मुळशी,
(टाइम न्यूजलाईन नेटवर्क) : मारुंजीत गावात तीन खांबासह वीज प्रवाह सुरु असलेल्या तारा दोन चालत्या दुचाकीवर पडल्या. यातून दोन गवळी तसेच शाळेत निघालेले विद्यार्थी आणि या तारांमध्ये फसुनही शाळेच्या मालकीण सुदैवाने वाचले आहेत. बांधकाम साहित्य नेणारा ट्रक खांबाला गुरुवारी सकाळी आठ वाजता धडकून अपघात झाला. मारुंजी येथील शिंदे वस्तीजवळच अंकुश बुचडे आणि जगताप वस्ती दरम्यानच्या अंतर्गत रस्त्यावर हा अपघात झाला. यात ग्रामस्थ रोहिदास गोळे हे दूध विक्रीसाठी दुचाकीवरून एकजनासह जात होते. दुसरीकडून फरशी घेवून ट्रक आला. ट्रक पाठीमागे रिम्स शाळेच्या मालकीण सौ.रॉय या महिलाही दुचाकीवर होत्या. याच वेळी खांबाला ट्रकची धडक बसली. एक खांब मधूनच तुटला. त्यापाठोपाठ अजून दोन खांबही क्षणात पडले. वीज करंट प्रवाह सुरु असलेल्या तारा दुचाकीवर पडल्या. ग्रामस्थांनी गाडी टाकून उड्या मारल्या तर शाळा मालकीण मधेच फसल्या. नेमकं याच वेळेस शाळेत मुलं निघाली होती. मात्र आवाजाने मुलं बाजूला पळाली. तारांना कोणाचा स्पर्श झाला नही. गावावरचं मोठं संकट आज टळलं.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.