करवाढीच्या विषयांवरून महासभेत गोंधळाचे वातावरण: गोधळात उपसूचनासह विषयांना महासभेत मंजुरी: नागरिकांनी ज्यादा कर का भरावा: नगरसेवकांचा सवालपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):- करवाढीच्या संदर्भात शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे यांना बोलण्यास संधी न दिल्याने, त्यांनी काचेच ग्लास फोडून महापौराचा निषेध व्यक्त केल्यामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.त्या वातावरणात महापौर माई ढोरे यांनी विषय मंजूर करून सभा आटोपली. 
मात्र सभागृहात महिला महापौर असताना त्यांच्यासमोर असे गैरवर्तन केल्यामुळे भाजपा सत्ताधारी नगरसेविकानी कलाटे यांचा निषेध केला. कलाटे यांनी महापौरांची माफी मागावी अन्यथा त्यांना सभागृहात येऊ देणार नाही असा इशारा पक्षनेते नामदेव ढाके यांनी  दिला. 
पिंपरी-चिंचवड महापालिकेची 20 फेब्रुवारीची तहकूब सर्वसाधारण सभा बुधवारी (दि.26) घेण्यात आली. महापौर माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा घेण्यात आली. यावेळी विषयपत्रिकेमध्ये महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अनुसूचित ड प्रकरण 8 नियम 20 मधील तरतुदीनुसार करयोग्य मूल्यामध्ये दुरुस्ती करण्याचा विषय होता. शहरातील 2007 पूर्वीच्या जुन्या मालमत्तांच्या करात अडीच ते तीनपटीने वाढ होणार आहे. करयोग्यमूल्य पद्धतीत बदल केले आहेत. त्यानुसार आर्थिक वर्षांपासून म्हणजेच एक एप्रिल 2020 पासून नवीन करवाढ लागू होणार आहे. विषयपत्रिकेमध्ये क्रमाक दोन ला हा विषय घेण्यात आला होता. या विषयावर अनेक नगरसेवकांनी विरोध नोंदवत आपले मत व्यक्त केले. शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे यांना या विषयावर बोलू न दिल्याने त्यांनी निषेध म्हणून काचेचा ग्लास फोडला आणि सभागृहात एकच गोंधळ उडाला. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांसह नगरसेविकांनी विषयपत्रिका फाडून त्या उधळवत निषेध केला. करवाढीच्या विषयामध्ये आयुक्तांनी महापौर, गटनेत्यांसह नगरसेवकांना विश्वासात घेणे गरजेचे होते. करवाढ करून शहराचा असा काय विकास केला जाणार आहे. दिवसाआढ नागरीकांना पाणी देऊनही पाणीपट्टी वाढवली आहे. काही प्रभागामध्ये विकासकामे झालेली नाहीत, किवा त्यांना पाहिजे त्या सुविधाही मिळाल्या जात नाहीत, मग त्या नागरिकांनी ज्यादा कर का भरावा असा सवाल दत्ता सानेसह नगरसेवकांनी विचारला. तत्कालीन सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, संदीप वाघेरे, अजित गव्हाणे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता काका साने, शत्रुघ्न बापू काटे यांच्यासह नगरसेविका सीमा सावळे, आशा शेंडगे तसेच शिवसेनेच्या नगरसेविका मीनल यादव यांनी विरोध करत आपले मत व्यक्त केले. या विषयावर गटनेते राहूल कलाटे यांना मत व्यक्त करायचे होते, मात्र महापौरांनी बोलण्यास संधी न दिल्याने त्यांनी काचेचा ग्लास फोडून निषेध केला. या प्रकरणामुळे सभागृहात चांगलाच गदारोळ झाला.
पहिल्या सभेपासून त्यांनी मला टार्गेट केलं-राहुल कलाटे

 माई आमच्या आईसमान आहेत, मात्र त्या महिला महापौर असल्याचा गैरफायदा घेत आहेत. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सांगण्यावरून माई सभागृह चालवत आहेत. पहिल्या सभेपासून त्यांनी मला टार्गेट करत आहेत. इतर सदस्यांना बोलू दिले जाते आणि मला जाणीवपूर्वक बोलू दिले जात नाही. महिला महापौरांवर ग्लास फेकून मारण्या इतपत आपण वेडे नाहीत. चुकीची करवाढ, रोडस्वीपरची निविदा, सभागृहात मानदंडासमोर केलेले फर्निचर, एकाच प्रभागात दोन सदस्य निवड आणि यावरू सत्ताधारी नगरसेवकांतील नाराजी हे सर्व लपवण्यासाठी सभागृहात गोंधळ केला. त्यांच्या चुका लपविण्यासाठी माझा निषेध करत घोषणाबाजी करत आहेत. मात्र याबाबत वरीष्ठांकडे आपण तक्रार करणार असल्याचे राहूल कलाटे यांनी सांगितले.
कलाटे यांनी माफी मागावी -महापौर उषा उर्फ माई ढोरे 
 प्रत्येकवेळी राहूल कलाटे यांना बोलण्याची संधी देते. आज त्यांना बोलू दिले. त्यानंतर हातही वर केले नाही आणि अचानक पाणी पिताना ग्लास आपल्या दिशेने फिरकावून फोडत गोंधळ घातला. कलाटे यांचे वर्तन असभ्य असून, त्यांच्यावर योग्य कारवाई करावी अशी मागणी पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी केली आहे. त्यानुसार कलाटे यांनी माफी मागावी अन्यथा त्यांना सभागृहात येऊ दिले जाणार नाही. मला राहूल कलाटे आईसमान मानतात मग माफी मागण्यास कमीपणा कसला. 
राहूल कलाटे कारवाई होणे अपेक्षित -पक्षनेते नामदेव ढाके, 
राहूल कलाटे हे शिवसेनेचे गटनेते आहेत, त्यांनी महिला महापौरांचा अपमान करणे त्यांना शोभते का? त्यांनी महापौरांवर ग्लास भिरकावून फोडणे त्यांचे चुकीचे वर्तन असून, त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे.
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget