गल्लीतील एटीएम फोडला वाकड पोलिसांनी त्याला दिल्लीतून जेलमध्ये धाडला

पिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क):
पिंपरी-चिंचवड झपाट्याने वाढत चालले आहे. वाढत्या शहराबरोबर गुन्हेगारी ही वाढली आहे. एटीएम फोडणाऱ्या गुन्हेगारांनी तर शहरात हौदोस घातला होता. एटीएमची स्थानिकांच्या मदतीने रेकी करून थेट एटीएम फोडण्याचा विक्रमच त्यांनी केला होता. पोलिसांच्या नाकात दम आणाला होता. परंतु, वाकड पोलिसांनी आपले कौशल्य वापरून थेट या अंतरराज्य टोळीच्या मुसक्या आवळण्याचा  चंग बांधला. आणि त्या प्रमाणे तपास करून गल्लीतील अनेक एटीएम फोडलेल्या चोरांना दिल्लीत पकडून डायरेक जेलमध्ये धाडले.
पिंपरी-चिंचवड शहर श्रीमंत म्हणून ओळखले जात आहे. श्रीमंत शहरात विविध बँकाची एटीएम ही शहरात मोठ्या प्रमाणात आहे. त्याच एटीएमचा आंदाज घेऊन एटीएम मध्ये नागरिकांना पैसे काढून देतो असे सांगून फसवणूक करणार अझरुद्दीन ताहीर हुसेन (२९ हरियणा) याने व्यवसायच बदलला स्थानिक मित्र संदीप माणिक साळवे (४३, रा. जांबे, ता. मुळशी, जि. पुणे),दत्तात्रय रघूनाथ कोकाटे (४२, रा. थेरगाव) यांच्या मदतीने सर्फुद्दीन हसीम (२२,रा. हरीयाना) यांनी अंतरराजीय टोळी बनविली.
या टोळीचा मोरक्या अझरुद्दीन हुसेन हा साळवी आणि कोकाटे याच्या मदतीने शहरातील एटीएमच्या मदतीने रेकी करत होता. एटीएममध्ये जावून डजबिनमध्ये नोटां पॅकींग केलेल्या पांढऱ्या पट्यांचा आंदाज घेत होते. एटीएममध्ये त्या पांढऱ्या पट्ट्या डजबिनमध्ये मोठ्या प्रमाणात दिसताच त्याच एटीएमवर फिल्डींग लावून एटीएम मित्र्यांच्या मदतीने गॅस कटरच्या मदतीने फोडत होते. अझरुद्दीन हा विमानाने प्रवास करत होता तर बाकीची टोळी पैसे घेऊन मोटारीमधून हरियणाला जात होती. ही अंतराज्यातील टोळी तयार झाली होती. यांनी कोणाला ही खबर लागून दिली नव्हती. त्यांनी शहरात एटीएम फोडण्याचे सत्र सुरुच ठेवले होते. जणूकाही झटपट श्रीमंत होण्याचा त्यांना मार्गच मिळाला होता. तर त्यांचे स्थानिक मित्र त्यांच्या सपर्कात होते. त्यामुळे त्यांना सहज दरोडा पचविता येत होता. हे वर्षभर सत्र सुरु होते.
पिंपरी-चिंचवड शहरातील पोलिसांच्या नाकात या चोरट्यांनी दम आणला होता. वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत थेरगाव येथील एका एटीएमवर या टोळीने दरोडा टाकून रक्कम चोरुन नेली होती. शहरात एटीएम फोडण्याचा सपाटा लावल्यामुळे पोलीस आयुक्त संदीप बिश्नोई,अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, यांनी  पोलिसांची चार पथके तयार केली होती. त्यावेळी पोलीस निरीक्षक विवेक मुंगळीकर,सहायक पोलीस निरीक्षक हरिष माने यांनी नाकाबंदी करून तपासणी सुरु केली. रात्रीच्यावेळी गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी तपास सुरु केला. सहायक पोलीस निरीक्षक हरिष माने यांना बातमीदाराकडून साळवे व कोकाटे रात्री गॅस कटर घेऊन जात असल्याची माहिती मिळताच त्या दोघांना पहिल्यांदा ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीस खाक्या दाखवताच त्यांनी टोळीतील इतर सदस्यांची नावे सांगितली. आरोपींची नावे उघड होताच हरिष माने यांच्या पथकाने हरियनात माग काढण्याचे ठरविले. वरिष्ठांची परवानगी घेत थेट हरियणा गाठले. पूर्वी एका तपासामध्ये हरियणा राज्यात हे पथक गेले असल्यामुळे हा तपास सोपा जाईल असे वाटत होते. मात्र, हे चोर हुशार होते. हातावर तुरी ठेवून पळून जात होते. दहा दिवसानंतर स्थानिक आरोपीला बरोबर घेऊन फोनवर टोळीच्या मोरख्याचा माग काढला. दिल्ली विमानतळावर येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून दिल्ली विमानतळावर अझरद्दीन हुसेन सह सर्फुद्दीन हसीम,महमंद शाकिर महमंद (४३) याला अटक केली. यांना वाकड पोलिसांचे पथक पिंपरी-चिंचवडमध्ये घेऊन आले. गौतम किसन जाधव (३८,रा. थेरगाव) याला अटक केली.
या कारवाईत सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत मोहिते,सहायक पोलीस निरीक्षक सिद्धार्थ बाबर,पोलीस हवालदार बापू धुमाळ, नितीन ढोरजे,बिभिषन कन्हेरकर,जावेद पठाण, प्रमोद भांडवलकर, रमेश गायकवाड,सुरेश भोसले, विक्रम जगदाळे, प्रमोद कदम, विक्रम कुदळे, विजय गंभीरे,तात्यासाहेब शिंदे, सुरेज सुतार, नुतन कोंडे यांनी सहभाग घेत तपासाचा छडा लावला. पोलिसांच्या नाकात दम आणणाऱ्या आरोपींना पोलिसांनी आपले स्वत:चे कौशल्य वापरून आरोपींना बेड्या घातल्या. त्यांच्याकडून शहरातील आठ आणि गुरुग्राममधील आठ गुन्हे उघडकीस आणले. या टोळीतील अन्य आरोपींचा ही पोलिस शोध घेत आहे. 

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget