मुंबई,(टाईम न्युजलाईन नेटवर्क) : महाराष्ट्र विधानसभेच्या आज झालेल्या एक दिवसीय विशेष बैठकीमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्यासाठी लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभेमध्ये राखीव जागा ठेवण्यास तसेच अँग्लो इंडियन समाजास नामनिर्देशनाद्वारे प्रतिनिधित्व देण्यास पुढील 10 वर्षासाठी मुदतवाढ देणारे संसदेने मंजूर केलेले संविधान (एकशे सव्वीसावी सुधारणा) विधेयक, 2019 या विधेयकाच्या अनुसमर्थनाचा ठराव एकमताने संमत करण्यात आला.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.