पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):
गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध व्हावे यासाठी प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून राज्यात “शिवभोजन”योजनेची अंमलबजावणी सुरु झाली. ११ फेब्रुवारी २०२० रोजी योजनेच्या अंमलबजावणीला १७ दिवस पुर्ण झाले. या १७ दिवसांच्या काळात राज्यात २ लाख ३३ हजार ७३८ नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला आहे.तर पिंपरीचिंचवड शहरामध्ये ही प्रतिसाद मिळाला असल्याचे सुरेश ढवळे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कल्पनेतून साकार झालेल्या “शिवभोजन योजने”ला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रजासत्ताकदिनी योजना सुरु झाल्यानंतर पहिल्या आठ दिवसांच्या कालावधीतच म्हणजे २ फेब्रुवारी २०२० पर्यंतच शिवभोजन थाळीचा लाभ घेणाऱ्यांची संख्या १ लाखांहून अधिक (१ लाख ५ हजार ८८७) झाली होती. आता ११ फेब्रुवारीपर्यंत त्यात आणखी एक लाखांहून अधिक लाभार्थ्यांची वाढ झाली आहे.
“शिवभोजन” योजनेचा लाभ सुट्टीच्या दिवशीही घ्यावा
ही योजना सुरू केल्यापासून पिंपरी चिंचवड शहरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे “शिवभोजन”योजनेचा लाभ सुट्टीच्या दिवशीही घ्यावा असे आव्हान सुरेश ढवळे यांनी केले.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.