पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):
पिंपरी चिंचवडमध्ये चोरट्याने अवघ्या तीन सेकंदात दुकानाचे शटर उघडून रोकड लंपास केली. देहूरोडमध्ये घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. दुकानात मदतीसाठी ठेवलेली दानपेटीवर चोरट्यांनी डल्ला मारला. रविवारच्या पहाटे हा प्रकार समोर आला. दोन दुचाकीवर आलेल्या चोरट्यांपैकी दोघांनी हातानेच हे शटर उचकटले. अवघ्या तीन सेकंदात हातानेच शटरचे लॉक तुटले यावरून शटर किती हलक्या दर्जाचे आहे, हे स्पष्ट होतं आहे. या चोरट्यांनी याचाच फायदा घेतला. अन्य दोन दुकानं चोरट्यांनी फोडली पण रोकड नसल्याने तिथून त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. देहूरोड पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे या चोरट्यांचा शोध घेत आहे.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.