February 2020


पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क)
पिंपरी चिंचवडमध्ये मिसाईलच्या बुलेट आढळल्या आहेत. लष्कराच्या हद्दीतून या बुलेट बाहेर कशा काय आल्या? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला. एकूण चार मिसाईल बुलेट असून त्या गंजलेल्या अवस्थेत आहेत, त्यात कोणताही दारुगोळा नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. चाफेकर चौकातील भंगाराच्या दुकानाशेजारी या मिसाईल बुलेट आढळल्या. या बुलेट कोणत्या भंगार मालकाने, कोठून, कोणाकडून आणि कधी विकत घेतल्या याचा तपास चिंचवड पोलीस करत आहेत. पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क): महाविकासआघाडीच्या सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवडमधील  नगरसेवकांच्या जीविताला धोका आहे. शरद पवार अजित पवारांचे निकटवर्तीय नगरसेवक दत्ता साने पोलीस आयुक्तालयासमोर न्यायासाठी आंदोलन करणार आहेत. 
7 जून 2019ला साने यांच्या कार्यलयावर सशस्त्र हल्ला झाला होता. त्यातील सहा आरोपी नुकतेच जामिनावर सुटले आहेत. त्यांच्यापासून आणि हल्ल्याच्या सुत्रधारापासून जीविताला धोका असल्याचं साने म्हणणे आहे. म्हणूनच ते स्वतःच्याच सरकारमध्ये असुरक्षित असल्याचं म्हणाले. शिवाय गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री गांभीर्याने घेत नसल्याचं साने यांनी जाहीर सांगितले. म्हणूनच न्यायासाठी उपोषण करण्याची वेळ त्यांच्यावर आली असल्याचे दत्ता साने यांनी सांगितले .

पिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क):
पिंपरी-चिंचवड झपाट्याने वाढत चालले आहे. वाढत्या शहराबरोबर गुन्हेगारी ही वाढली आहे. एटीएम फोडणाऱ्या गुन्हेगारांनी तर शहरात हौदोस घातला होता. एटीएमची स्थानिकांच्या मदतीने रेकी करून थेट एटीएम फोडण्याचा विक्रमच त्यांनी केला होता. पोलिसांच्या नाकात दम आणाला होता. परंतु, वाकड पोलिसांनी आपले कौशल्य वापरून थेट या अंतरराज्य टोळीच्या मुसक्या आवळण्याचा  चंग बांधला. आणि त्या प्रमाणे तपास करून गल्लीतील अनेक एटीएम फोडलेल्या चोरांना दिल्लीत पकडून डायरेक जेलमध्ये धाडले.
पिंपरी-चिंचवड शहर श्रीमंत म्हणून ओळखले जात आहे. श्रीमंत शहरात विविध बँकाची एटीएम ही शहरात मोठ्या प्रमाणात आहे. त्याच एटीएमचा आंदाज घेऊन एटीएम मध्ये नागरिकांना पैसे काढून देतो असे सांगून फसवणूक करणार अझरुद्दीन ताहीर हुसेन (२९ हरियणा) याने व्यवसायच बदलला स्थानिक मित्र संदीप माणिक साळवे (४३, रा. जांबे, ता. मुळशी, जि. पुणे),दत्तात्रय रघूनाथ कोकाटे (४२, रा. थेरगाव) यांच्या मदतीने सर्फुद्दीन हसीम (२२,रा. हरीयाना) यांनी अंतरराजीय टोळी बनविली.
या टोळीचा मोरक्या अझरुद्दीन हुसेन हा साळवी आणि कोकाटे याच्या मदतीने शहरातील एटीएमच्या मदतीने रेकी करत होता. एटीएममध्ये जावून डजबिनमध्ये नोटां पॅकींग केलेल्या पांढऱ्या पट्यांचा आंदाज घेत होते. एटीएममध्ये त्या पांढऱ्या पट्ट्या डजबिनमध्ये मोठ्या प्रमाणात दिसताच त्याच एटीएमवर फिल्डींग लावून एटीएम मित्र्यांच्या मदतीने गॅस कटरच्या मदतीने फोडत होते. अझरुद्दीन हा विमानाने प्रवास करत होता तर बाकीची टोळी पैसे घेऊन मोटारीमधून हरियणाला जात होती. ही अंतराज्यातील टोळी तयार झाली होती. यांनी कोणाला ही खबर लागून दिली नव्हती. त्यांनी शहरात एटीएम फोडण्याचे सत्र सुरुच ठेवले होते. जणूकाही झटपट श्रीमंत होण्याचा त्यांना मार्गच मिळाला होता. तर त्यांचे स्थानिक मित्र त्यांच्या सपर्कात होते. त्यामुळे त्यांना सहज दरोडा पचविता येत होता. हे वर्षभर सत्र सुरु होते.
पिंपरी-चिंचवड शहरातील पोलिसांच्या नाकात या चोरट्यांनी दम आणला होता. वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत थेरगाव येथील एका एटीएमवर या टोळीने दरोडा टाकून रक्कम चोरुन नेली होती. शहरात एटीएम फोडण्याचा सपाटा लावल्यामुळे पोलीस आयुक्त संदीप बिश्नोई,अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, यांनी  पोलिसांची चार पथके तयार केली होती. त्यावेळी पोलीस निरीक्षक विवेक मुंगळीकर,सहायक पोलीस निरीक्षक हरिष माने यांनी नाकाबंदी करून तपासणी सुरु केली. रात्रीच्यावेळी गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी तपास सुरु केला. सहायक पोलीस निरीक्षक हरिष माने यांना बातमीदाराकडून साळवे व कोकाटे रात्री गॅस कटर घेऊन जात असल्याची माहिती मिळताच त्या दोघांना पहिल्यांदा ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीस खाक्या दाखवताच त्यांनी टोळीतील इतर सदस्यांची नावे सांगितली. आरोपींची नावे उघड होताच हरिष माने यांच्या पथकाने हरियनात माग काढण्याचे ठरविले. वरिष्ठांची परवानगी घेत थेट हरियणा गाठले. पूर्वी एका तपासामध्ये हरियणा राज्यात हे पथक गेले असल्यामुळे हा तपास सोपा जाईल असे वाटत होते. मात्र, हे चोर हुशार होते. हातावर तुरी ठेवून पळून जात होते. दहा दिवसानंतर स्थानिक आरोपीला बरोबर घेऊन फोनवर टोळीच्या मोरख्याचा माग काढला. दिल्ली विमानतळावर येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून दिल्ली विमानतळावर अझरद्दीन हुसेन सह सर्फुद्दीन हसीम,महमंद शाकिर महमंद (४३) याला अटक केली. यांना वाकड पोलिसांचे पथक पिंपरी-चिंचवडमध्ये घेऊन आले. गौतम किसन जाधव (३८,रा. थेरगाव) याला अटक केली.
या कारवाईत सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत मोहिते,सहायक पोलीस निरीक्षक सिद्धार्थ बाबर,पोलीस हवालदार बापू धुमाळ, नितीन ढोरजे,बिभिषन कन्हेरकर,जावेद पठाण, प्रमोद भांडवलकर, रमेश गायकवाड,सुरेश भोसले, विक्रम जगदाळे, प्रमोद कदम, विक्रम कुदळे, विजय गंभीरे,तात्यासाहेब शिंदे, सुरेज सुतार, नुतन कोंडे यांनी सहभाग घेत तपासाचा छडा लावला. पोलिसांच्या नाकात दम आणणाऱ्या आरोपींना पोलिसांनी आपले स्वत:चे कौशल्य वापरून आरोपींना बेड्या घातल्या. त्यांच्याकडून शहरातील आठ आणि गुरुग्राममधील आठ गुन्हे उघडकीस आणले. या टोळीतील अन्य आरोपींचा ही पोलिस शोध घेत आहे. पुणे, (टाईम न्युजलाईन नेटवर्क): औद्योगिक क्षेत्रांसाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा गतीने उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांनी केल्या.

