गुंजवणी-चापेट प्रकल्पाच्या वाजेघर, वांगणी खोऱ्यासाठी होणार उपसा


वेल्हे (टाईम न्युजलाईन नेटवर्क):
भोर येथील निरा देवधर प्रकल्पाच्या डाव्या कालवा व त्यावरील वितरण व्यवस्थेचे काम बंद नलिकेद्वारे सुधारित सर्वेक्षण करणेगुंजवणी-चापेट प्रकल्पाच्या वाजेघर वांगणी खोरे या उपसा जलसिंचन योजना प्रकल्पात समाविष्ट करून उपसा जलसिंचन योजनेद्वारे क्षेत्र ओलीताखाली आणणेनिरा-देवधर प्रकल्प - वेनवडी उपसा जलसिंचन योजना कामांना निधी देणे,निरा-देवधर प्रकल्पभोर उजवा कालवा अस्तरीकरण निधी मिळणेगुंजवणी-चापेट प्रकल्प वेल्हे या प्रकल्पाच्या विविध कामांबाबत आमदार संग्राम थोपटे यांच्या समवेत मंत्री श्री.पाटील यांनी बैठक झाली.  
            स्थानिकांना जास्तीत जास्त पाण्याची आवर्तने कशी देता येतील हे विभागाने तपासून पहावे. तसेच यासंदर्भातील अधिकचा निधी वाढवून मिळेल का हे देखील पहावेअशा सूचना मंत्री महोदयांनी दिल्या.
            तसेच आमदार अशोक पवार यांच्या समवेत झालेल्या शिरुर घोडनदीवरील रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यास निधी मिळणेचासकमान कॅनॉल अस्तरीकरण करणेडिंबा कॅनल अपूर्ण कामाबद्दलच्या बैठकीत सुधारित प्रशासकीय मान्यता,निधीची उपलब्धता आदींबाबत विचार करावा. महत्वाच्या दुरुस्तीच्या कामाचे नियोजन करावे व 10 ते 15 दिवसात यासंदर्भातील सविस्तर माहिती द्यावीअसे निर्देश मंत्री श्री.पाटील यांनी दिले.
            या बैठकीस जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव इ.सिं.चहलसचिव लाक्षक्षेत्र राजेंद्र पवारसचिव प्रकल्प समन्वयक संजय घाणेकरकोकण व तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संजय कुलकर्णीकृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाचे खलिल अन्सारी व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget