पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क): महाविकासआघाडीच्या सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवडमधील नगरसेवकांच्या जीविताला धोका आहे. शरद पवार अजित पवारांचे निकटवर्तीय नगरसेवक दत्ता साने पोलीस आयुक्तालयासमोर न्यायासाठी आंदोलन करणार आहेत.
7 जून 2019ला साने यांच्या कार्यलयावर सशस्त्र हल्ला झाला होता. त्यातील सहा आरोपी नुकतेच जामिनावर सुटले आहेत. त्यांच्यापासून आणि हल्ल्याच्या सुत्रधारापासून जीविताला धोका असल्याचं साने म्हणणे आहे. म्हणूनच ते स्वतःच्याच सरकारमध्ये असुरक्षित असल्याचं म्हणाले. शिवाय गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री गांभीर्याने घेत नसल्याचं साने यांनी जाहीर सांगितले. म्हणूनच न्यायासाठी उपोषण करण्याची वेळ त्यांच्यावर आली असल्याचे दत्ता साने यांनी सांगितले .
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.