मुंबईमध्ये नाईट-लाईफ कशी चालते, तो अनुभव पाहून पुण्याचा विचार करू:अजित पवार


पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क)
मुंबईमध्ये नाईट-लाईफ कशी चालते, तो अनुभव पाहू. पाहून पुण्याचा विचार करू. तिकडं सुरू केलं म्हणून इकडे सुरू करायचं असं नसतं. आपण पुणेकर आहोत.असे मत
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले
प्लस पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाला त्यावेळी बोलत होते
पुढे म्हणाले की,साईबाबांच्या जन्मस्थानावरून सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उद्या बैठक बोलावलेली आहे. चर्चेतून मार्ग काढू असे आवाहन केले. कोणाचाही भावना दुखावण्याचा हेतू कोणाचाच नसतो. दोन्ही भागातील नागरिकांनी चर्चा करू उचित मार्ग काढू. साई भक्तांना आवाहन आहे 
दारुबंदीबाबत डॉ अभय बंग यांनी जे बोलले ती बातमी पाहिल्यावर मी त्यांच्याशी फोनवर बोललो. माझ्या अर्थ आणि नियोजन खात असल्याने अर्थसंकल्प सादर करण्याआधी वेगवेगळ्या विभागाची आर्थिक स्थिती कशी आहे, त्यासाठी काय करता येईल. यासाठी आयएएस ब्रिफिंग करतात. त्यांचं ऐकून घ्यावं लागतं, ते बोलले म्हणजे लगेच निर्णय घेतला असं होतं नाही. (अप्रत्यक्षपणे दारुबंदी हटवली असं नाही) मतमतांतरे असू शकतात. लोकशाहीत बहुमताने पुढं जायचं असतं. त्यामुळे दारूबंदीच्या बातमीबाबत मी डॉ बंग यांना वस्तुस्थिती सांगितली. ते म्हणाले माझा गैरसमज झाला, म्हणून मी तसं बोललो होतो. आता त्यांच काही म्हणणं राहिलेलं नाही.
प्रकाश आंबेडकरांनी इंदू मिलचा निधी वाडिया रुग्णालयासाठी वळवावा असं म्हणाले, त्यांनी काय भूमिका मांडावी हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून त्यांनी ही भूमिका मांडलेली आहे. राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री ठाकरेंनी सिएफ ऍडव्हान्स 24 कोटी रुपये तर महापालिकेने 22 कोटी असे 46 कोटी निधी दिलेला आहे. सात दिवसात एक बैठक घेऊन योग्य मार्ग काढला जाईल. 
चंद्रकांत पाटील मेगाभरती वर आदल्या दिवशी एक बोलतात, दुसऱ्या दिवशी मी असं बोललो नाही म्हणतात. त्यामुळे ते नेमकं काय बोलले हे पुढच्या दोन-चार दिवसात समजून घेतो आणि मग बोलतो.
मुंबईमध्ये नाईट-लाईफ कशी चालते, तो अनुभव पाहू. पाहून पुण्याचा विचार करू. तिकडे सुरू केलं म्हणून इकडे सुरू करायचं असं नसतं. आपण पुणेकर आहोत. इथल्या एनजीओ आणि पुणेकरांचे वेगवेगळी मतं असणार. पण तिथला अनुभव पाहून मग आपण ठरवू. 
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget