पुरुष संघात "कॅलिस्टो मी पुन्हा येईन" व महिला संघात "डायनॅस्टी डेअरड्रीमर्स" हे संघ वाकड प्रीमियर लीग सिझन ३ चे मानकरी
पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):
विनायकदादा गायकवाड युथ फाऊंडेशन आयोजित वाकड प्रीमियर लीगच्या क्रिकेट सामन्यांची आज उत्साहात सांगता झाली. २ महिने चालू असलेल्या या सामन्यांमध्ये वाकड व आजूबाजूच्या सर्व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते. या सामन्यांकरिता पुरुषांचे ९८ संघ व स्त्रियांचे २३संघ असे मिळून एकूण १२३ संघ सहभागी झालेले होते. आज अंतिम फेरी होत असताना हे सामने पाहण्याकरिता या परिसरातील ज्येष्ठ, महिला व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्तीथ होते. या सिझन ३ चे महिला संघाचे प्रथम पारितोषिक डायनॅस्टी या सोसायटीने पटकावले तर व्दितीय पारितोषिक अक्षय टॉवर व तृतीय पारितोषिक कास्प काऊंटी या सोसायटीने पटकाविले. पुरुष संघाचे प्रथम पारितोषिक कॅलिस्टो सोसायटी तर व्दितीय पारितोषिक अक्षय टॉवर व तृतीय पारितोषिक कावेरीनगर क्रिकेट क्लब या संघाने पटकाविले. स्थायी समितीच्या मा.अध्यक्षा ममताताई विनायक गायकवाड, रुबरु मिस्टर इंडिया श्रीकांत द्विवेदी यांच्या हस्ते विजयी संघाना चषक प्रदान करण्यात आला. यावेळी अनेक संघाच्या सभासदांनी आपल्या भावना व कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी स्थायी समितीच्या मा.अध्यक्षा ममताताई विनायक गायकवाड म्हणाल्या कि "मी सर्वप्रथम आदरणीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप, विनायक गायकवाड यांच्यातर्फे वाकड प्रीमियर लीगच्या सर्व विजयी संघाचे अभिनंदन व बाकी सर्व सहभागी टीमचे आभार मानते कि आपण सर्वानी एकत्र येऊन हि स्पर्धा यशस्वी केली. आपण सार्व ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी व सोसायटी सभासद मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झालात यातच वाकड प्रीमियर लीगचे यश आहे. "
यावेळी स्थायी समितीच्या मा.अध्यक्षा ममताताई विनायक गायकवाड, रुबरु मिस्टर इंडिया श्रीकांत द्विवेदी, सचिन कुंदोजवार, पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे सभासद व आजूबाजूच्या सोसायटीमधील सभासद मोठ्या संख्येने उपस्तिथ होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.