     जिल्हा उद्योग मित्र समिती सभा साहेबराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी अविनाश हदगल व प्रादेशिक अधिकारी संजीव देशमुख, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक पी. डी. रेंदाळकर तसेच समितीचे शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते.

गायकवाड म्हणाले, औद्योगिक क्षेत्रासाठी आरोग्य, वीज, पाणी तसेच अंतर्गत रस्ते, फायर फायटिंग आदी सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करुन द्याव्यात. महिला कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अंतर्गत रस्त्यांवर बसेसची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी. कामगारांच्या दवाखान्यात (ईएसआय) त्यांना मोफत आरोग्य सुविधा द्यावी, असेही श्री. गायकवाड यांनी सांगितले.

स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी सकाळी व सायंकाळी बस सुरू करावी

पिंपरी चिंचवड एमआयडीसी मध्ये बस थांब्याचे अंतर अधिक आहे. स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी सकाळी व सायंकाळी कंपनीची शिफ्ट सुटण्याच्या वेळी एमआयडीसी च्या अंतर्गत रस्त्यांवर पीएमपीएमएल च्या बसेस तात्काळ सुरु कराव्यात, अशा सूचना यावेळी अविनाश हदगल यांनी दिल्या.

एमआयडीसी परिसरातील वीज पुरवठा वारंवार खंडित करण्यात येवू नये, या परिसरातील रस्त्यांची व अंतर्गत रस्त्यांची कामे जलदगतीने करावीत, कामगारांना ईएसआयसी दवाखान्यात आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, बीएसएनएल व इंटरनेट सुविधा पुरवावी, पाणीपुरवठा करावा, फायर फायटिंग स्टेशन उभारावे, आदी मागण्या समिती सदस्यांनी मांडल्या.पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):- करवाढीच्या संदर्भात शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे यांना बोलण्यास संधी न दिल्याने, त्यांनी काचेच ग्लास फोडून महापौराचा निषेध व्यक्त केल्यामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.त्या वातावरणात महापौर माई ढोरे यांनी विषय मंजूर करून सभा आटोपली. 
मात्र सभागृहात महिला महापौर असताना त्यांच्यासमोर असे गैरवर्तन केल्यामुळे भाजपा सत्ताधारी नगरसेविकानी कलाटे यांचा निषेध केला. कलाटे यांनी महापौरांची माफी मागावी अन्यथा त्यांना सभागृहात येऊ देणार नाही असा इशारा पक्षनेते नामदेव ढाके यांनी  दिला. 
पिंपरी-चिंचवड महापालिकेची 20 फेब्रुवारीची तहकूब सर्वसाधारण सभा बुधवारी (दि.26) घेण्यात आली. महापौर माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा घेण्यात आली. यावेळी विषयपत्रिकेमध्ये महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अनुसूचित ड प्रकरण 8 नियम 20 मधील तरतुदीनुसार करयोग्य मूल्यामध्ये दुरुस्ती करण्याचा विषय होता. शहरातील 2007 पूर्वीच्या जुन्या मालमत्तांच्या करात अडीच ते तीनपटीने वाढ होणार आहे. करयोग्यमूल्य पद्धतीत बदल केले आहेत. त्यानुसार आर्थिक वर्षांपासून म्हणजेच एक एप्रिल 2020 पासून नवीन करवाढ लागू होणार आहे. विषयपत्रिकेमध्ये क्रमाक दोन ला हा विषय घेण्यात आला होता. या विषयावर अनेक नगरसेवकांनी विरोध नोंदवत आपले मत व्यक्त केले. शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे यांना या विषयावर बोलू न दिल्याने त्यांनी निषेध म्हणून काचेचा ग्लास फोडला आणि सभागृहात एकच गोंधळ उडाला. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांसह नगरसेविकांनी विषयपत्रिका फाडून त्या उधळवत निषेध केला. करवाढीच्या विषयामध्ये आयुक्तांनी महापौर, गटनेत्यांसह नगरसेवकांना विश्वासात घेणे गरजेचे होते. करवाढ करून शहराचा असा काय विकास केला जाणार आहे. दिवसाआढ नागरीकांना पाणी देऊनही पाणीपट्टी वाढवली आहे. काही प्रभागामध्ये विकासकामे झालेली नाहीत, किवा त्यांना पाहिजे त्या सुविधाही मिळाल्या जात नाहीत, मग त्या नागरिकांनी ज्यादा कर का भरावा असा सवाल दत्ता सानेसह नगरसेवकांनी विचारला. तत्कालीन सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, संदीप वाघेरे, अजित गव्हाणे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता काका साने, शत्रुघ्न बापू काटे यांच्यासह नगरसेविका सीमा सावळे, आशा शेंडगे तसेच शिवसेनेच्या नगरसेविका मीनल यादव यांनी विरोध करत आपले मत व्यक्त केले. या विषयावर गटनेते राहूल कलाटे यांना मत व्यक्त करायचे होते, मात्र महापौरांनी बोलण्यास संधी न दिल्याने त्यांनी काचेचा ग्लास फोडून निषेध केला. या प्रकरणामुळे सभागृहात चांगलाच गदारोळ झाला.
पहिल्या सभेपासून त्यांनी मला टार्गेट केलं-राहुल कलाटे

 माई आमच्या आईसमान आहेत, मात्र त्या महिला महापौर असल्याचा गैरफायदा घेत आहेत. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सांगण्यावरून माई सभागृह चालवत आहेत. पहिल्या सभेपासून त्यांनी मला टार्गेट करत आहेत. इतर सदस्यांना बोलू दिले जाते आणि मला जाणीवपूर्वक बोलू दिले जात नाही. महिला महापौरांवर ग्लास फेकून मारण्या इतपत आपण वेडे नाहीत. चुकीची करवाढ, रोडस्वीपरची निविदा, सभागृहात मानदंडासमोर केलेले फर्निचर, एकाच प्रभागात दोन सदस्य निवड आणि यावरू सत्ताधारी नगरसेवकांतील नाराजी हे सर्व लपवण्यासाठी सभागृहात गोंधळ केला. त्यांच्या चुका लपविण्यासाठी माझा निषेध करत घोषणाबाजी करत आहेत. मात्र याबाबत वरीष्ठांकडे आपण तक्रार करणार असल्याचे राहूल कलाटे यांनी सांगितले.
कलाटे यांनी माफी मागावी -महापौर उषा उर्फ माई ढोरे 
 प्रत्येकवेळी राहूल कलाटे यांना बोलण्याची संधी देते. आज त्यांना बोलू दिले. त्यानंतर हातही वर केले नाही आणि अचानक पाणी पिताना ग्लास आपल्या दिशेने फिरकावून फोडत गोंधळ घातला. कलाटे यांचे वर्तन असभ्य असून, त्यांच्यावर योग्य कारवाई करावी अशी मागणी पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी केली आहे. त्यानुसार कलाटे यांनी माफी मागावी अन्यथा त्यांना सभागृहात येऊ दिले जाणार नाही. मला राहूल कलाटे आईसमान मानतात मग माफी मागण्यास कमीपणा कसला. 
राहूल कलाटे कारवाई होणे अपेक्षित -पक्षनेते नामदेव ढाके, 
राहूल कलाटे हे शिवसेनेचे गटनेते आहेत, त्यांनी महिला महापौरांचा अपमान करणे त्यांना शोभते का? त्यांनी महापौरांवर ग्लास भिरकावून फोडणे त्यांचे चुकीचे वर्तन असून, त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे.पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):
पिंपरीचिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यपदी सुवर्णा बुर्डे,भीमाबाई फुगे,अंबरनाथ कांबळे,संतोष कांबळे,अभिषेक बारणे, यांची 
वर्णी लागली आहे.


पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):
पिंपरी चिंचवडमध्ये चोरट्याने अवघ्या तीन सेकंदात दुकानाचे शटर उघडून रोकड लंपास केली. देहूरोडमध्ये घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. दुकानात मदतीसाठी ठेवलेली दानपेटीवर चोरट्यांनी डल्ला मारला. रविवारच्या पहाटे हा प्रकार समोर आला. दोन दुचाकीवर आलेल्या चोरट्यांपैकी दोघांनी हातानेच हे शटर उचकटले. अवघ्या तीन सेकंदात हातानेच शटरचे लॉक तुटले यावरून शटर किती हलक्या दर्जाचे आहे, हे स्पष्ट होतं आहे. या चोरट्यांनी याचाच फायदा घेतला. अन्य दोन दुकानं चोरट्यांनी फोडली पण रोकड नसल्याने तिथून त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. देहूरोड पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे या चोरट्यांचा शोध घेत आहे.


गॅस दरवाढीचा युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध  
पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क
) युपीए सरकारच्या काळात 410 रुपयांना मिळणा-या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत भाजप सरकारने दुप्पटीहून जास्त केली. महिलांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे नाटक करणारी उज्ज्वला गॅस योजनेची हजारो कोटी रुपयांची जाहिरात केली. या जाहिरातीवर झालेला खर्च अनुदानासाठी वापरला असता तरी गॅस दरवाढ करण्याची गरज पडली नसती. देशभर उद्योग, व्यवसाय ठप्प झाले असून बेरोजगारीने नागरिक हवालदिल झाले आहेत. त्यात गॅस दरवाढ म्हणजे नागरिकांना महागाईच्या खाईत लोटण्याचा प्रकार आहे. ही दरवाढ मागे घ्यावी अन्यथा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस राज्यभर रस्त्यावर उतरुन केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करील. असा इशारा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी दिला.
        गुरुवारी (दि. 20) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने गॅस दरवाढ विरोधात पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व वाकडकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला राष्ट्रवादी शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांनी चुलीवर भाकरी बनवून निषेध व्यक्त केला. यावेळी ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष विजय लोखंडे, फजल शेख, युवक राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, माजी नगरसेवक उत्तम हिरवे, राष्ट्रवादी श्रमिक कामगार संघटना (महिला) प्रदेश अध्यक्षा मीनाताई मोहिते, सामाजिक न्याय अध्यक्ष विनोद कांबळे, युवक उपाध्यक्ष अलोक गायकवाड, जेष्ठ नागरिक सेल अध्यक्ष यतिन पारेख, रशिद सय्यद, अमोल पाटील, भागवत जवळकर, शादाब खान, निखिल दळवी, राजेंद्र थोरात, निलेश निकाळजे, प्रतिक साळुंखे, चंद्रकांत जाधव, सनी डहाळे, अकबर मुल्ला, बाळासाहेब पिल्लेवार, नाना धेंडे, संजय औसरमल, सुलेमान शेख, जहीर खान, अशोक भडकुंबे, चेतन फेंगसे, रमनजितसिंग कोहली, अक्षय माचरे, धनंजय जगताप, सरफराज शेख, विजय गायकवाड, सनी काळे, गोरोबा गुजर, सुनिल अडागळे आदी उपस्थित होते.


पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क

) छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराला स्वत:ची करगंळी कापून रक्ताचा अभिषेक करुन स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. स्वराज्यात त्यांनी दिनदुबळ्यांना, कष्टकरी शेतक-यांना न्याय दिला. महाराजांनी त्यांच्या सैन्यात बहुजन, बारा बलुतेदार, अलुतेदार यांच्यासह मुस्लिमांना देखील सहभागी करुन घेतले होते. त्यांनी कधी जातीयवाद केला नाही. छत्रपतींचे कार्य, कर्तृत्व समजून घेण्यासाठी त्यांचे जीवनचरित्र अभ्यासले पाहिजे असे मार्गदर्शन माजी नगरसेक मारुती भापकर यांनी केले.
        हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिंपरीतील महात्मा फुले पुतळा येथे विविध सामाजिक संघटनांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात भापकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे होते. यावेळी माजी नगरसेवक प्रताप लोके, मानव कांबळे, आनंदा कुदळे, गिरीधारी लड्डा, प्रताप गुरव, सुरेश गायकवाड, संतोष जोगदंड, विशाल जाधव, हणुमंत माळी, काळुराम गायकवाड, इंदू घनवट, नंदा करे, बाळकृष्ण करे, गिरीष वाघमारे, विजय गिरमे, अनिल साळुंके, वैजनाथ शिरसाट, विलास गव्हाणे, अनिल ताजणे, दशरथ डोके, अरविंद दरवडे, लक्ष्मण घनवट, सुर्यकांत ताम्हाणे, बी.सी.राऊत, विश्वास राऊत, संजय बनसोडे, सुभाष जाधव, दिलीप काकडे, आप्पा गुब्याड, शोभित घाडगे, महादेव लामतुरे, विनायक कांबळे आदी उपस्थित होते.
       यावेळी महात्मा फुले यांच्या पुतळ्यास तसेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहु महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या संयोजनात नागरी हक्क सुरक्षा समिती, ओबीसी संघर्ष समिती, बारा बलूतेदार संघटना, महात्मा फुले जनसेवा मंडळ, सत्य शोधक ओबीसी परिषद, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, बहुजन हिताय - बहुजन सुखाय ग्रंथालय चळवळ, सम्यक विद्यार्थी चळवळ, महाराष्ट्र माळी महासंघ आदी संस्थांच्या पदाधिका-यांनी सहभाग घेतला होता.
      भापकर म्हणाले की, रायगडावर दुर्लक्षित असणारी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुले यांनी शोधली. पुण्यात येऊन 19 फेब्रुवारी 1669 रोजी दहा दिवसांची सार्वजनिक शिवजयंती गंज पेठेत सुरु केली. यावेळी लोकमान्य टिळक यांचे वय तेरा वर्ष होते. महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक शिवजयंतीला आणखी मोठे रुप दिले. सध्याच्या आधुनिक काळात जातीय, धार्मिक अस्मिता कमी होणे अपेक्षित असताना त्या जास्त टोकदार होत असल्याचे दिसते. सामाजिक व राजकीय कार्यकर्ते, पुढारी जोपर्यंत शब्दाला कृतीची जोड देत नाहीत तोपर्यंत परिवर्तन होणार नाही. राष्ट्र पुरुषांची जाती - धर्मात विभागणी करण्याऐवजी त्यांचे जीवन चरित्र अभ्यासून ते आचरणात आणावे असेही भापकर यांनी सांगितले.
     कार्यक्रमाचे अध्यक्ष मानव कांबळे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रातून प्रेरणा घेऊन अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राविरुध्द फिडेल कॅस्ट्रो याने बारा वर्षे लढा दिला. फिडेल कॅस्ट्रोचे राष्ट्र जागतिक नकाशावर दिसत देखील नाही, एवढे छोटे आहे. परंतू छत्रपतींच्या गनिमी काव्याचा अभ्यास करुन फिडेल कॅस्ट्रोने अमेरिकेला जेरीस आणले होते. देशातील 7/12 (सात बारा) उता-याचे निर्माण करते आणि शक करते छत्रपती शिवाजी महाराज आहेत असेही मानव कांबळे यांनी सांगितले.
   स्वागत, प्रास्ताविक आनंदा कुदळे, सुत्रसंचालन गिरीष वाघमारे आणि आभार विशाल जाधव यांनी मानले.
Mumbai(timenewsline network) Asserting that Mumbai is very important to South Africa, the newly appointed Consul General of South Africa in Mumbai Andrea Kuhn today said that her country is keen to establish direct air connectivity between Mumbai and Johannesburg. Stating that lots of Indian companies are investing in South Africa and that more Indians are visiting South Africa, she said direct air connectivity between the two financial capitals will prove mutually beneficial.
Andrea Kuhn was speaking to the Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai on Tuesday (18th Feb).
Recalling that Mahatma Gandhi had started his Satyagraha in South Africa, she said India had been a strong supporter of the struggle against apartheid. She told the Governor that South Africa is now a member of BRICS and other international bodies and was currently heading the African Union. She said the Indian Diaspora in South Africa is making handsome contribution in all walks of life in her country.
Welcoming the Consul General to Maharashtra, Governor Koshyari told her that he will take up the matter of establishing direct air connectivity between Mumbai and Johannesburg with the Central Government


            पुणे,(टाईम न्युजलाईन नेटवर्क):  यह मेरी सरकार है, यहीं
भावना गरीब, वंचित लोगों के मन में निर्माण होना चाहिए। छत्रपति शिवाजी महाराज के विचारों की विरासत आगे ले जाने के लिए सरकार कटिबध्द रहेगी, यह विश्वास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ने इस दौरान व्यक्त किया।
            शहनाई, बाजे की मधुर गूंज, गर्जना, ढोल-ताशे-नगाड़े की आवाज,  केशरी ध्वज (पताका), 'जय भवानी, जय शिवाजी', 'छत्रपति शिवाजी महाराज की जय' के जयघोष से बड़े उत्साह के माहौल में मुख्यमंत्री उद्धव ठाकरे और उप मुख्य मंत्री अजित पवार की उपस्थिति में शिवजन्मोत्सव शिवनेरी किले पर उत्साह से मनाया गया, इस दौरान आयोजित कार्यक्रम में वे बोल रहे थे।
             कार्यक्रम में प्रमुखता से खाद्य एवं नागरी आपूर्ति मंत्री छगन भुजबल, सार्वजनिक निर्माणकार्य राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, सूचना एवं जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे, सांसद डॉ. अमोल कोल्हे, विधायक अतुल बेनके उपस्थित थे।
            मुख्यमंत्री ठाकरे ने आगे कहा कि हम सभी के मन में शिवविचार है।  माँसाहेब जिजाऊ और छत्रपति शिवाजी महाराज के विचार, उनकी प्रेरणा हमारे साथ हमेशा रहें यह भावना उन्होंने इस दौरान व्यक्त की। शिवनेरी हमारा वैभव है। इस वैभव की विरासत के संवर्धन के लिए और इसे आगे ले जाने के लिए आवश्यक वह सभी प्रयास किए जाएंगे, यह आश्वासन उन्होंने इस दौरान दिया।
            कार्यक्रम में उपमुख्यमंत्री अजित पवार ने कहा कि छत्रपति शिवाजी महाराज ने सभी समाज के विकास की दिशा बताई। इसी दिशा में सरकार काम कर रही है। शिवनेरी परिसर का विकास आर्थिक प्रावधान की कमी के चलते लंबित न रह सके, इस पर ध्यान दिया जा रहा है। उन्होंने कहा कि परिसर के विकास कामों के लिए जल्द से जल्द 23 करोड़ रूपए उपलब्ध कराए जाएंगे।
           उन्होंने कहा कि मराठा आरक्षण के समय जो मामले दाखिल हुए है, उसे कानून की कसौटी पर जांच के उन मामलों को वापिस लेने के लिए प्रयास किए जाएंगे। जिन मामलों में सरकारी संपत्ति तथा सार्वजनिक संपत्ति की हानी नहीं हुई है, उन मामलों को नियमों के अधीन रहते हुए वापस लिए जाएंगे,  इस बात को उन्होंने इस दौरान स्पष्ट किया।
          कार्यक्रम के शुरुआत में शिवजन्मस्थान पर महिलाओं ने पारंपरिक वेषभूषा में शिवराय के महत्व जिसमें है, वह लोरी सुनाई। उसके बाद पुलिस टीम  ने बंदुक की तीन फेरी हवां चलाते हुए छत्रपति शिवराय को मानवंदना दी। उसके बाद मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री पवार ने बालशिवाजी और माँ जिजाऊं की प्रतिमा पर पुष्पहार अर्पित किया।  
          कार्यक्रम में विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विशेष पुलिस महानिरीक्षक सुहास वारके, जिलाधिकारी नवल किशोर राम, जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिला पुलिस अधीक्षक संदीप पाटील समेत बड़ी संख्या में शिवभक्त उपस्थित थे।            पुणे,(टाईम न्युजलाईन नेटवर्क): गोरगरिबांच्या मनात हे माझं सरकार आहे,अशी भावना निर्माण झाली पाहिजेछत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी शासन कटिबद्ध राहीलअसा विश्वास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला.
            सनई-चौघड्यांचे मंजूळ स्वरतुतारींच्या  गगनभेदी गर्जना,ढोल-ताशांचा निनाद,  भगव्या पताका, 'जय भवानीजय शिवाजी', 'छत्रपती शिवाजी महाराज की जय'चा जयघोष अशा आनंदमयी वातावरणात आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव किल्ले शिवनेरीवर उत्साहात साजरा झालात्यावेळी मुख्यमंत्री बोलत होतेकार्यक्रमास अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळसार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणेमाहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरेखासदार डॉ.अमोल कोल्हेआमदार अतुल बेनके यांची प्रमुख उपस्थिती होती.
            मुख्यमंत्री ठाकरे म्हणालेआमच्या प्रत्येकाच्या ह्रदयात शिवविचार आहेजिजाऊ माँसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे तेजप्रेरणा आपल्या पाठिशी असणे आवश्यक आहेशिवनेरी आपले वैभव आहेया वैभवाचा वारसा जतन करण्यासाठी आणि हा वारसा पुढे नेण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातीलअसे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेछत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाच्या विकासाची दिशा दाखवलीशिवनेरी परिसराचा विकास आर्थिक तरतुदीअभावी प्रलंबित राहता कामा नयेयाची दक्षता राज्य शासन घेत आहेशिवनेरी परिसरातील विकास कामांसाठी तातडीने 23 कोटी रुपये उपलब्ध करून दिले जातील.
            मराठा आरक्षणाच्यावेळी दाखल झालेले गुन्हे कायद्याच्या चौकटीत राहून मागे घेण्यासाठी प्रयत्न केले जातीलज्या गुन्ह्यात शासकीय मालमत्ता किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले नाहीते गुन्हे नियमांच्या अधीन राहून मागे घेतले जातीलअसेही श्री.पवार यांनी स्पष्ट केले.
            प्रारंभी शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायिलात्यानंतर पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिलीमुख्यमंत्री उद्धव ठाकरेउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बालशिवाजी व जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.कार्यक्रमास विभागीय आयुक्त डॉदीपक म्हैसेकरविशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारकेजिल्हाधिकारी नवल किशोर रामजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसादजिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह असंख्य शिवभक्त उपस्थित होते.


