अपक्ष उमेदवार निखिल भगत हे महाविकासआघाडी की भाजप पुरस्कृत यावरून आता रस्सीखेच


वडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क):
तळेगाव नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले अपक्ष नगरसेवक आमचेच पुरस्कृत उमेदवार आहेत. यावरून महाविकासआघाडी आणि भाजप मध्ये रस्सीखेच सुरु आहे. बिनविरोध नगरसेवक झालेले निखिल भगत यांनी मात्र मी सर्व पक्षीयांचा उमेदवार असल्याचा सांगत, सावध भूमिका घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांचे चुलत भाऊ संदीप शेळके यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला होता, त्याजागी ही पोटनिवडणूक लागली होती. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज अंतिम मुदत होती. मुदतीपूर्वी केवळ निखिल भगत यांनीच अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. त्यामुळं भगत यांची बिनविरोध निवड झाल्याचं स्पष्ट झालं. यानिमित्ताने प्रशासन आणि सर्व पक्षीयांचा प्रचार आणि मतदान प्रक्रियेचा ताप टळला. जनसेवा विकास समितीने त्यांना अपक्ष म्हणून रिंगणात उभं केलं होतं. पण नवनिर्वाचित अपक्ष उमेदवार निखिल भगत हे महाविकासआघाडी की भाजप पुरस्कृत यावरून आता रस्सीखेच सुरू झाली आहे. 

तळेगाव नगरपरिषदेची 2016 साली झालेल्या निवडणुकीत भाजप आणि जनसेवा विकास समितीच्या युतीने सत्ता काबीज केली. पण नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे नगरसेवक सुनील शेळकेंनी पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसशी घरोबा केला. ते आमदार झाले अन त्यांच्या जागी नुकतीच पोटनिवडणूक पार पडली. या पोटनिवडणुकीत जनसेवा विकास समिती आणि भाजपची युती तुटली. जनसेवा विकास समिती आणि महाविकासआघाडीने आमदार शेळकेंच्या काकी संगीता शेळकेंना निवडून दिले. याच पोटनिवडणुकी दरम्यान आमदार शेळकेंचे चुलत भाऊ संदीप शेळकेंनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला. पण काही महिने उरल्याने आणि हा मतदारसंघ संवेदनशील असल्याने सर्व पक्षीयांनी मिळून ही निवडणूक बिनविरोध करण्याचं ठरवले. त्यानुसार ते घडलं ही, मात्र आता पुरस्कृतवरून महाविकासआघाडी आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. विरोधी पक्षनेता आणि राष्ट्रवादी नगरसेवक गणेश खांडगे यांनी निखिल भगत महाविकासआघाडीचे आणि भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडेंनी भाजपचे पुरस्कृत उमेदवार असल्याचे दावे-प्रतिदावे सुरू केले. तर जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांनी भगत हे मूळचे भाजपचे असून, त्यांना सर्व पक्षीयांच्या संमतीने बिनविरोध निवडून आणल्याचं स्पष्ट केलं. तसेेेच नवनिर्वाचित नगरसेवक भगत यांनी सर्व पक्षीयांचा पाठिंबा असल्याची सांगत सावध भूमिका घेतलेली आहे.
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget