जाहिरातींचा खर्च अनुदानासाठी वापरा, गॅस दरवाढ मागे घ्या.....विशाल वाकडकर


गॅस दरवाढीचा युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध  
पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क
) युपीए सरकारच्या काळात 410 रुपयांना मिळणा-या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत भाजप सरकारने दुप्पटीहून जास्त केली. महिलांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे नाटक करणारी उज्ज्वला गॅस योजनेची हजारो कोटी रुपयांची जाहिरात केली. या जाहिरातीवर झालेला खर्च अनुदानासाठी वापरला असता तरी गॅस दरवाढ करण्याची गरज पडली नसती. देशभर उद्योग, व्यवसाय ठप्प झाले असून बेरोजगारीने नागरिक हवालदिल झाले आहेत. त्यात गॅस दरवाढ म्हणजे नागरिकांना महागाईच्या खाईत लोटण्याचा प्रकार आहे. ही दरवाढ मागे घ्यावी अन्यथा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस राज्यभर रस्त्यावर उतरुन केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करील. असा इशारा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी दिला.
        गुरुवारी (दि. 20) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने गॅस दरवाढ विरोधात पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व वाकडकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला राष्ट्रवादी शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांनी चुलीवर भाकरी बनवून निषेध व्यक्त केला. यावेळी ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष विजय लोखंडे, फजल शेख, युवक राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, माजी नगरसेवक उत्तम हिरवे, राष्ट्रवादी श्रमिक कामगार संघटना (महिला) प्रदेश अध्यक्षा मीनाताई मोहिते, सामाजिक न्याय अध्यक्ष विनोद कांबळे, युवक उपाध्यक्ष अलोक गायकवाड, जेष्ठ नागरिक सेल अध्यक्ष यतिन पारेख, रशिद सय्यद, अमोल पाटील, भागवत जवळकर, शादाब खान, निखिल दळवी, राजेंद्र थोरात, निलेश निकाळजे, प्रतिक साळुंखे, चंद्रकांत जाधव, सनी डहाळे, अकबर मुल्ला, बाळासाहेब पिल्लेवार, नाना धेंडे, संजय औसरमल, सुलेमान शेख, जहीर खान, अशोक भडकुंबे, चेतन फेंगसे, रमनजितसिंग कोहली, अक्षय माचरे, धनंजय जगताप, सरफराज शेख, विजय गायकवाड, सनी काळे, गोरोबा गुजर, सुनिल अडागळे आदी उपस्थित होते.

Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget