पुणे (टाईम न्युजलाईन नेटवर्क):
ग्रामीण भागात चोरी करून पोलिसांच्या नाकात दम आणणाऱ्या बंडू उर्फ बंड्या मधुकर पवार (वय २१,राहणार डोक बाबळगाव ता.मोहोळ,जि.सोलापूर),या आरोपीच्या लोणीकंद पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे.त्याच्याकडून तब्बल ९ दुचाकी,२ एलईडी टीव्ही,महागड्या किंमतीचे सोने मिळून आले असल्याचे लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी सांगितले.
आव्हाळवाडी,मांजरी खुर्द गावाच्या सरहद्दीवर पोलीस पथक पेट्रोलिंग करत असताना एक युवक विना नंबरप्लेटची स्प्लेंडर दुचाकी चालवत असताना दिसल्याने पोलिसांनी त्यास हटकले असता तो शेजारील उसात पळून गेला.या युवक आरोपीवर घरफोडीचे ९, दुचाकी ९ तर १ चारचाकी गाडी,सह इतर गुन्हे उघडकीस आले असून महागड्या किंमतीचा माल आरोपीकडून हस्तगत करण्यात आला आहे.या ताब्यात घेतलेल्या आरोपीची लोणीकंद पोलिसांनी चौकशी केली असता पूर्व हवेलीतील पिंपरी सांड्स येथील अशोक भोरडे यांच्या राहत्या घरातून व त्यांच्या शेजारील घरातून कडी,कोयंडे तोडून घरात घुसून सॅमसंग एलईडी टीव्ही,प्रापंचिक भांडी,मोबाईल,रोख रक्कम असा एकूण ४३,५०० रुपयांचा मुद्देमाल चोराला होता. तसेच त्याच्या ताब्यातील गाडीची चौकशी केली असता ती गाडी त्याने साथीदारांच्या मदतीने लोणीकाळभोर येथून चोरल्याबाबत पोलीस तपासात आढळून आले आहे.
या आरोपीने त्याच्या साथीदारांच्या मदतीने लोणीकंद, लोणीकाळभोर,यवत,रांजणगाव,वडगाव निंबाळकर,दौंड,हडपसर,पोलीस ठाणे हद्दीत केलेले एकूण ९ घरफोडीचे चोरीचे गुन्हे अद्यापपर्यंत उघडकीस आले आहेत. या आरोपिकडून गुन्ह्यांमध्ये चोरलेला मुद्देमाल ५८ ग्रॅम सोने,१०५ ग्रॅम चांदी,२ एलईडी टीव्ही,१हुंदाई संट्रो कार,९ दुचाकी वाहने व स्विफ्ट कारचे ४ टायर डिक्स असा एकूण ७,५०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या आरोपीच्या इतर दोन साथीदारांचा शोध चालू असून आरोपी मिळाल्यास आणखी गुन्हे उघडकीस येणार असल्याचे पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे यांनी सांगितले.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या अधिपत्याखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत पडळकर,पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे,मोहन अवघडे,समीर पिलाने,श्रीमंत होनमाणे,ऋषिकेश व्यवहारे,दत्ता काळे,प्रफुल्ल सुतार,सुरज वळेकर,यांनी ही कारवाई केली आहे.गुन्ह्याचा पुढील तपास मोहन अवघडे करीत आहेत.
आरोपी बंडू उर्फ बंड्या मधुकर पवार यावर पूर्वी २ गुन्हे पंढरपूर शहर पोलीस ठाणे,१ एमआयडीसी सोलापूर,१ फौजदार चावडी पोलीस स्टेशन,१ जीआरपी सोलापूर,२ पंढरपूर शहर,यामध्ये सर्व घरफोडी,चोऱ्या असे गुन्हे दाखल आहेत.याच्या सोबत काही अल्पवयीन आरोपी आहेत.हे आरोपी दिवसादिवसाला राहण्याची जागा बदल असतात.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.