पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने स्पर्धा संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे सुरू आहे. स्पर्धेत एकूण 52 संघांनी सहभाग नोंदविला आहे. उद्घाटन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते झाले. या वेळी नगरसेविका सुजाता पालांडे, सहायक आयुक्त संदीप खोत, क्रीडाधिकारी रज्जाक पानसरे, क्रीडा पर्यवेक्षक अनिता केदारी, राजू कोतवाल, राजेंद्र नागपूरे आदी उपस्थित होते. परिक्षक म्हणून लिना केतकर, सोनक पेंडसे यांनी काम पाहिले. संगती अॅकॅडमीचे शिक्षक विनोद सुतार, मिलिंद दलाल, वैजयंती भालेराव यांनी संयोजन केले.
निकाल पुढीलप्रमाणे आहे :
पहिली ते चौथी गट
सेंट अॅन्स स्कूल (प्रथम), सीएमएस स्कूल (द्वितीय), गुरूवर्य अॅकॅडमी (तृतीय), स्वामी विवेकानंत स्कूल व सीटी प्राईड स्कूल (उत्तेजनार्थ).
पाचवी ते सातवी गटस्वामी विवेकानंद विद्यालय (प्रथम), सीएमएस स्कूल (द्वितीय), सीटी प्राईड स्कूल (तृतीय), श्री समर्थ स्कूल व श्री सरस्वती विद्यालय (उत्तेजनार्थ).
आठवी ते दहावी गट अण्णासाहेब मगर विद्यालय (प्रथम), सरस्वती विद्यालय (द्वितीय), सीएमएस स्कूल (तृतीय), सीटी प्राईड स्कूल व मार इव्हानियस स्कूल (उत्तेजनार्थ)

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.