल्टर होम) सुरु करण्यात आली आहेत. या निवारागृहात 64 हजार 926 नागरिकांची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
लॉकडाऊनच्या कालावधीत बेघर झालेले नागरिक, विस्थापित तसेच परराज्यातील अडकलेले कामगार यांच्यासाठी निवारागृह, अन्नधान्य, व भोजनाची व्यवस्था करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या  आहेत. प्रशासन व स्वयंसेवी  संस्थांच्या वतीने अडकलेल्या व बेघर नागरिकांसाठी निवारागृहे सुरू करण्यात आली आहेत.
पुणे विभागातील पुणे जिल्ह्यात 42 निवारागृहे ( 12 हजार 460 नागरिक),  सातारा जिल्ह्यात 143 निवारागृहे (4 हजार 688 नागरिक), सांगली जिल्ह्यात 16 निवारागृहे (1 हजार 306 नागरिक), सोलापूर जिल्ह्यात 2 निवारागृहे,(62 नागरिक) कोल्हापूर जिल्ह्यात 11 निवारागृहे ( 46 हजार 410 नागरिक) एकूण 64 हजार 926 विस्थापित कामगार व बेघरांची व्यवस्था  पुणे विभागात करण्यात आली आहे.
बेघर तसेच विस्थापित कामगारांसाठी निवारागृहात अन्नधान्य, भोजन, पाणी, वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती डॉ.म्हैसेकर यांनी दिली.
 जमावबंदी व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कामगार व नागरिकांनी  आहे त्याच ठिकाणी थांबून जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या निवारागृहात रहावे, आपल्या गावी अथवा परराज्यात जाण्यासाठी प्रवास करू नये, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी केले आहे.
****
·         शहरांसोबतच तालुकास्तरापर्यंत योजनेचा विस्तार
·         सकाळी ११ ते ३ या वेळेत १ लाख शिवभोजन थाळीचे होणार वितरण
·         सवलतीचा पाच रुपये दर जूनपर्यंत लागू राहणार
            मुंबई,(टाईम न्युजलाईन नेटवर्क): कोरोना विषाणूच्याआपत्तीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्यातील गोरगरीबकामगार, शेतकरीमजूर व विद्यार्थी वर्गाच्या जेवनाची सोय व्हावी यासाठी शिवभोजन थाळी प्रकल्पाचा तालुकास्तरावर विस्तार करण्यात येत आहे.दररोज सकाळी ११ ते ३ या वेळेत १ लाख शिवभोजन थाळीचे वितरण करण्याच्या निर्णयामुळे गरजनागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
            या महत्त्वपूर्ण निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात देण्यात आलेल्या शिवभोजन थाळीच्या संख्येत पाचपट वाढ करण्यात आली आहे. शहरी भागासाठी प्रती थाळी ४५ रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रती थाळी ३० रुपये शासन देणार आहे. यासाठी शासनाने १६० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. नागरिकांच्या हाताला काम नसल्याने कुणाचीही उपासमार होऊ नये या उद्देशाने हा सवलतीचा पाच रुपये दर जूनपर्यंत लागू राहणार आहे.
            कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारमार्फत १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे कष्टकरी, असंघटित कामगार, स्थलांतरित, बाहेरगावचे विद्यार्थी,रस्त्यावरील गरीब, बेघर इत्यादी नागरिकांच्या हाल-अपेष्टा होत असल्याने शिवभोजन थाळी योजनेचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला.तालुकास्तरावर शिवभोजन केंद्र सुरू करण्यासाठी १ एप्रिलपर्यंत न थांबता जिल्हाधिकारी आणि नियंत्रक शिधावाटप यांनी आपल्या जिल्ह्यात तातडीने नव्याने शिव भोजनालय सुरू करावीत असे आदेश देण्यात आले आहे.
या निर्णयानुसार कोरोना विषाणूच्याप्रादुर्भावामुळे जे लोक स्वतःच्या जेवणाची सोय करू शकत नाहीत, त्यांना शिवभोजनाचा लाभ घेता येण्यासाठी व्यापक प्रसिद्धी करण्यात येणार आहे.यासाठी जिल्ह्यातील प्रशासकीय आणि पोलिस यंत्रणेची मदत घेण्यात येणार आहे.
            ग्राहकांना हात धुण्यासाठी साबण उपलब्ध करून देणे, भोजनालय दररोज निर्जंतूक करणे,ग्राहकांना शक्यतो पॅकिंग स्वरूपात जेवण देणे, जेवण तयार करण्याआधी हात कमीत कमी वीस सेकंद साबणाने स्वच्छ करणेशिवभोजनाची सर्व भांडी निर्जंतूक करून घेणे, भोजन तयार करणाऱ्या तसेच वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुणेभोजनालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करणे, प्रत्येक ग्राहकांमध्ये कमीतकमी तीन फूट अंतर राहील याची दक्षता घेण्याच्या सूचना भोजनालय चालकांना देण्यात आल्या आहे.

*परराज्यातील अडकलेल्या नागरिकांची काळजी घेणार*
*- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे*

मुंबई (टाईम न्युजलाईन नेटवर्क): खासगी डॉक्टर्सनी  आपापले दवाखाने बंद ठेवून नियमित रुग्णांची गैरसोय करू नये असे आवाहन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या वाहनांतून प्रवासी प्रवास करताना आढळल्यास कारवाई  केली जाईल. राज्यांच्या सीमा बंद असून आता इतर राज्यांतील अडकलेल्या नागरिकांची राज्य शासन काळजी घेईल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

आज सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी वर्षा येथून व्हिडीओ  कॉन्फरन्सद्वारे ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील महत्वपूर्ण सूचना केल्या. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब, मुख्य सचिव अजोय मेहता , पोलीस महासंचालक  सुबोध कुमार जायस्वाल, पोलीस आयुक्त परम बीर सिंह , मनपा आयुक्त प्रवीण परदेशी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले कि, खासगी डॉक्टर्सनी त्यांचे दवाखाने सुरु ठेवणे गरजेचे आहे. कोरोनाव्यतिरिक्त देखील त्यांच्याकडे इतर रोगांच्या उपचारासाठी रुग्ण येतात. त्यात वयोवृद्ध, महिला, मुले असतात त्यांची गैरसोय होऊ नये. लवकरच आपण अत्यावश्यक सेवेतील सर्वाना ओळखपत्र देत आहोत त्यात डॉक्टर, त्यांच्याकडील कर्मचारी सर्वांचा समावेश असेल.

आपल्या जिल्ह्यात परदेशांतून गेल्या १५ दिवसांत जर कुणी प्रवास करून आले असेल तर जिल्हाधिकारी यांनी त्यांची माहिती घ्यावी व सदरील व्यक्तींची तपासणी करून घेणे महत्वाचे आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले कि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्यवस्थित राहील , औषधी लोकांना मिळतील हे पाहावे. शेतकरी आणि विशेषतः: शेतीच्या कामासाठी जा ये करणारे याना अडथळा होणार नाही हे पाहावे.

कोणत्याही परिस्थितीत इतर राज्यांतून आपल्या राज्यात येऊन थांबलेल्या नागरिकांची इथेच आम्ही काळजी घेऊ , त्यांना लॉक डाऊन पूर्ण होईस्तोवर परत पाठवणे शक्य होणार नाही. महाराष्ट्रातले लोक जर इतर राज्यांत कुठे अडकले असतील तर त्यांचीही त्या त्या राज्यांनी काळजी घ्यावी अशा सूचना दिल्या आहेत.

जीवनावश्यक वस्तूंसाठी उपयोगात आणली जाणारी वाहतूक पोलीस अडवणार नाहीत पण कोणत्याही परिस्थितीत अशा वाहनांमधून या कामाशी संबंधित नसलेले लोक प्रवास करताना आढळले तर कारवाई केली जाईल.

प्रत्येक जिल्ह्यात किती रुग्ण क्वारंटाईन करू शकतो तसेच कोरोना साठी किती वॉर्ड किंवा रुग्णालय राखून ठेवू शकतो त्याचे व्यवस्थित नियोजन करून तात्काळ कळवावे.

कोरोना विरुद्धच्या या लढाईत आपण अतिशय नियोजनपूर्व पद्धतीने जात आहोत. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक कामाची योग्य विभागणी करावी, अधिकाऱ्यांना जबाबदारी वाटून द्यावी व मुख्यालयाच्या संपर्कात राहावे असेही मुख्यमंत्री म्हणाले

पोलिसांवर मोठी जबाबदारी आहे, त्यांनी डोके शांत ठेवावे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी राज्यात किराणा, भाजीपाला घेण्यासाठी काही ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून नागरिकांमध्ये योग्य अंतर ठेवण्याच्या कल्पनांचे मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले.


पुणे,(टाईम न्युजलाईन नेटवर्क)
: यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील कोरोना उपाययोजनांसंदर्भात तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाची तसेच पॉझिटीव्ह रुग्णांकरीता तयार करण्यात आलेल्या विशेष कक्षाची विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा घेतला.
यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर माई ढोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर, पक्षनेते नामदेव ढाके, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, अतिरिक्त वैदयकीय अधीक्षक डॉ. पवन साळवे, सहयोगी प्राध्यापक डॉ. किशोर खिलारे, डॉ. प्रवीण सोनी तसेच कार्यकारी अभियंता प्रदीप पुजारी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 
विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी रुग्णालयातील उपलब्ध साधन सामुग्रीचा आढावा घेतला तसेच वैदयकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या अडचणीसंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. तसेच रुग्णालयातील तयारीबाबत समाधान व्यक्त केले.
सुरक्षितता बाळगून आंबा, द्राक्षे, संत्री, केळी, कलिंगड फळविक्रीही मान्य
--  उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई,(टाईम न्युजलाईन नेटवर्क) :-  जनतेच्या सोयीसाठी राज्यातील हॉटेलांना त्यांचे किचन सुरु ठेवून खाद्यपदार्थ घरपोच किंवा सोसायट्यांपर्यंत पोहचवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र खाद्यपदार्थ बनविणाऱ्या व पोहचवणाऱ्या व्यक्तींनी स्वच्छता आणि ‘कोरोना’ सुरक्षिततेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे, अशी माहिती  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.   
राज्यात अंडी, कोंबडी, मटण, गोड्या व खाऱ्या पाण्यातील मासळीची विक्री खुली असून त्यावर कोणतेही बंधन नाही. त्यामुळे नागरिकांना हे पदार्थ खरेदी करता येतील. कोकणातील आंबे, नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, केळी, कलिंगड अशी सर्वप्रकारची फळे बाजारात विकता येणार आहेत. मात्र, विक्री आणि खरेदी करणाऱ्या दोघांनीही, ‘कोरोना’संदर्भात आवश्यक स्वच्छता, सुरक्षितता बाळगायची आहे, गर्दी व त्यामुळे होणारा संसर्ग टाळून खरेदी करायची आहे, अशी माहिती  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.   
राज्यातील शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी थांबलेली नाही. शेतकरी बायमेट्रीकसाठी तयार नाहीत आणि शासकीय यंत्रणा कोरोना प्रतिबंधासाठी व्यस्त  असल्याने यात काहीसा संथपणा आल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. दूध, भाजीपाला, फळांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना इंधनाचा पुरवठा करण्यात कोणताही अडथळा नाही. साखर कारखान्यात गाळपासाठी ऊस आणण्यास परवानगी आहे. मात्र उसतोड मजूरांच्या जेवणाची काळजी संबंधीत कारखान्यांना घ्यावी लागणार आहे. राज्य सरकाने लष्कराच्या मदतीसाठी लिहिलेले पत्र हे केवळ लष्कराची वैद्यकीय मदत मिळण्यापुरते मर्यादित असल्याचा खुलासाही उपमुख्यमंत्री महोदयांनी केला आहे.


मुंबई,(टाईम न्युजलाईन नेटवर्क) : राज्यात काही ठिकाणी भाडेतत्वावरील घरात राहणाऱ्या डॉक्टरनर्सींग कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचारी यांना करोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर संबंधित घरमालक किंवा हाऊसिंग सोसायट्या घर सोडून जाण्यास सांगत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मानवतेच्या दृष्टीने तर हे अत्यंत चुकीचे आहेच, परंतु नियमबाह्यही आहे. घरमालकांनी आणि सोसायट्यांनी आरोग्य यंत्रणेचे महत्व लक्षात घेऊन सहकार्य करावे. अन्यथा साथरोग नियंत्रण कायद्यानुसार संबंधित घरमालक किंवा हाऊसिंग सोसायटीवर कारवाई करण्यात येईल,असे शासनाने प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. 
सध्या करोना विषाणु साथीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील डॉक्टरनर्सींग कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचारी अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहेत. हे करताना त्यांना विषाणुची बाधा होऊ नये यासाठी आवश्यक ती सर्व काळजी त्यांच्यामार्फत तसेच प्रशासनामार्फत घेतली जात आहे. त्यामुळे त्यांच्याकडून इतरांना संसर्गाचा कोणताही धोका नाही. असे असतानाही काही घरमालकहाऊसिंग सोसायट्या त्यांच्याकडे भाड्याने राहणारे डॉक्टर,नर्सींग कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचारी यांना घर सोडून जाण्यास सांगत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. हे पूर्णतः चुकीचे असून संबंधीत घरमालकहाऊसिंग सोसायट्या यांनी असे करु नये,असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. एखादे घरमालक किंवा हाऊसिंग सोसायटी असे करत असल्याचे निदर्शनास आल्यास साथरोग नियंत्रण कायद्यानुसार त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईलअसे प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.
भाड्याच्या घरात राहणारे डॉक्टरनर्सींग कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचारी यांना असा अनुभव आल्यास त्यांनी आपल्या क्षेत्रातील पोलीस ठाण्याशी संपर्क साधावाअसे आवाहन करण्यात आले आहे. 


मुंबई,(टाईम न्युजलाईन नेटवर्क) : राज्यात करोनाचे रुग्ण बरे होत आहेत. आतापर्यंत १५ करोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेअशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. दरम्यानराज्यात करोनाबाधीत रुग्णांची संख्या १२४ झाली आहे. मुंबईत १ आणि ठाणे येथे १ रुग्ण आढळून आला आहे.
डिस्चार्ज देण्यात आलेल्या १५ रुग्णांचे नमुने आधी पॉझीटीव्ह आले होते. त्यानंतर विलगीकरण कक्षात ठेवून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आता १४ दिवसानंतरचे त्यांचे दोन्ही नमुने निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यांना अजुन पुढील १४ दिवस घरीच थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे.  
काल पुण्यात दोघा करोनाबधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तत्पूर्वी मुंबई आणि औरंगाबाद येथील रुग्णाला घरी सोडण्यात आले आहे.

:केंद्र सरकारच्या  पहिल्या ‘कोरोना पॅकेज’चं स्वागत;
:संकटाचं वळण लक्षात घेऊन वेळोवेळी नवे ‘पॅकेज’ हवे
-  उपमुख्यमंत्री अजित पवार

          मुंबई, (ताई :- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 लाख 70 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केल्याच्या निर्णयाचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केलं आहे. महाराष्ट्र व देशासमारचं ‘कोरोना’चं भीषण संकट लक्षात घेता केंद्र सरकारकडून अशा ‘पॅकेज’ची गरज होती. या ‘पॅकेज’चे लाभ गरजूंपर्यंत पोहचवण्यासाठी राज्य शासन सर्व शक्तीनिशी प्रयत्न करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
‘कोरोना’च्या संकटाची भीषणता पाहता केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेलं 1 कोटी 70 लाखांचं पॅकेज हे सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यासाठी आहे, असं मी मानतो. यापुढच्या काळात संकट कसं वळण घेतं याचा नियमित आढावा घेऊन वेळोवेळी नवे पॅकज जाहीर होण्याची गरज आहे, अशी मागणीही  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. प्रधानमंत्री अन्न कल्याण योजना आणि डीबीटी अशा दोन माध्यमांद्वारे ही जनतेला ही मिळणार आहे. कोरोनाचं संकट हे तीन महिन्यांसाठी चालेल हे गृहित धरुन हे पॅकेज तयार केलं असलं तरी त्याचं वितरण तात्काळ होणं अपेक्षित आहे. राज्यात व देशात इमर्जन्सी आरोग्यसुविधा उभारण्यासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध झाला पाहिजे, अशी मागणीही अजित पवार यांनी केली आहे.


:जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे आवाहन*
   :अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना इंधन पुरवण्यात यावे
   :लॉकडावूनचे गांभीर्य ओळखून घराबाहेर पडू नका
   :पीक काढणीची कामे शेतकऱ्यांनी योग्य ती दक्षता घेऊन सुरु ठेवावीत
  : अत्यावश्यक साधनसामुग्रीची ने-आण करणाऱ्या वाहनांवर स्टिकर आवश्यक

पुणे(टाईम न्युजलाईन नेटवर्क): पुणे जिल्ह्यात बहुतांशी नागरिक लॉकडावूनला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत असून अत्यावश्यक सुविधा देणारी यंत्रणा सुरु आहे.  याकाळात औषध दुकाने, किराणामाल व भाजीपाल्याची दुकाने सुरु राहणार आहेत, तथापि या वस्तूंची खरेदी करताना नागरिकांनी एक मीटर चे अंतर (सोशल डिस्टन्सिंग ठेवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.

  कोरोनाच्या प्रतिबंधासाठी प्रशासन रात्रंदिवस कार्यरत असून या सेवेतील कर्मचाऱ्यांना पेट्रोल पंप चालकांनी इंधन पुरवठा करावा. तसेच शासकीय व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र दाखवल्यास रस्त्यात अडवू नये, अशा सूचना श्री. राम यांनी केल्या आहेत.
 शेतकऱ्यांनी पीक काढणीची कामे सामाजिक शिष्टाचार पाळून व योग्य ती दक्षता घेऊन सुरु ठेवावीत. अत्यावश्यक साधनसामुग्रीची ने-आण करणाऱ्या वाहतुकदारांनी वाहनांवर स्टिकर लावावेत.
   सद्यपरिस्थितीतही 5 ते 10 टक्के नागरिक कोणतेही कारण सांगून घराबाहेर रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी स्वतः साठी, कुटुंबासाठी आणि समाजासाठी घरी थांबावे, व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्री. राम यांनी केले.
00000


: जिल्ह्याच्या सीमा बंद
: जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य तसंच इतर आवश्यक सेवा सुरु
मुंबई (टाईम न्युजलाईन नेटवर्क)
महाराष्ट्र करोनच्या धोकादायक उंबरठ्यावर आहे. बिकट परिस्थिती आणायची नसेल तर सरकारचे निर्देश काटेकोरपणे ऐका असं आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. पुढचे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. ती भीती लक्षात घेऊच आपण संचारबंदी लागू करत आहोत असंही उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य तसंच इतर आवश्यक सेवा सुरु राहतील. मात्र ते वगळून पूर्ण संचारबंदी असेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

 जिल्ह्यांच्या सीमाही आजपासून बंद करण्यात आल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. हा निर्णय नाईलाजास्तव घ्यावा लागतो आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज्यातली सगळी प्रार्थनास्थळंही बंद करण्यात आली आहेत. फक्त पुजाऱ्यांनाच प्रवेश दिला जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. आत्ता जी परिस्थिती आहे ती नियंत्रणात आणली नाही तर जगभरात जसं करोनाचं थैमान माजलं आहे तसंच ते महाराष्ट्रातही माजेल. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागतो आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. रविवारी ज्याप्रमाणे सगळ्यांनी जनता कर्फ्यू पाळला त्याबद्दल मी राज्याच्या जनतेला धन्यवाद देतो असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.


पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):किवळे येथील कोतवालनगरमध्ये महिला तळीव साहित्य बनविण्यास सुरुवात केली आहे.असून विविध पध्दतीचे तळीव साहित्य तयार केले.
शिमगा महिन्याच्या उत्तरार्धात महिला दरवर्षी घरांमध्ये सणासुदीला लागणारे साहित्य या महिण्यात बनवून ठेवत असतात किवळे येथील महिला सुवर्णा जरे यांनी अंजना जगताप,वच्छल्या घोलप,शुभांगी जगताप, मैना जगताप,या महिलांना सोबत घेत साहित्य बनवून तयार केले आहे.खरावड्या, पापड,कुरडई, बटाट्याचे वेपर्स,असे पदार्थ तयार केले आहेत.


: तमाशावर अवलंबून असलेल्या कलावंतांनी पोट कसे भरायचे हा प्रश्न
: सरकारने विशेष अनुदान पॅकेज जाहीर करावे

 :राज्यात सुमारे २५० तमाशाचे फड

नारायणराव (टाईम न्युजलाईन नेटवर्क):
गेल्या दोन वर्षांपासून तमाशा आणि लोकनाट्य सादर करणारी मंडळे अडचणीत येत असून करोनामुळे यात्रा, जत्रा रद्द झाल्याने होळी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंत आर्थिक घडी बळकट करण्याची आशाही आता कमी झाली आहे. त्यामुळे तमाशावर अवलंबून असलेल्या कलावंतांनी पोट कसे भरायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने विशेष अनुदान पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. यासंदर्भात खासदार अमोल कोल्हे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनाही पत्र लिहिले आहे.
दसऱ्यापासून तमाशाच्या मोसमाला सुरुवात होते. मात्र यंदा आचारसंहितेमुळे यात अडचण निर्माण झाली. तमाशा कलावंतांना होळीपासून बुद्ध पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या जत्रा आणि यात्रांकडूनही अपेक्षा होती. होळीनंतर या कार्यक्रमांना सुरुवात झाली होती, मात्र करोनामुळे अडचण निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी ओला दुष्काळ आणि सन २०१८ मध्ये कोरडा दुष्काळ, नोटबंदी यामुळे तमाशा कलावंतांवर विपरित परिणाम झाल्याचे महाराष्ट्र तमाशा परिषदेचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांनी सांगितले.
 त्यामुळे कलावंतांना आर्थिक पाठबळाची गरज आहे. प्रत्येक फडामध्ये १०० ते १५० कलावंत असतात. एका फडावर अनेकांचे जगणे अवलंबून असते. यासाठी उपाययोजना मिळाली नाही तर या कलावंतांवर शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्येची पाळी येईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. १५ मार्च ते ३१ मार्च या कालावधीमध्ये तंबुतील फडांमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाचा अंदाज घेतला तर प्रत्येकाचे ३० ते ३५ लाखांचे नुकसान झाले आहे.
अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेचे पदाधिकारी आणि तमाशा कलावंत मोहीत नारायणगावकर यांनीही करोनामुळे मोठे नुकसान होत असल्याची खंत व्यक्त केली. या मोसमाकडून अपेक्षा होत्या. राज्यात सुमारे २५० फड असून राज्यभरातील जत्रांमधून पुढच्या वर्षाची बेगमी करता येते. मात्र आता कलावंतांनी पैसे मागितले तर कुठून द्यायचे असा प्रश्न निर्माण झाल्याचे ते म्हणाले.
सरकारने या कलेला तगवण्यासाठी पावले उचलावीत, असे आवाहन शांताबाई जाधव संक्रापूरकर लोकनाट्य तमाशा मंडळाच्या शांताबाई जाधव यांनी केले. त्या गेली सुमारे ४२ वर्षे तमाशाची कला सादर करत आहेत. मात्र गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये सातत्याने संकटांना तोंड द्यावे लागल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. करोनाचे संकट लवकर संपेल आणि तमाशा उत्सव कार्यक्रमांवरील तसेच इतरही बंदी लवकर उठेल, अशी आशाही त्यांना आहे. मात्र सध्या झालेल्या नुकसानीची दखल सरकारने घ्यावी, अशी प्रातिनिधिक मागणी त्यांनी केली.


:दोघांना रुग्णालयात केले दाखल
: गवताच्या गंजीला लागली होती आग


जुन्नर(टाईम न्युजलाईन नेटवर्क):ओतूर (ता. जुन्नर) येथील अमिरघाट परिसरात गवताच्या गंजीला लागलेल्या आगीत खेळणारी चार मुले होरपळली. आगीत दोघाबहीण भावाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. जखमी बालकांना पुढील उपचारासाठी औंध येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.  ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास  घडली.
शिवा कैलास ठाकूर (वय २) आणि भाग्यश्री कैलास ठाकूर (वय ४) या दोघांचा मृ्त्यू झाला, असे ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एम. सरोकते यांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवा आणि भाग्यश्रीचे वडील कैलास ठाकूर ओतूरच्या गाडगे महाराज मिशन संस्थेत शेती; तसेच जनावरांच्या गोठ्याची निगा पाहण्याचे काम करतात. बुधवारी रात्री गवताच्या गंजीला लागलेल्या आगीत  कैलास यांचे दोन भाचे नम्रता शुभम दमई (वय ४) आणि ग्यानेंद्र शुभम दमई (वय ८) हे जखमी झाले. दुर्घटनेची माहिती कळताच ओतूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. या घटनेची ओतूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.


:कनिष्ठ अभियंता महिलेस अश्लील शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप 
:अजित पवार आता काय  भूमिका घेणार

पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क)
: पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जावेद शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेतील कनिष्ठ अभियंता महिलेस अश्लील शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आपल्या प्रभागातील कामाचं श्रेय इतर नगरसेवकांनी घेतल्याचं हे प्रकरण आहे. 16 मार्च रोजी ही घटना घडली असून 18 मार्च रोजी गुन्ह्याची नोंद झाली आहे.

जावेद शेख यांनी संबंधित 25 वर्षीय महिलेस स्वतःच्या कार्यालयात फोन करुन बोलावून घेतले आणि प्रभागातील विकास कामांवरुन अश्लील शिवीगाळ सुरु केली. "कामाचा पाठपुरावा मी करायचा आणि श्रेय दुसरे नगरसेवक कसे काय घेऊन जातात. मी आजवर 40 ते 50 गुन्हे केले आहेत. तू माझं काहीही करु शकत नाहीस. मी साईटवर आल्याशिवाय एक वीटही हलली तरी मी तुमच्याकडे बघून घेईन," अशी धमकी शेखने दिल्याचा महिलेने आरोप केला आहे. यानंतर महिलेच्या तक्रारीनुसार विनयभंग आणि धमकीचा गुन्हा निगडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे.
जावेद शेख यांनी याआधी पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता सुशील लवटे यांच्या चेहऱ्याला काळे फासून व्हिडीओ क्‍लिप सोशल मीडियावर व्हायरल केली होती. शेख यांच्याकडून अशा घटना सातत्याने घडत असल्यामुळे प्रशासनाने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सातत्याने केली जात होती.

इतर गुन्हेगारांना अटक करणारे पिंपरी चिंचवड पोलीस आता राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवक अटक करणार का? सत्ता येताच कायदा हातात घेऊ नका, सत्तेचा गैरवापर करुन कायदा हातात घेणाऱ्यांची गय करणार नाही, असे म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाला पक्षाच्याच नगरसेवकाने हरताळ फासला आहे. त्यामुळे अजित पवार आता काय काय भूमिका घेणार? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.मनसे नगरसेवक सचिन चिखले यांनी प्रभागात मास्क व सॅनिटायझरचे केले वाटप...

पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क

) :-  पिंपरी चिंचवड शहरात करोना या संसर्गजन्य विषाणूने थैमान घातले आहे. त्यावर अद्याप कोणतीही लस विकसित झाली नाही. त्यामुळे शहरातील नागरिक चिंतातूर आहेत. या विषाणूपासून स्वतःचा बचाव कसा करावा या संभ्रमावस्थेत आहेत. मात्र, तज्ञांनी या विषाणूला घाबरण्याची आवश्यकता नसून, हातांची स्वच्छता व तोंडाला मास्क लावून या विषाणूपासून स्वतःचा बचाव करता येतो, असे सांगितले आहे. मात्र, शहरात मास्क व सॅनिटायझरचा तुटवडा आहे. त्यामुळे शहरातील बरेचसे नागरिक या सुविधांपासून वंचित आहेत. अशाने हा जंतूसंसर्ग आणखी पसरण्याचा धोका आहे. हा संभाव्य धोका ओळखून पिंपरी चिंचवड शहर मनसेचे शहराध्यक्ष व नगरसेवक तथा गटनेता सचिन चिखले यांनी पुढाकार घेऊन आज बुधवारी (दि. १८) रोजी शरातील प्रभाग क्रमांक १३, निगडी गावठाण परिसरात मोफत सॅनिटायझर व मास्कचे वाटप केले. तसेच करोना या विषाणूबाबत घ्यावयाच्या खबरदारीची माहितीही नागरिकांना यावेळी दिली.

यावेळी परिसरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब गायकवाड, हौसराव शिंदे, विजय साळवे, अमित भालेराव, शैलेश पाटील, रोहित काळभोर, अन्वर अंसारी, जय सकट, प्रदीप घोडके, महेश माने (अक्कलकोट), संतोष होटकर, रोहित चव्हाण, नियाज खान, जाकीर शेख, श्रावण गोयल, विनायक लिंबाळकर, प्रबुद्ध कांबळे, गणेश उज्जैनकर, नगरसेवक सचिनभाऊ चिखले मित्र मंडळ, निगडी गावठाण मित्र मंडळ, वॉर्डातील सर्व पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व समस्त निगडी गावठाणमधील नागरिक उपस्थित होते.

नगरसेवक सचिन चिखले उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, मागील काही दिवसांत पिंपरी चिंचवड शहरात करोनाचे रुग्ण आढळले असून शहरवासियांमध्ये काळजीचे वातावरण आहे. करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी महापालिका विविध पातळीवर प्रयत्न करीत आहे. वेगवेगळ्या स्तरावर शहरात जनजागृतीचे काम सुरु आहे. नागरिकांनी या आजाराची भीती बाळगू नये. आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच महापालिकेने वारंवार केलेल्या सूचनांनुसार स्वच्छता राखणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे तसेच हस्तांदोलन टाळणे अशा प्राथमिक गोष्टी नागरिकांनी कराव्यात. आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि देशांतर्गत करोना या विषाणूचे संसर्ग बाधीत रुग्ण आढळत आहेत. ज्या नागरिकांना होम क्वॉरंटाईन सांगितले आहे, त्यांनी स्वत:हूनच घरी राहून स्वत:बरोबरच इतरांचीही काळजी घ्यावी

कोरोना व्हायरस हा हवेद्वारे, शिंकण्यातून, खोकल्यातून जे थेंब बाहेर पडतात त्यातून पसरतो. त्यामुळे आपले हात बाहेरून आल्यावर सातत्याने धुणे, शिंकताना, खोकताना नाका तोंडावर रूमाल धरणे, आपल्या बोटांनी डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श न करणे, अर्धवट शिजलेले कच्च मांस खाणे टाळावे, प्राण्यांपासून दूर राहणे, श्वसनसंस्थेचे विकार असणाऱ्या व्यक्तीपासून दूर राहणे टाळणे आवश्यक आहे, असेही चिखले म्हणाले.

तसेच उद्या गुरुवारी (दि. १९) रोजी सायंकाळी ५.०० वा. निगडीतील सेक्टर २२, सरकारी दवाखाना, आझाद चौक येथेही मोफत मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात येणार असल्याची माहिती चिखले यांनी यावेळी दिली.


मुंबई में दि. 30 मार्च से 4 अप्रैल के दौरान होगी
मुंबई,(टाईम न्युजलाईन नेटवर्क) : कोरोना’ के मद्देनजर कोरेगाव- भीमा जांच आयोग ने सुनवाई का कामकाज आगे बढ़ाया है। मार्च महीने के अंतिम सप्ताह में होनेवाली सुनवाई अब पुणे के अलावा मुंबई स्थित  कार्यालय में दि. 30 मार्च से 4 अप्रैल,2020 इस अवधि में होगा।  सुनवाई की सुधारित समयसूची आयोग के पुणे एवं मुंबई स्थित कार्यालय में लगाई गई है। अत्यावश्यक वजह के अलावा आयोग में  कार्यालय में न आने का आवाहन भी आयोग सचिव की ओर से किया गया है।▪ राज्यात ७०० व्हेंटिलेटर, ६०० आयसोलेशन बेडस तयार
▪ केंद्र शासनाकडून १० लाख तपासणी किट्स मिळणार

पुणे, (टाईम न्युजलाईन नेटवर्क): राज्यात नव्याने आठ  ठिकाणी स्राव नमुने तपासणीसाठी लॅब सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून तात्काळ तीन ठिकाणी लॅब सुरु होणार आहेत. मुंबई येथील केईएम व कस्तुरबा रुग्णालयात नव्याने आणखी एक लॅब, पुण्यात बी.जे मेडीकल कॉलेज या ठिकाणी नवी टेस्टिंग लॅब उद्यापासून सुरु होणार आहे. तर हाफकिनला आणखी दोन लॅब पुढील चार दिवसांत सुरु होतील. धुळे, औरंगाबाद आणि सोलापूरमध्येही लॅब सुरु करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या नव्या लॅबसाठी एनआयव्हीकडून उपकरण मिळणार आहेत. केंद्र शासनाकडून १० लाख तपासणी किट्स मिळणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.
          कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे पुण्यात आले होते, त्यांनी राष्ट्रीय विषाणू संस्थेला भेट दिली.त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार सुनील टिंगरे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे महानगरपालिका अतीरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील ,आरोग्य विभागाचे माजी महासंचालक डाॕ.सुभाष साळुंके आदी उपस्थित होते.
         आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, राज्यात ७०० व्हेंटिलेटर, ६०० आयसोलेशन बेडस तयार आहेत. खासगी रुग्णालयांना आयसोलेशन बेड ठेवण बंधनकारक करण्यात आले आहे. पुण्यातील नायडू रुग्णालयात १०० आणि वायसीएम रुग्णालयात ६० आयसोलेटेड बेडसची व्यवस्था करण्यात आली आहे. नायडू रुग्णालयात आठ करोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले, त्यांच्यासाठी मानसिक आधार देण्याची आवश्यकता असून क्वॉरंटाईन केलेल्या ठिकाणी त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देणार
असल्याचेही त्यांनी सांगितले.
        एनआयव्ही संस्थेला भेट दिल्याचे सांगून आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, एनआयव्ही संस्थेची लॅब  ५० ते ६० देशातील अन्य लॅबशी जोडलेली आहे. येथील संशोधकांशी कोरोना व्हायरसबाबात चर्चा केली. कोरोनाच्या चाचण्या घेण्यासाठी एक प्रोटोकॉल आहे. संबधितांची ट्रॅव्हल हिस्ट्री आणि कोरोनाची लक्षणे असतील तरच चाचणी केली जाते. सध्या राज्यात चार ठिकाणी चाचणी लॅब सुरु आहेत. केंद्र शासनाने दहा लाख किट्स ऑर्डर केल्या आहेत. उद्या आणखी तीन ठिकाणी लॅब सुरु होणार आहेत. तर पुढील चार दिवसांत आणखी पाच लॅब अशा एकूण आठ लॅब लवकच सुरू होणार आहे. खासगी लॅबलाही चाचणीची परवानगी देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
         सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नका, माहितीची अधिकृत स्त्रोतांकडून खात्री पटल्याशिवाय अपूर्ण, अर्धवट, खोटी, दिशाभूल करणारी माहिती पसरवू नका,असे प्रकार करणाऱ्या विरोधात पोलीस दलाचा सायबर पोलीस विभाग कार्यवाही करेल, असे सांगून आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, ज्या व्यक्तींना त्यांचे अहवाल निगेटीव्हआल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.त्या व्यक्तींच्या हातावर 'होम क्वारंटाईन' असा शिक्का मारण्यात आला आहे. या व्यक्तींना १४ दिवस कोणाच्याही संपर्कात राहण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यांनीही स्वतःच्या  आणि इतरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहनही आरोग्यमंत्री श्री टोपे यांनी केले आहे.
                                                     0000पुणे (टाईम न्युजलाईन नेटवर्क)
: पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सर्व एफएल 3 (तारांकीत हॉटेल वगळून) फॉर्म ई/ ई -2/ एफएल-4 (कायमस्वरूपी) एफएल-4 (तात्पूरती) या अनुज्ञप्त्यांचे व्यवहार 18 मार्च ते 31 मार्च 2020 अखेरपर्यंत पूर्णपणे बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिले आहेत.
       आंतरराष्ट्रीय स्तरावरून व देशाअंतर्गत विमान प्रवासाव्दारे प्रवासी देशात सर्वत्र प्रवास करत आहेत. असे प्रवासी पुणे जिल्हयात परदेश प्रवास करून आलेले आहेत व त्यातील बरेच प्रवाशी परतीच्या मार्गावर आहेत, त्यामुळे कोरोनो विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व कोरोना विषाणूचे संसर्ग असल्यास त्यात अधीक वाढ होवू न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे, अशा प्रवाशांमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग जिल्हयात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे, वास्तव्य करणे या बाबी टाळणे आवश्यक आहे. विषाणूची लागण एका संक्रमीत रुग्णाकडून अन्य व्यक्तीस त्याच्या संपर्कात आल्याने होण्याची शक्यता असल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिनियम-2005 तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 मधील कलम-142 नुसार पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सर्व एफएल 3 (तारांकीत हॉटेल वगळून) फॉर्म ई/ ई -2/ एफएल-4 (कायमस्वरूपी) एफएल-4 (तात्पूरती) या अनुज्ञप्त्यांचे व्यवहार 18 मार्च ते 31 मार्च 2020 अखेरपर्यंत पूर्णपणे बंद राहतील. आदेशाचे उल्लंघन झाल्यास महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियमन, 1949 व  त्या अंतर्गत असलेल्या कलम  व नियमांनुसार योग्य ती कडक कारवाई केली जाईल, असेही जिल्हाधिकारी राम यांनी आदेशात म्हटले आहे.
                                                  

373 व्यक्तींपैकी 333 जणांच्या नमुन्यांचे अहवाल निगेटीव्ह 
आतापर्यंत 26 हजार 315 घरांमधील 1 लाख 17 हजार हून अधिक लोकांचा सर्वे 

*-विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर*


पुणे,(टाईम न्युजलाईन नेटवर्क):  राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविलेल्या 373 व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुन्यांपैकी 333 व्यक्तींची चाचणी निगेटिव्ह आली असून काल पर्यंतचे 16 व आजचा एक रुग्ण असे एकूण 17 रुग्ण पॉसिटीव्ह असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. दरम्यान आतापर्यंत आढळलेल्या 17 कोरोना बाधित व्यक्तींची  प्रकृती स्थिर असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
     कोरोना संदर्भात प्रशासनाच्या वतीने सुरु असलेल्या कार्यवाहीबाबत माहिती देण्यासाठी आज विभागीय आयुक्त कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली, यावेळी विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय देशमुख आदी उपस्थित होते.

           विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, वैद्यकीय चाचणी घेतलेल्या एकूण 373 व्यक्तींपैकी 333 जणांच्या नमुन्यांचे अहवाल निगेटीव्ह आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जावू नये. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परदेशातून आलेल्या नागरिकांचे अलगीकरण प्रभावीपणे करण्यात येत असून असे नागरिक बाहेर फिरतानाची तक्रार प्राप्त झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
                   
राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या माध्यमातून  रुग्णांवरील उपचार, एन 95 मास्क, सर्जिकल मास्क, पीपीई इत्यादी आवश्यक साधनसामुग्रीसाठी विभागातील सर्व जिल्ह्यांना निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्याला 2 कोटी 40 लाख तर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी प्रत्येकी 40 लाख रुपयांचा निधी देण्यात येत आहे, अशी माहिती देऊन विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, सॅनिटायझर वगैरे वस्तूंचा बेकायदेशीर साठा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. गर्दी टाळण्यासाठी पीएमपीएमएल बसेस च्या फेऱ्या कमी करण्यात आल्या असून स्थानिक स्तरावरील निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
              डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेची पथके घरांचा सर्वे करून माहिती गोळा करीत आहेत. आतापर्यंत 26 हजार 315 घरांमधील 1 लाख 17 हजार हून अधिक लोकांचा सर्वे पूर्ण झाला आहे. काल विमानाने आलेल्या 148 प्रवाशांना घरी कॉरंटाईन करण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी यावेळी सांगितले.

कोरोना बाधित 16 व्यक्तींची  प्रकृती स्थिर*
-विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे,(टाईम न्युजलाईन नेटवर्क):-   राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविलेल्या  व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुन्यांपैकी 28 व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून त्यातील 27 व्यक्ती कोरोना बाधित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. एक व्यक्ती कोरोना बाधित असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. दरम्यान यापूर्वी आढळलेल्या 16 कोरोना बाधित व्यक्तींची  प्रकृती स्थिर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
             विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना संदर्भात प्रशासनाच्या वतीने सुरु असलेल्या कार्यवाहीबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख, जिल्हा शल्यचिकीत्सक अशोक नांदापूरकर आदी उपस्थित होते.
           विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले,  सध्या 28 पैकी 27 जणांच्या नमुन्यांचे अहवाल निगेटीव्ह आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही. मात्र, चीन, इटली, इराण, फ्रान्स, स्पेन, जर्मनी, दक्षिण कोरियाबरोबरच आता दुबई, सौदी अरेबिया आणि अमेरिकेतून आलेल्या नागरिकांना देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
                    रुग्णांच्या उपचारासाठी येणारा खर्च हा राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून उपयोगात आणला जाणार असल्याची माहिती देऊन विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यांना निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. हा निधी  विभागीय आयुक्तांकडे दिला जाईल. तिथून आवश्यकतेप्रमाणे वेगवेगळ्या जिल्ह्यांना या निधीचे वाटप केले जाईल. जो निधी उपलब्ध करून दिला जाईल, त्याद्वारे पुणे व उर्वरीत चार जिल्ह्यांना निधी दिला जाईल. याच प्रमाणे अन्य विभागीय आयुक्तांकडे देखील असाच निधी दिला जाईल. स्थानिक स्तरावरील निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
              डॉ. म्हैसेकर म्हणाले, मुख्यमंत्री महोदयांनी आज सकाळी राज्यातील सर्व जिल्हाधिका-यांची व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली. मुख्य सचिव, आरोग्य सचिव व अन्य अधिकारी या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला उपस्थित होते.
    दुबई, सौदी अरेबिया व युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका या तीन देशांमधून जर कोणी परदेशी प्रवासी इथे आले तर त्यांच्याबाबतीत अन्य सात देशांप्रमाणेच प्रोटोकॉल फॉलो केला जाणार आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेची पथके घरांचा सर्वे करून माहिती गोळा करीत आहे. आतापर्यंत 15 हजार 803 घरांमध्ये व 52 हजार 714 लोकांचा सर्वे पूर्ण केलेला आहे. या पथकांना संशयित वाटलेल्या दोन जणांना आज नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.
           डॉ. म्हैसेकर म्हणाले,  काल रात्री विमानाने आलेल्या प्रवाशांपैकी सात प्रवाशांनी त्यांना प्राथमिक स्वरुपातील काही लक्षणे जाणवत असल्याचे सांगितले. या प्रवाशांनी स्वतः याबाबत माहिती दिल्याने त्यांना नायडू रुग्णालयात दाखल केले आहे. तेथील डॉक्टर त्यांना तपासून आवश्यक असेल तर त्यांचे नमुने घेतील आणि नमुन्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याआधारे पुढील कार्यवाही ठरेल. डॉक्टरांच्या मते त्यांना केवळ घरी विलगीकरण कक्षात राहणे अपेक्षित असेल, तर त्यांना तशा सूचना दिल्या जातील व ते त्यांच्या घरी जातील. एक प्रवासी दोन महिने जर्मनीत राहिलेला होता. त्याला नायडू रुग्णालयात दाखल करून  या ठिकाणी त्याचे नमुने घेण्यात आले आहेत.
           जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, शहरासह जिल्ह्यात साथरोग नियंत्रण कायद्यांतर्गत आदेश आहेत. स्वतंत्र १४४ चे आदेश नाहीत. १४४ (१) च्या आदेशानुसार प्रशासनाचे आदेश न पाळणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी आहे, याची अंमलबजावणी पोलीस करतील.पुण्यात सध्या कुठेही संचारबंदी किंवा जमावबंदी नाही. यापूर्वीच महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्र तसेच लगतच्या क्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यापुढे संपूर्ण पुणे जिल्हयातील सर्व शाळा बंद राहतील असे त्यांनी स्पष्ट केले.
 यात्रा, जत्रा, मोठे उत्सव याठिकाणी होणारी गर्दी टाळण्याचे आवाहन यापूर्वीच करण्यात आले असून कुठेही  गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्याचे ते म्हणाले. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. एकमेकांसोबतचा संपर्क टाळावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राम यांनी केले आहे.


पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये आज जमावबंदी लागू होण्याची शक्यता असून जमावबंदीबाबत पोलीस आयुक्त कार्यालयात ड्राफ्टचं काम सुरू आहे.जमाव बंदी काही भागात सुरू करण्यात येणार आहे.या बाबतच्या हालचाली सुरू झाल्या आहे.सर्व बाबींचा विचार करून जमाव बंदी करण्याची शक्यता आहे.कोरोनाच्या वाढत्या रुग्णाच्या संख्येवरून हा निर्णय होऊ शकतो
यापूर्वी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांनी घराबाहेर न पडण्याचे आव्हान नागरिकांना केले आहेमुळशी(टाईमन्यूजलाईन)
: मारुंजी जंगलत मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यातून वन्यजीवप्रेमी तिघाजणांनी मोराला शुक्रवारी (ता.13) वाचवले. मोकाट कुत्र्यांच्या टोळक्यांमुळं वन्यजीवन नामशेष होण्याच्या मार्गावर असूनही वनविभाग मात्र या समस्येकडं उपाययोजना करीत नसल्याचं समोर आलं आहे.मोकाट कुत्र्यांपुढं हतबल वनविभागानं नांगी टाकली की काय अशीच अवस्था झाली आहे.  शुक्रवारी दुपारी 12 नंतर काही मोर मारुंजी पटावडा, व जंगलातील बेलआडवं भागातून आयटी पार्कच्या दिशेने आले. त्यांच्या मागे मोकाट आठ कुत्री लागली. काही मोर झाडावरून तर जंगलात गेले.मात्र एक मोर आयटी पार्कच्या बाजूनं रस्ता चुकला. झाडावरून उडाला मात्र जमिनीवर येताच पाठलाग करणाऱ्या कुत्र्यांनी त्याला पकडले. इतक्यात हॉटेल व्यावसाईक सागर पांडुरंग सावंत यांनी हे पाहुण धाव घेतली. कुत्र्यांना हुसकावून लावलं व मोराला पकडून सुरक्षित ठिकाणी ठेवलं. मोराच्या डोळ्याला व पायाला जखम झाली आहे. वन विभागाला माहिती दिली आहे. सागर पांडुरंग सावंत यांना  दिनेश चव्हाण, संतोष चौधरी यांनी मदत केली. सावंत यांनी 2 महिन्यापूर्वी पंधरा मोकाट कुत्र्यांच्या टोळक्यापासून एक भेकराला वाचवून जंगलात सुखरूप धाडलं होतं. त्यांच्या या प्रयत्नांचं कौतुक होत आहे.


         गरज पडल्यास पिंपरी चिंचवड येथील नविन रुग्णालयात देखील विलगीकरणाची सुविधा 

 मुंबई, (टाईम न्युजलाईन नेटवर्क) : राज्यामध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या रुग्णांची प्रकृती स्थ‍िर असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी भीती बाळगण्याची आवश्यकता नाही. आरोग्य विभागासह विमानतळ,बंदरे, रेल्वे येथेही आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे.  नागरिकांनी सामुहिक कार्यक्रमांना गर्दी करणे टाळावे. शाळा, महाविद्यालये तसेच धार्मिक कार्यक्रम यांचेबाबत धोरणात्मक निर्णय घेतानाच खासगी रुग्णालयातील विशेषज्ञांनी यासंदर्भात सर्वसामान्यरित्या अवलंबवायची कार्यपद्धती (एसओपी) तातडीने तयार करावी. जनजागृती करण्यासाठी सर्व गावांमध्ये ग्रामसभा घेण्यात याव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिल्या.
          कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी विधानभवनात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री श्री.ठाकरे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,राज्यमंत्री राजेंद्र पाटील, माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत,रेल्वे, बंदरे, विमानतळ प्राधिकरण, खासगी रुग्णालयातील विशेषज्ञ, विविध विभागांचे अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.
          यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुणे विभागीयआयुक्त,जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधून पुणे येथील परिस्थितीबीबत माहिती  घेतली.
          पुणे येथील नायडू रुग्णालयात विलगीकरणाची सुविधा असून गरज पडल्यास पिंपरी चिंचवड येथील नविन रुग्णालयात देखील विलगीकरणाची सुविधा करावी. व्हेंटीलेटर्सची उपलब्धता ठेवावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
          उपचारासाठी आवश्यक असणारी कुठलीही बाब, उपकरणाची आवश्यकता भासल्यास त्याची खरेदी जिल्हा नियोजन खर्चातून करावी, माध्यमांना दररोज माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घ्या, असे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिले.
          यावेळी मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, भारत सरकारने नोव्हेल कोरोना व्हायरस (कोविड-19) प्रतिबंधाबाबत करावयाच्या उपाययोजना (Containment Plan) केंद्र सरकारने प्रसिद्ध केल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त यांना देण्यात येत आहे. त्यांनी जिल्हाधिकारी,आरोग्य विभाग व इतर आवश्यक विभागांशी समन्वय साधून ही कार्यवाही करावी.
           कोविड-19 या आजाराबाबत जनजागृती व आरोग्य शिक्षण देण्यासाठी तसेच हात स्वच्छ धुणे,खोकताना- शिंकताना घ्यावयाची काळजी,खोकणाऱ्या, शिंकणाऱ्या व्यक्तीपासून तीन फूट अंतर ठेवणे अशा महत्त्वाचे संदेश देण्यासाठी जनजागृती करण्यासाठी बस स्टँड, एसटी पॅनल,होर्डींग्ज्, दूरदर्शन, रेडिओ अशा विविध माध्यमांचा प्रभावीपणे वापर करावा.
           कोरोना चाचणी सकारात्मक आलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील जास्त जोखमीच्या (High Risk) व्यक्तींची चाचणी करावी तसेच कमी जोखमीच्या (Low Risk) व्यक्तिंनी १४ दिवस घरीच थांबण्यास सांगावे. अशा व्यक्तींच्या  घराभोवतालच्या ३ किमी अंतरातील सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
          गाव पातळीवर कोरोना विषाणु आजाराच्या संदर्भाने मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यासाठी सर्व गावांमध्ये ग्रामसभा घ्याव्यात. त्या माध्यमातून या आजाराच्या प्रतिबंधासाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत माहिती द्यावी.
          प्रयोगशाळा तपासणी (Throat swab)करण्यासाठी खाजगी प्रयोगशाळांना मान्यता देण्यासाठी केंद्र शासनास विनंती करण्यात येईल व त्यासाठीचा पाठपुरावा राज्य शासनामार्फत करण्यात येईल.
           रुग्णांचे स्क्रीनिंग, संशयीत रुग्णांच्या प्रयोगशाळा चाचण्या आणि आरोग्य शिक्षण या बाबींसाठी स्टँडर्ड ऑपरेटींग प्रोटोकॉल खाजगी रुग्णालयातील विशेषज्ञांनी तयार करून सार्वजनिक आरोग्य विभागास सादर करावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
          सर्व टूर ऑपरेटरनी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची माहिती द्यावी आणि त्यापैकी एखाद्या प्रवाशास ताप, खोकला असल्यास त्वरित आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, अशा सूचना पर्यटन विभागाला देण्यात आल्या.प


पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):राज्यसभेच्या खासदारासाठी महाराष्ट्रातुन तीन जागांवर निवडणूक होणार आहे भाजपकडून उदयनराजे भोसले,रामदास आठवले यांनी संधी देण्यात आली तर भाजपकडून तिसऱ्या जागेसाठी चाचपणी सुरू होती अखेर तिसऱ्या ही नावाची घोषणा करण्यात आली औरंगाबाद भाजपचे माजी महापौर भगवत कराड यांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळे पुणे जिल्ह्यातील दोन खासदार अमर साबळे,संजय काकडे यांचा पत्ता कट झाला आहे भाजपाकडून तीनही उमेदवाराची यादी जाहीर करण्यात आली त्यामुळे दोनही खासदार अस्वस्थ झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे


       मुंबई, दि. 11 : पुणे शहरालगत असलेल्या वाघोली, मांजरी बुद्रुकमांजरी खुर्द यांसह आणखी काही गावांचा समावेश करून नवीन महानगरपालिका स्थापन करण्याबाबत शासन सकारात्मक आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली.                                                                                         
           सदस्य अशोक पवार यांनी पुणे शहरालगतच्या वाघोली भागातील रस्ते वाहतूक,पाणीपुरवठा आदि समस्यांबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. पवार बोलत होते.
              पुणे शहरामध्ये काही गावे समाविष्ट करण्याची त्या त्या भागातील लोकप्रतिनिधींची आग्रही मागणी आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड सोडून बाकीचा इतर भाग पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत आला आहे .परंतु या कामाला गती देण्याची गरज आहे असेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
            पुणे महानगर क्षेत्रातील वाघोली गाव शहरालगत असल्याने वेगाने नागरीकरण होत आहे .वाढत्या नागरीकरणामुळे सध्याचा 2.5 एमएलडी क्षमतेचा पाणीपुरवठा अपुरा पडत असल्याने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत वाढीव  5 एमएलडी पाणी पुरवठा योजना हाती घेण्यात आली आहे .पुणे- शिरूर -अहमदनगर या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत चार पदरी रस्त्याचे सहापदरीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. वाघोलीतील घनकचरा व्यवस्थापनाकरीता प्राधिकरणाने वाघोली ग्रामपंचायतीला पंधरा कचरावाहू वाहने उपलब्ध करून दिली आहेत तसेच हवेली व मुळशी तालुक्यातील 8 गावांकरिता घनकचरा व्यवस्थापनासाठी पूर्वसुधारणेचा अहवाल तयार करून घेण्याची कार्यवाही प्राधिकरणाच्या स्तरावर सुरू आहे अशी माहिती नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.
            यावेळी सदस्य सर्वश्री अशोक पवार,बबनराव पाचपुतेभीमराव तापकीर व राहुल कुल यांनी चर्चेत भाग घेतला.

मुंबई: महिला अत्याचारांना पायबंद घालण्यासाठी राज्यात करण्यात येणाऱ्या नवीन कायद्याअंतर्गत लहान मुलांच्या अश्लील व लैंगिक अत्याचाराच्या ध्वनिचित्रफिती समाज माध्यमांवर प्रसारित करण्याच्या गुन्ह्यांचाही (चाईल्ड पोर्नोग्राफी) समावेश करण्यात येईलअसे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत सांगितले. चाईल्ड पोर्नोग्राफीविरोधील कारवाईमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल स्थानावर असून आतापर्यंत 125 गुन्ह्यांमध्ये 40 जणांना अटक करण्यात आली आहे,अशी माहितीही त्यांनी दिली.
            चाईल्ड पोर्नोग्राफीसंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना ते बोलत होते. श्री.देशमुख म्हणालेचाईल्ड पोर्नोग्राफीविरोधात कारवाई करण्यासाठी 'नॅशनल क्राईम रेकॉर्डस् ब्युरो'ने (एनसीआरबी) प्रत्येक राज्यात नोडल अधिकाऱ्याची नेमणूक केली असून राज्यात महाराष्ट्र सायबरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे.
            चाईल्ड पोर्नोग्राफीविरोधात कारवाई करण्यासाठी दि. 18 डिसेंबर 2019 पासून राज्यभरात ‘ऑपरेशन ब्लॅक फेस’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आतापर्यंत 40 जणांना अटक करण्यात आली असून देशभरात अशा स्वरूपाच्या कारवाईमध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे.
        नॅशनल सेंटर फॉर मिसिंग ॲण्ड एक्स्प्लॉयटेड चिल्ड्रेन (एनसीएमईसी- युएसए) ही आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था समाजमाध्यमांवरील अश्लील व बाललैंगिक अत्याचाराच्या चित्रफीती आदींची (पोर्नोग्राफिक व्हिडीओ) माहिती फेसबुक,इन्स्टाग्राम आदी इलेक्ट्रॉनिक सर्व्हिस प्रोव्हायडर’ (ईएसपी) यांच्या सहकार्याने एनसीआरबीला पुरविते. एनसीआरबी ही माहिती संबंधित राज्यांच्या नोडल अधिकाऱ्यांना कारवाईकरिता पुरविते.
            एनसीआरबीने जुलै 2019 ते नोव्हेंबर 2019 या कालावधीतील बाललैंगिक अत्याचारांसंदर्भातील 1 हजार 680 ध्वनीचित्रफीतींची माहिती महाराष्ट्र सायबर कार्यालयास दिली. त्यानंतर दि. 18 डिसेंबर 2019 रोजी या ध्वनीचित्रफीतींची माहिती राज्यातील 10 आयुक्तालये आणि 29 जिल्हा घटकांना देण्यात आली. त्याविरोधी कारवाईसाठी ऑपरेशन ब्लॅक फेस’ राबविण्यात आले. आतापर्यंत चाईल्ड पोर्नोग्राफीसंदर्भात राज्यात 125 गुन्हे दाखल करण्यात आले असून 40 आरोपींना अटक करण्यात आली. भा.दं.वि. कलम 292 सह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्याच्या (पोक्सो ॲक्ट) कलम 1415 आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 67 अ आणि 67 ब अन्वये ही अटक करण्यात आली आहे.
            अशा स्वरूपाचे अभियान एनसीआरबीच्या सूचनेनुसार संपूर्ण देशभरात राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आतापर्यंत केलेल्या कारवाईत देशात महाराष्ट्राने अव्वल स्थान प्राप्त केले आहे. दुसऱ्या स्थानावर कर्नाटक राज्य आहे.
            महिला तसेच मुलांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र सायबरमार्फत यासंदर्भात दिनदर्शिका तसेच पुस्तिका तयार करुन शाळामहाविद्यालयांमध्ये वितरीत करण्यात आली. याशिवाय सावित्रीबाई फुले जयंतीदिनी संपूर्ण राज्यात महिला व मुलांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी सायबर सेफ वुमन’ हे अभियान राबविण्यात आले. पोलीस आयुक्त तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या स्तरावरुनही यासंदर्भात कार्यवाही करण्यात आली आहे.
            ‘ऑपरेशन ब्लॅक फेस’ अंतर्गत केल्या जाणाऱ्या कारवाईमुळे तसेच करण्यात येणाऱ्या कायद्यामुळे भविष्यात बालकांवरील लैगिक अत्याचाराच्या ध्वनिचित्रफिती (चाईल्ड पोर्नोग्राफी) (व्हिडीओ) सोशल मीडियावर प्रसारीत करणाऱ्यांवर निश्च‍ितच आळा बसेलअसेही श्री. देशमुख म्हणाले.
            या लक्षवेधीवरील चर्चेत सदस्य ॲड.आशिष शेलारयोगेश सागरराम कदमरईस शेख यांनी सहभाग घेतला.

पिंपरी,(टाईम न्युजलाईन नेटवर्क):
- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नेहरूनगर, पिंपरी येथील मेजर धान्यचंद पॉलिग्रास हॉकी स्टेडिमयमध्ये नवीन पॉलिग्रास बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हे पॉलिग्रास आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या नियम वअटीनुसार बसविले जावे, अशी आग्रही भूमिका  उपमहापौर तथा क्रीडा समितीचे सभापती तुषार हिंगे यांनी घेतली आहे.
 
नियमानुसार काम झाल्यास या मैदानावर भविष्यात आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करता येतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला आहे.  
उपमहापौर हिंगे यांनी या मैदानाची बुधवारी (दि.11) पाहणी केली. या वेळी क्रीडा समितीचे सहायक आयुक्त संदीप खोत, कार्यकारी अभियंता प्रदीप पुजारी, या कामाचे सल्लागार, क्रीडाधिकारी रज्जाक पानसरे व अधिकारी उपस्थित होते. पाहणीनंतर त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना वरील सूचना केल्या.

मैदानातील जुने पॉलिग्रास खराब झाले असून, त्या ऐवजी नवे पॉलिग्रास टाकण्याचे काम नुकतेच स्थापत्य विभागामार्फत सुरू झाले आहे. या कामांचा खर्च सुमारे 4 कोटी 14 लाख 95 हजार इतका आहे. हे काम स्पोर्टीना एक्झाम प्रा. लि. या कंपनीमार्फत सुरू आहे. या कामांची पाहणी उपमहापौर हिंगे यांनी केली.

तुषार हिंगे म्हणाले की, म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिव छत्रपती क्रीडा संकुलात हॉकी पॉलिग्रास बदलण्याचे काम सुरू आहे. तेथील काम आंतरराष्ट्रीय मानकांनुसार होत आहे. त्याचा दर्जा उत्तम व व योग्य आहे. त्यानुसार नेहरूनगर मैदानावरही काम केले जावे. किमान दहा वर्षांनंतर पॉलिग्रास बदलले जाते. त्यामुळे या मैदानावर आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण होण्यासाठी त्या दर्जाचे पॉलिग्रास असायला हवे. त्यात कोणताही तडजोड नको, असा सक्त सूचना त्यांनी अधिकार्‍यांना केल्या.  

आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या नियमानुसार नवीन पॉलिग्रास टाकले जावे. त्यानुसार काम केले जावे. अन्यथा काम करू दिले जाणार नाही, असा इशारा हिंगे यांनी दिला आहे. स्थापत्य विभागाने कोणतेही काम करताना क्रीडा विभागाशी चर्चा करावी. त्यांना विश्‍वासात घेऊनच काम करावे. त्यामुळे नागरिकांचा पैशा वाया जाणार नाही, असे ते म्हणाले. या कामासंदर्भात लवकरच ते आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या सोबत बैठक घेणार आहेत....तर क्रीडा विभागाच बंद करा  - तुषार हिंगे

पॉलिग्रास लावण्याचे हे काम करताना क्रीडा विभागाशी स्थापत्य विभागाने कोणताही समन्वय ठेवला नाही. क्रीडा विभागास विश्‍वासात न घेता परस्पर हे काम सुरू केले आहे. त्यामुळे क्रीडा विभागाच बंद करून टाका, अशी खंत तुषार हिंगे यांनी व्यक्त केली. क्रीडा विभागासाठी स्वतंत्र स्थापत्य विभाग स्थापन करण्याची हिंगे यांची पूर्वीपासूनची मागणी आहे. त्यामुळे क्रीडा नियमानुसार चांगले काम करता येईल आणि खेळाडूंना शहरात चांगला सुविधा उपलब्ध होतील आणि पालिकेचे आर्थिक नुकसान होणार नाही, असे त्याचे मत आहे.


जुन्नर (टाईम न्युजलाईन नेटवर्क):
पुण्यात द्राक्ष बागेतच द्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. जुन्नर तालुक्यातील या महोत्सवात थेट द्राक्ष बागेत बसूनच द्राक्षांचा आस्वाद नागरिक घेत आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि शेतकऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने सलग दुसऱ्या वर्षी याचं आयोजन करण्यात आलं. दोन दिवसीय महोत्सवात रसायन मुक्त द्राक्षांची लागवड, पॅकिंग आणि त्यापासून कशी वाईन बनवले जाते याचे प्रात्यक्षिक पाहता येणार आहे. परदेशात निर्यात होणाऱ्या या गोड चवीच्या रसाळ द्राक्षांचा आस्वाद आणि माहिती घेण्याला पसंती मिळू लागली. तेजस रामदास राजीवडे 
आज जगात अनेक महिला नावाजलेल्या आहेत त्यातून महिलांना उच्च स्थान दिले जाते. पुरूष वर्ग हा जरी महत्वाचे असला तरी स्त्री हिला तितकेच  महत्वाचे स्थान  आहे.आज कोणत्याच क्षेत्रात महिला मागे नाही.महिलांनी उंच भरारी घेत नवनवीन क्षेत्रात यश प्राप्त केले आहे.ग्रामीण भागातील महिलांनी राष्ट्रपती पदकालाही गवसणी घातली.
आपण विचार केला तर राजकारणात, शेतकरी कुटुंबात, लेखिका स्त्री या महत्वाचे  मानल्या जातात.
सिंधुताई सपकाळ या सारख्या स्त्रीचा सभांळ जरी नव्याने छळ केला तरी तिने आपला संसार  अनाथ मुलांना आपले आयुष्य घातले. ज्या विद्यार्थ्यांना खाणे-पिणे,ज्यांचे आई-वडील  नाहीत अशाच मुलांचा साभांळ करते आणि एवढेच नव्हे तर मंदिरा समोर भीक मागणारे अशा मुलांना  एकत्रित करून साभांळ करते आणि त्यांची 'माय' होते. माईना सावित्रीबाई फुले विद्यापीठाने " जीवनसाधना गौरव पुरस्कार " ,2010 साली मी सिंधुताई सपकाळ हा चित्रपट आला त्यांना 'अनाथाची माई' म्हणून संबोधले जायचे. 
राहीबाई सोनेरी ही स्त्री  ग्रामीण  भागातील महिला आहे. ही कोल्हापूर सारख्या खेड्यात लहानशी मोठी झाली. स्वतःच्या पायावर उभे राहून आपल्या घरात शेतकरी करून "सुधारित बी-बियाणे " बॅंक स्थापन केली  या बॅकेत चाई, माठ, मठा, चदंनबटवा, भाताची पेज इत्यादी  वस्तू  बॅंकेत मिळत.गावातील  महिलांना एकत्र करून बचत गटाची स्थापना केली.अशा राहीबाईना निसर्गाशी प्रचंड  प्रेम असत.त्यांना  निसर्गाने जगण्याची शाळा काढली एवढ्या मोठ्या  शेतात नागली, वरई , भात, उडीद, भूईमूग इत्यादी  पिके घेतली जात. त्यातून खत तयार केली जात.शेतीच्या माध्यमातून आपला ससांर उभा केला.कळसुबाई परिसर  बियाणे संवर्धन  समिती  स्थापन केली. 16 जातीचे वाण जमा केले.तसेच प्रचार प्रसाराचे कार्य सुरु केले  राहीबाईना 'बायफ' या संस्थेची साथ मिळाली. भारत सरकारने महिला  बालकल्याण विभाग पुरस्कार 2018 साली राष्ट्रपती कोविद यांच्या हस्ते झाला. 25 जानेवारी 2020 रोजी "पद्मश्री " पुरस्कार प्रदान करण्यात आला.पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):
कोणी काय बोलतंय याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. महाविकासआघाडीचे सरकार व्यवस्थित काम करतं आहे. कोणी काहीही म्हणो मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो, या सरकारला कोणताही धोका नाही.
पिंपरी चिंचवड महापालिका परिसरातील जनतेच्या लक्षात एक गोष्ट आली नाही. मी इतका विकास केला, वीस वर्षे जनता मला पाठबळ देत होती. नरेंद्र मोदींची लाट आली, आमच्यातले तिकडे गेले, त्यांची सत्ता आली. तीन वर्षात काय अवस्था आहे, भ्रष्टाचार सुरु आहे.असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मावळमध्ये लगावला
मावळमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार एका खाजगी कार्यक्रमात आले होते त्यावेळी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की,राष्ट्रीयीकृत बँकेतून पैसे काढून खाजगी बँकेत पैसे ठेवण्याचं काही कारण नव्हत. उद्या बँक अडचणीत आली तर जनतेचा पैसा कोण भरून देणार, आत्ताच महापालिका  त्याला जबाबदार आहेत. माझ्या हातात सत्ता होती तेंव्हा मी स्वतः लक्ष देत होतो. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि मुंबईला गेल्यानंतर नगरविकास खात्याकडून माहिती घेणार आहे. शेवटी मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. त्यामुळे मला लक्ष ठेवणे गरजेचे आहे.असे ही पवार यांनी सांगितले
.


Mumbai, (timenewsline network)After publishing the second list of Mahatma Jyotirav Fule Farmers' loan waiver scheme standardisation of 15.45 lakh farmers was completed in just five days. An amount of Rs9045 store has been deposited in13.88 lakh accounts out of these.45lakh. Chief Minister Uddhav Thackeray directed the officers to see that that farmers do not face any difficulties and to sort out their complaints speedily.
While implementing the scheme the list of beneficiary farmers is prepared village wise in a most transparent manner. With this the farmers are rest assured about inclusion of their names in the list.
The district administration in all the districts has made pre-plannjng for publication of list and Aadhar standardisation sans any complaint and obstruction. This is being implemented in all the districts as a campaign, said Principal Secretary of Cooperative Abhay Shukla.
The farmers everywhere are happy and enthusiastic as their standardisation is completed at the bank's and Aple Sarkar Seva Kendra within 2 to minutes.
After the standardisation of aadhar by the farmers whose names are published, they are given  computerised receipt of acceptance or non- acceptance. This indicated to the transparent character of this scheme. Care also taken to implement this scheme in a totally people-oriented and transparent manner.
In the standardisation process those farmers who have problems with their Aadhar numbers or the amount shown in their loan accounts, the district-level committed are taking immediate steps to redress their issues. After standardisation the amount is deposited in beneficiary farmer:'s loan account within 24 hours in case of commercial banks and 48 hours in case of district central cooperative banks. For this the government has made funds available.

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget