पुणे (टाईम न्युजलाईन नेटवर्क):
छत्रपती संभाजी राजे यांच्या नेतृत्वात आज पुणे येथे सारथी संस्थेच्या बचावासाठी उपोषण सुरू झाले होते. यावेळी राज्यभरातील विद्यार्थांची उपस्थिती होती. मात्र, संस्थेसंदर्भात असलेल्या विविध मागण्या सरकारच्यावतीने मान्य करण्यात आल्याचे आश्वासन मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मिळाल्यानंतर हे उपोषण थांबवण्यात आले. यानंतर माध्यमांना मंत्री एकनाथ शिंदे यांनी सविस्तर प्रतिक्रिया देत, उपोषण मागे घेण्यात आले असल्याची तसेच, सारथी संस्थेची स्वायत्ता अबाधित राहणार असल्याची माहिती दिली.
माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले की, छत्रपती संभाजी राजेंच्या नेतृत्वात सारथी संदर्भात उपोषण आंदोलन सुरू होतं. सारथी या संस्थेच्याबाबत जी स्वायतत्ता आहे, ती कायम राहिली पाहिजे, जे.पी.गुप्ता या अधिकाऱ्याने सारथी संस्थेत हस्तक्षेप करता कामा नये, संस्थेला कुठेही निधीमध्ये किंबहूना जे काही अधिकार स्वायत्ततेचे आहेत ते कायम राहिले पाहिजे, परिहार यांनी दिलेला राजीनामा स्वीकारला जाऊ नये अशाप्रकारच्या मागण्या करण्यात आल्या होत्या.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.