मुळशी,, (टाईम न्यूजलाईन नेटवर्क): मुळशीत 45 ग्रामपंचायतच्या 2020 निवडणूक आरक्षण सोडतीवर हरकती अखेरच्या दिवशी शुक्रवारी पौड तहसील कचेरीच्या निवडणूक विभागात आल्या आहेत. चर्चेत आघाडीवर असलेल्या हिंजवडीचा हरकतीतही पहिला नंबर असून 7 हरकत अर्ज आले आहेत. घोटावडे, मारुंजी 2 व 3 नंबरवर आहे.  निवडणूक अधिकाऱ्यांची भूमिकेवर नाराजी व्यक्त झाली आहे. ठरवून व लोकांची मागणी धुडकावून स्वयंघोषित आकडेवारी संशयास्पद असल्याची भूमिका व नाराजी गावोगावीच्या लोकांनी व्यक्त केली.
 घोटावडेत 6 व मारुंजीत 3 जणांनी हरकत अर्ज दिले आहेत. माण, कासारआंबोली, अंबडवेट इथूनही 3 हरकत अर्ज तहसील कचेरीत दिले गेलेत. जांबे इथून 2, भोईनी, अकोले, दखणे, चाले, हाडशी या गावातील आरक्षण कार्यक्रमावरही ग्रामस्थांनी आक्षेप नोंदवले आहेत. हिंजवडीत दत्तात्रय ढमाले, सुनीता वाघमारे, सतीश मराठे, सचिन जांभुळकर, चंद्रकांत जांभुळकर,  संदीप साखरे, मयूर साखरे, गणेश जांभुळकर यांनी हरकत घेतली. मारुंजीत अंकुश राजाराम जगताप, गणपत जगताप, कपिल बुचडे यांनी वेगवेगळे 3 आक्षेप अर्ज दाखल केले आहेत. माण गावातून राज बहिरट, रवी बोडके, निखिल बोडके यांनी आक्षेप नोंदविला आहे. घोटावडे येथून किरण शेळके, राजेंद्र शिंदे, नितीन गोडांबे, रामदास लांडगे, संदीप खाणेकर, नथू मातेरे यांनी विरोध दर्शविला आहे. Mumbai,(timenewsline network): State government’s Maharashtra State Innovative Society is organizing ‘Maharashtra Startup Week’ to encourage youth and innovative entrepreneurs. Interested startups can visit www.msins.in/startup-week to participate or contact at email -team@msins.in or 022-35543099. The applicant can apply till March 1.  
Maharashtra State Innovative Society tries to create a supportive environment for entrepreneurship. It encourages new ideas, enables startups to create new employment opportunities, and tries for easy regulatory standards. ‘Maharashtra Startup Week’ has been organized for the same purpose. ‘Maharashtra Startup Week’ aims to bring innovation in government through innovative start-up products and services projects utilizing for the government.  Education, skill development, health services, assurance (clean energy, water, waste management , etc.) administration, and other sector-related startups can participate in this Startup Week. Department for Promotion of Industry and Internal Trade (DPIIT) approved startups can apply for this Startup week.
Maharashtra State Innovative Society has successfully organized Maharashtra Startup State till now. Startup Week has been organized this year also to encourage and strengthen the startup ecosystem. Winners of first and second Startup Week have worked with various government organizations, departments like National Health Mission, Maharashtra Pollution Control Board, MSEDCL, Rural Development Department, various corporations, and district offices.

0
- Health Minister Rajesh Tope
Mumbai, February 14:- As a measure of preparedness of the novel Corona Virus (nCoV) prevention and control, Quarantine (isolated wards) have been started at all the district hospitals and government medical colleges in the state. Presently 361 beds are available in 39 Quarantine in the state. Four people are under observation in the entire state which include two each in Mumbai and Pune. This information was given by Health Minister Mr Rajesh Tope here, today.
 Till February 14, a total of 31thousand 934 passengers were screened at the Mumbai International Airport. The information of those who returned from the affected areas is gathered through the regional surveys. Till date, 186 passengers have arrived in the state from the affected areas. Out of them, the follow-up of 14 days off125 passengers had been completed. Till date, 48 people were admitted to various quarantines in the state since January 18 after they complaint of mild symptoms of fever, cold and cough. Out of these, the samples of 47 had been found to be negative for Corona virus. The reports were received from the National Institute of virology (NIV), Pune. The report of one more person is expected tomorrow. Out of 48people admitted to various hospitals,44 were released from the hospital, the health minister added.पंप


Mumbai,(timenewsline network): Agriculture Minister Dadaji Bhuse had declared the initiative 'Krishi Mantri Ek Divas Shetavar' (agriculture minister's day at the farm) to understand farmers problems, at Nagpur on 7th February. Agriculture Minister has started the initiative just in week's time. He visited farmers at their farm of Valvade, Ajang-Vadel, Dodge and Malmatha and discussed with them about their problems. He also asked farmers if agriculture officer and assistant visits the village.
Agriculture Minister Shri. Bhuse has started an initiative 'Krishi Mantri Ek Divas Shetavar' to encourage farmers and solve their issues.  He has instructed agriculture Secretary and Commissioner to visit the village every two weeks and agriculture officer to visit once a week and communicate with farmers. Agriculture Minister Bhuse has instructed the department to give information on various agriculture schemes. He also discussed with farmers about crop management and productivity.
Agriculture Minister had declared the initiative at farmers award ceremony at Nagpur and it was brought in the effect from today. He met Shantaram Gavali, Valvade, Malegaon and communicated with him. He discussed their problems. He discussed with farmers about crop insurance scheme, onion farming. He also asked them if agriculture officer, assistant visits them or not. Shri. Bhise met farmers from Ajang-Vadel, Zodge and Malmatha villages and communicated with them.पुणे (टाईम न्युजलाईन नेटवर्क)
: देशाच्या आर्थिक सुरक्षेत आणि राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत भारतीय नौदलाची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज केले.
          लोणावळा येथील भारतीय नौदलाच्या आयएनएस शिवाजी या प्रशिक्षण संस्थेला आज राष्ट्रपती श्री कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती ध्वज (प्रेसिडेंट कलर) प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रपतींच्या सुविद्यपत्नी सविता कोविंद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, नौसेना अध्यक्ष एडमिरल करमबीर सिंह उपस्थित होते.
         राष्ट्रपती कोविंद म्हणाले, देशाची सागरी अर्थव्यवस्था  लोकांच्या हिताशी  जोडली जात आहे. बहुतांश व्यापार समुद्र मार्गाने केला जात आहे. केवळ राष्ट्रीय सुरक्षाच नव्हे तर  देशाच्या आर्थिक सुरक्षेत आणि राष्ट्रनिर्मितीच्या विस्तृत प्रक्रियेत भारतीय नौदलाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. नौदल हे आपल्या समुद्री सामर्थ्याचे प्रमुख साधन आहे. समुद्री सीमांचे संरक्षण करण्यासाठी तसेच व्यापारी मार्ग सुरक्षित करण्यासाठी आणि नागरी आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यात नौदलाच्या धाडशी कार्याचा  देशाला अभिमान आहे. भविष्यातही नौदलाच्या माध्यमातून निश्चितच गौरवास्पद कामगिरी घडेल, असा विश्वास श्री. कोविंद यांनी व्यक्ति केला.
          यावेळी आयएनएस शिवाजी प्रशिक्षण संस्थेचे अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर,  विद्यार्थी आणि इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                       पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):
गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध व्हावे यासाठी प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून राज्यात शिवभोजनयोजनेची अंमलबजावणी सुरु झाली. ११ फेब्रुवारी २०२० रोजी योजनेच्या अंमलबजावणीला  १७ दिवस पुर्ण झाले. या १७ दिवसांच्या काळात राज्यात २ लाख ३३ हजार ७३८ नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला आहे.तर पिंपरीचिंचवड शहरामध्ये ही प्रतिसाद मिळाला असल्याचे  सुरेश ढवळे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कल्पनेतून साकार झालेल्या शिवभोजन योजनेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रजासत्ताकदिनी योजना सुरु झाल्यानंतर पहिल्या आठ  दिवसांच्या कालावधीतच  म्हणजे २ फेब्रुवारी २०२० पर्यंतच शिवभोजन थाळीचा लाभ घेणाऱ्यांची संख्या १ लाखांहून अधिक (१ लाख ५ हजार ८८७)  झाली होती. आता ११ फेब्रुवारीपर्यंत त्यात आणखी एक लाखांहून अधिक लाभार्थ्यांची वाढ झाली आहे.
 शिवभोजन” योजनेचा लाभ सुट्टीच्या दिवशीही घ्यावा
ही योजना सुरू केल्यापासून पिंपरी चिंचवड शहरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे  शिवभोजनयोजनेचा लाभ सुट्टीच्या दिवशीही घ्यावा असे आव्हान सुरेश ढवळे यांनी केले.


पिंपरी(टाईम न्युजलाईन नेटवर्क):
पिंपरी चिंचवडमध्ये मेव्हण्याने दाजीची हत्या केल्याची घटना समोर आलीये. दाजीचे विवाहबाह्य संबंध असल्याने हत्या केल्याची कबुली मेव्हण्याने दिली. तो स्वतः पोलिसांकडे सुपूर्त झाला. भोसरीत मध्यरात्री ही घटना घडली. 
मोहन लेवडे असं मयताचे नाव होते तर विष्णू जगाडे असं आरोपीचे नाव आहे. विष्णूने कोयत्याने वार करत दाजीची हत्या केली आणि फोन करून याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर भोसरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

पुरुष संघात "कॅलिस्टो  मी पुन्हा येईन" व महिला संघात "डायनॅस्टी डेअरड्रीमर्स" हे संघ वाकड प्रीमियर लीग सिझन ३ चे मानकरी
पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):
विनायकदादा गायकवाड युथ फाऊंडेशन आयोजित वाकड प्रीमियर लीगच्या क्रिकेट सामन्यांची आज उत्साहात सांगता झाली. २ महिने चालू असलेल्या या सामन्यांमध्ये वाकड व आजूबाजूच्या सर्व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते. या सामन्यांकरिता पुरुषांचे ९८ संघ व स्त्रियांचे २३संघ असे मिळून एकूण १२३ संघ सहभागी झालेले होते. आज अंतिम फेरी होत असताना हे सामने पाहण्याकरिता या परिसरातील ज्येष्ठ, महिला व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्तीथ होते. या सिझन ३ चे महिला संघाचे प्रथम पारितोषिक डायनॅस्टी या सोसायटीने पटकावले तर व्दितीय पारितोषिक अक्षय टॉवर व तृतीय  पारितोषिक कास्प काऊंटी या सोसायटीने पटकाविले. पुरुष संघाचे प्रथम पारितोषिक कॅलिस्टो सोसायटी तर व्दितीय पारितोषिक अक्षय टॉवर व तृतीय पारितोषिक कावेरीनगर क्रिकेट क्लब या संघाने पटकाविले. स्थायी समितीच्या मा.अध्यक्षा ममताताई विनायक गायकवाड, रुबरु मिस्टर इंडिया श्रीकांत द्विवेदी यांच्या हस्ते विजयी संघाना चषक प्रदान करण्यात आला.  यावेळी अनेक संघाच्या सभासदांनी आपल्या भावना व कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी स्थायी समितीच्या मा.अध्यक्षा ममताताई विनायक गायकवाड म्हणाल्या कि "मी सर्वप्रथम आदरणीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप, विनायक गायकवाड यांच्यातर्फे वाकड प्रीमियर लीगच्या सर्व विजयी संघाचे अभिनंदन व बाकी सर्व सहभागी टीमचे आभार मानते कि आपण सर्वानी एकत्र येऊन हि स्पर्धा यशस्वी केली. आपण सार्व ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी व सोसायटी सभासद मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झालात यातच वाकड प्रीमियर लीगचे यश आहे. "
यावेळी स्थायी समितीच्या मा.अध्यक्षा ममताताई विनायक गायकवाड, रुबरु मिस्टर इंडिया श्रीकांत द्विवेदी, सचिन कुंदोजवार, पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे सभासद व आजूबाजूच्या सोसायटीमधील सभासद मोठ्या संख्येने उपस्तिथ होते.पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):
वातावरणातील बदलाचा मोठा फटका गुलाब शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना बसला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वीस टक्के उत्पादन घटलं. त्यामुळं व्हॅलेंटाईन डे दरम्यान बाजारात गुलाबाची कमतरता भासणार आहे. याचा फायदा व्यापारी घेणार असून प्रेमीयुगलांना प्रेमाचं प्रतीक असणाऱ्या का गुलाबासाठी तीस ते पन्नास रुपये मोजावे लागणार आहे. 
वरुणराजा यंदा ऑक्टोबरपर्यंत बरसला. ही बाब गुलाब शेतकऱ्यांसाठी लाभदायक असते, त्यामुळं गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक निर्यातयुक्त गुलाब बहरेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. पण डिसेंबरमध्ये अवेळी पडलेला पाऊस आणि जानेवारीत अतिउष्ण वातावरणामुळे शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला. 
पुण्याच्या मावळ तालुक्यातील जयसिंग हुलावळे हे गुलाब शेती करतात. प्रेमाचं प्रतीक असणाऱ्या गुलाबाने त्यांना गेली दोन वर्ष गुलाबी नोटा मिळवून दिल्या. यंदा ऑक्टोबर महिन्यापर्यंत झालेला पाऊस त्यांना भरारी देईल, या आशेने त्यांनी मशागतीला चांगला जोर लावला. पण उलट वातावरण अतिउष्ण झाल्याने त्यांना पंचवीस टक्क्यांचा फटका बसलाय. चार एकरच्या पॉली हाऊसमधून २०१८च्या व्हॅलेन्टाईन दरम्यान २२ लाख तर २०१९च्या व्हॅलेन्टाईन दरम्यान २५ लाख रुपयांचा त्यांना नफा झाला होता. यंदा मात्र सात ते आठ लाखांचं नुकसान त्यांना झेलावं लागलं. 
तळेगाव एमआयडीसी परिसरातील बीएससी ऍग्रीचे शिक्षण घेतलेले दिलीप दळवी ही यंदा चिंतेत आहेत. बागायत शेतीपेक्षा गुलाब शेतीत पैसा अधिक खेळतो म्हणून त्यांनी पॉली हाऊस उभारलं. अडीच एकर शेतीतून २०१८ सालच्या व्हॅलेंटाईनला दहा लाख आणि २०१९च्या ही व्हॅलेंटाईनला दहा लाख रुपये खिशात पडले. पण यंदा बदललेल्या वातावरणामुळं मात्र पाच लाख रुपये मिळण्याची ही शाश्वती नाही.  
व्हॅलेंटाईन साठी भारतातून देशभर निर्यात होणाऱ्या गुलाब मध्ये मावळाचा पन्नास टक्क्यांचा वाटा असतो. त्यामुळं जयसिंग हुलावळे आणि दिलीप दळवींप्रमाणे सव्वा दोनशे हेक्टरवर गुलाब शेती करणारे शेतकरी चिंतेत आहे. यंदा सरासरी वीस टक्के तोटा सर्वांना सहन करावा लागणार आहे. अशी माहिती इंडियन सोसायटी ऑफ फ्लोरिकल्चर प्रोफेशनल्स (आयएसएफपी)चे अध्यक्ष प्रवीण शर्मा यांनी दिली. 2018 आणि 2019 साली 56 ते 57 कोटी रुपयांची उलाढाल गुलाब शेतीतून झाली होती. यंदा सरासरी 20 टक्के उत्पादन घटल्याने 50 कोटींच्या आतच उलाढाल होणार आहे.
वातावरणातील बदलाचा हा फटका शेतकऱ्यांना बसणार असताना, व्यापाऱ्यांच मात्र फावणार आहे. कारण उत्पादन घटल्याने यंदा बाजारात गुलाबाची कमतरता भासेल. परिणामी व्यापारी प्रेमी युगलांना लुटण्याची तयारी करतायेत. हे पाहता यंदा प्रेमी युगलांना एका गुलाबासाठी तीस ते पन्नास रुपये मोजावे लागणार आहे. 
50 दिवसांच्या मशागतीनंतर 10 हजार फुलांमागे शेतकऱ्यांना 50 हजार रुपये फायदा होईल. तिथंच ही 10 हजार फुलं व्यापाऱ्याला दोन-तीन दिवसातच बसल्या जागी एक लाख रुपये मिळवून देणार आहे. यंदा उत्पादन घटलं असलं तरी ही पुण्यातून 35 लाख फुलं उत्पादनाचं टार्गेट आहे, तेंव्हा शेतकऱ्यांपेक्षा व्यापारी यंदा कसे मालामाल होतील याचा विचार न केलेलाच बरा.


पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):
रेल्वे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन एक आरोपीने पळ काढला. चौकशीसाठी पोलीस त्याला घटनास्थळी घेऊन आले होते, तिथे कुटुंबीयांनी गोंधळ घातला. या गोंधळाचा फायदा घेत आरोपीने पळ काढला. 
नदीम शेख असं आरोपीचे नाव असून चोरीच्या गुन्ह्यात तळेगाव रेल्वे पोलिसांनी त्याला अटक केली होती. ही घटना बुधवारी दुपारी घडली असून पिंपरी पोलीस स्टेशनला गुन्हा मात्र आज दाखल झाला.पोलीस आरोपाचा शोध घेतआहेत


कपबशीच्या वाटेत सिलिंडर,पतंग,बॅट,नारळ. 
मुळशी (टाईमन्यूजलाईन नेटवर्क) :  श्री.संत तुकाराम कारखाना निवडणूक बिनविरोध करण्यात अपयश आले. संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले यांच्या पॅनलच्या कपबशीच्या वाटेत सिलिंडर,प्रेशर कुकर,पतंग,अंगठी,बॅट,नारळ,सिलिंग फॅन,किटली,टेलिफोन,बॅटरी टॉर्च आहेत.
  कारखाना उभारण्यास नवले यांनी प्रचंड मेहनत घेतली. जुन्या सहकाऱ्यांना सोबत घेवून  गावोगाव पिंजून काढली. सभासद नोंदणी करून कारखाना उभा केला. सध्या नानांची प्रकृती अस्वस्थ यामुळे यावेळी निवडणूक बिनविरोध होईल असं वाटलं होतं. मात्र त्यांनाच मोर्चेबांधणीसाठी कंबर कसावी लागणार असल्याचे 4 फेब्रुवारी रोजी उशिरा स्पष्ट झाले. कारण पौड येथील निवडणूक कार्यालयात उमेदवारी माघे घेण्याची मुदत दुपारी 3 पर्यंत होती. मात्र तोपर्यंत माघार घेण्यासाठी मन वळविण्यात सर्वपक्षीयांना अपयश आले. दुपारी 4 पर्यंत माघारीची ही प्रक्रिया सुरु होती. मात्र 3 वाजण्याची मुदत लांबवण्याचा प्रयत्न नियमबाह्य असल्याचे म्हणत काही शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला. तक्रार करण्याच्या उद्देशाने निवडणूक विभागातले फोटो काढून इच्छुकांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली. या वातावरणात निवडून बिनविरोध करण्याचे प्रयत्न सोडावे लागले. रात्री उशिरापर्यंत यादी जाहीर करण्यात आली नव्हती. अखेर आज ही यादी जाहीर झाली असून निवडणूक जाहीर झाली आहे. कारखाना कासारसाई- दारूंब्रे येथून स्तलांतरित करण्याच्या हालचाली सुरु आहेत. अशात निवडणूक लागल्याने रस्सीखेच होणारच मात्र यात शेतकरी आणि कारखाना हिताचे किती मुद्दे चर्चेत येतात हा चर्चेचा विषय आहे.

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget