मुळशीत झालाय भ्रष्टाचाराचे कुराण:लाच घेण्यात अधिकाऱ्यांची स्पर्धा


पौड (टाईम न्युजलाईन नेटवर्क): महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतला बंदी आहे, त्यामुळे घाटात बैलं धावायची थांबली असली तरी मुळशीत एक स्पर्धा जोरात सुरु आहे. ती म्हणजे सरकारी खात्यामधील भ्रष्ट अधिकाऱ्यांमधे पैशे खायची स्पर्धा तालुक्यात जोरदार सुरु आहे. तुमच्या विभागाचे अधिकारी जास्त भ्रष्टाचार करतात की आमच्या विभागातले कर्मचारी खोऱ्याने पैसा ओढतात याची चढाओढ सुरु आहे. त्यामुळं एकेक विभागातले सरकारी अधिकारी कर्मचारी लाच घेताना ACB च्या जाळ्यात अडकत आहेत. महसूल विभागाच्या शर्यतीत आता हिंजवडी पोलिस अधिकारी सामील झाला आहे. मिलन शंतनू कुरकुटे (वय 37, रा.कासारवाडी) असं या वजनदार अधिकाऱ्याचे नाव आहे.
 मुळशी पॅटर्न चित्रपट आला आणि हा तालुका एकाएकी फेमस झाला. हिंजवडी भागातलं आयटी पार्क, तालुक्यातील जमीन व्यवहार आणि एकूणच सरकारी विभागातील हे चित्र बऱ्यापैकी जगाला कळाले. पण पडद्या आडून बऱ्याच गोष्टी घडत आहेत ज्या एकेक करून आता उघड होऊ लागल्या आहेत. 
 मुळशी हा पुण्याजवळ निसर्गसंपन्न आणि मुबलक पाणी असलेला तालुका आहे. मुळशी, टेमघर, कासारसाई-कुसगाव या धरणाचं पाणी, बांधकामायोग्य जमीन आणि स्वस्तात राबणारी शेतकऱ्यांची पोरं ही जमेची बाजू समजून इथं उद्योग आले. जमिनीला भाव वाढल्यानं बिल्डर, जमीन डेव्हलपर्स यांचा डोळा जमिनीवर वाढला. शेतकऱ्यांनी निमूटपणे जमीन दिली तर ठीक, नाही दिली तर त्यांच्या जमिनी बाळकावने सुरु झाल. जे न झुकता लढतात त्यांच्या अनेक पिढ्यांच्या मागे एजंटमार्फत जमिनीवर अतिक्रमण करणं, वर्षानुवर्षे महसूल विभागाच्या केसेसमध्ये जमीन अडकावणं, शेतकऱ्यांची बाजू खरी असली तरी अधिकाऱ्यांनी पुराव्याकडे डोळेझाक करून बिल्डर आणि एजंटांना हितकारक ठरतील अशा रीतीने प्रकरण लांबवणं हे प्रकार सर्रास सुरु झाले. कोणात थेट भांडण झाली नसली तरी पोलिसांनी महसूली विषयात लक्ष घालण्याचे प्रकार वाढले होते. शेतकऱ्यांना वेठीस धरून बिल्डर लॉबीच्या लोकांना कागदोपत्री मदत खुर्चीचा दुरुपयोग करून महसूलशी संबंध नसलेले काही विभागाचे अधिकारी करीत होते. शेतकरी हैराण असताना 29 डिसेंबर 2018 रोजी लवळे येथील शेतकऱ्याकडून लाच घेताना मुळशी तहसीलदारला चक्क अटक झाली. यानंतर सिलसिलाच सुरु झाला. भुगांवच्या तलाठी व कारकुनाला 50 हजारांची लाच घेताना, नंतर आणखी एक तलाठी 2019 मधे 7/12 नावावर करून देण्यास लाच घेताना पकडला गेला. यानंतर तरी बाकीच्या सरकारी अधिकाऱ्यांचे डोळे उघडलेलं नाही.   दरम्यान महाराष्ट्रात महसूल विभागापेक्षा पोलीस विभाग भ्रष्टाचारमधे 1 नंबरवर आल्याची बातमी मागच्याच महिन्यात आली.
 मुळशीत पोलीस शिपाई व अनेक कर्मचारी इमानदारीने कर्तव्य बजावत राहिले. मात्र दरम्यान हिंजवडीतील एका अधिकाऱ्याने जमीन विषयात लक्ष घालून अन्याय केल्याचा निषेधार्थ शेतकऱ्यांनी 200 पेक्षा अधिक जणांचा मोर्चा थेट पोलीस आयुक्तालयावर काढला होता. पण इतकं होऊनही हे थांबलं नाही. अखेर या प्रकाराची दखल देवाच्या दारात घेतली गेली असंच दिसतंय. आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात बँक अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी चक्क तक्रार देणाराकडे 50 हजार रुपयांची लाच हिंजवडी पीएसआय मिलन कुरकुटे याने मागितली. त्यातील 25 हजार रुपये देण्याची तडजोड झाली. दरम्यान या तक्रारदराने ACB च्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून हकीकत सांगितली. ACB ने सांगवी येथे सापळा रचून पैसे घेत असताना कुरकुटे याला रंगेहात अटक केली. यामुळे हिंजवडी पोलीस ठाण्याचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. आता कुरकुटे यांच्याकडे किती घबाड सापडत, तो आणखी कोणासाठी ही लाच स्वीकारत होता काय ?  तसेच आजवर त्यानं कोणाकोणाकडून लाच घेतली, या पैशातून त्याच्याकडे किती जमीन जुमला आहे, ही देखील चौकशी होणार आहे. मात्र लाच घेण्यास नेमका 50 हजाराचा आकडा सरकारी खात्यात अनेकदा कसा काय ठरतोय. हा मुळशीच्या भ्रष्टाचाराचा 50 हजाराचा पॅटर्न झालाय काय असं बोललं जातंय.मुळशीत अनेक सरकारी विभागातील अधिकाऱ्यांनी जवळ करून ठेवलेले टिपर आणि सेटलमेंट पंटर यामुळे हा प्रकार इतका वाढण्याचे कारण ठरत आहे. सरकारी कामाशी संबंध नसलेले हे पंटर दररोज अधिकारी यांच्या केबिनमध्ये कार्यालयात मुक्तपणे वावरत असतात. अधिकाऱ्यांचा खास म्हणून म्हणून तोऱ्यात मिरवतात. सामान्य जनतेमध्ये काय रोष आहे, व कोणाच्या काय हालचाली सुरु आहेत याची टीप अधिकाऱ्यांना ते देतात. प्रसंगी अधिकारी सांगेल तसं एखाद्या प्रकरणात कोणालातरी फसवलं जातं, जाळ्यात ओढलं जातं मग सेटलमेंटसाठी याच पंटर लोकांना पुढं केलं जातं. पैशांची मागणी होते, जितकं जास्त मानसिक त्रास देवून पैसे उकळता येतील तेव्हढे उकळायचे. या प्रकारात ज्यांच्या जमिनी शिल्लक राहिल्यात अशा लोकांना जाळ्यात अडकवलं जातं. अनेक शेतकरी यास बळी पडतात. पण जे भ्रष्टाचाराला थारा न देता लढायचा मार्ग स्वीकारतात व लाच देणार नाहीत त्यांची कामं वर्षानुवर्षे राखडवली जातात. किंवा खुर्चीचा दुरुपयोग करून उघड्पणे अन्याय केला जातो. अशा प्रकारात यापूर्वी एजंटला अटक झाली आहे. पण अजूनही  सरकारी अधिकाऱ्यांनी चौकटीवर काळ्या बाहुलीसारखं बसवलेले अनेक सेटलमेंट पंटर मंडळी सरळमार्गी मुळशीकराना लुटण्यासाठी मोकाट फिरत आहेत. त्यांचा कायमचा बंदोबस्त ज्या दिवशी होईल तो मुळशीकरांसाठी सोन्याचा दिवस असेल. आणि ज्या राजकीय पक्षाकडून हे कार्य घडेल त्यांच्या नेत्यांना आम्ही डोक्यावर घेवून आनंदानं नाचू अशी भावना सरकारी जाचाने पिचलेले शेतकरी व सामान्य मुळशीकर व्यक्त करीत आहेत.
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget